शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी बिर्याणी, मग कलिंगड खाल्लं... मुंबईतील एकाच कुटुंबात चौघांचा मृत्यू, घटनेमुळे खळबळ
2
Top Marathi News Live: ही माझी शेवटची सभा, आता ४ मे नंतर शपथविधी सोहळ्याला येईन: PM मोदी
3
भारताला हरवण्यात अपयशी ठरल्याने पाकिस्तानचा अफगाणिस्तानशी संघर्ष; अहवालातून खळबळजनक माहिती
4
रेकॉर्डब्रेकर रिंकू, IPL मध्ये रचला 'असा' विक्रम, युवराज, जडेजाही पडले मागे, मोडणं आहे कठीण 
5
बिहारमध्ये मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच्या घराच्या पायऱ्या तोडल्या; बुलडोझर कारवाई बेधडक सुरु
6
Swapna Shastra: भीतीदायक स्वप्नांचा असतो भविष्याशी संबंध? नक्की काय सांगतं स्वप्न शास्त्र?
7
मराठी सक्ती निर्णयाची अंमलबजावणी ६ महिने ते १ वर्ष पुढे ढकलावी; संजय निरुपमांची नवी मागणी
8
Ilma Afroz : वडिलांचं छत्र हरपलं, शेतात घाम गाळला; आईने पणाला लावलं आयुष्य, लेक झाली IPS अधिकारी
9
"आज सासऱ्यांना मिस करतेय, रिंकूची खेळी त्यांच्यासाठी होती"; KKR जिंकल्यावर प्रिया सरोज भावूक
10
बर्थडे पार्टीत रक्ताचा सडा! चेहऱ्याला केक लावल्याच्या रागातून भाजप नेत्याच्या भावांसह तिघांची हत्या
11
तब्बल २५ एकरचा कॅम्पस, २८९ कोटी खर्च, मोदींनी केलं होतं उद्घाटन, पण या संस्थेत अवघे १५ विद्यार्थी 
12
Home Loan घेण्यासाठी किमान किती असावा लागेल Credit Score; अर्ज करण्यापूर्वी लक्षात ठेवा 'या' गोष्टी
13
आपच्या त्या सात फुटीर खासदारांबाबत राज्यसभा सभापतींनी घेतला मोठा निर्णय, विलिनिकरणाबाबत दिले असे आदेश    
14
Samudrik Shastra: सामुद्रिक शास्त्रानुसार हसण्याच्या पद्धतीवरून ओळखता येतात माणसाचे गुण-दोष!
15
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' चित्रपटाचे ॲडव्हान्स बुकिंग आजपासून सुरू, प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद
16
Video - हृदयद्रावक! जन्मदात्या आईचा क्रूरपणा; १८ महिन्यांच्या लेकीला फेकलं नाल्यात अन्...
17
सरकारी बँक कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! लवकरच पगारवाढ होणार, अर्थ मंत्रालयानं जारी केले निर्देश
18
‘डिजिटल अरेस्ट’चा धक्कादायक प्रकार उघडकीस; घाटकोपरचे कुटुंब १८ दिवस घराबाहेर पडलेच नाही
19
पाकिस्तानात लष्कर-ए-तोयबाच्या युसूफ आफ्रिदीची हत्या; गेल्या काही महिन्यात ३० हून अधिक जण लक्ष्य
Daily Top 2Weekly Top 5

उद्योगांमध्ये शासन निर्णयाची पायमल्ली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2019 06:00 IST

उद्योग असलेल्या ठिकाणी तेथील ८० टक्के नागरिकांना रोजगार उपलब्ध करून १८ नोव्हेंबर १९६८ चा शासनाचा निर्णय आहे. मात्र, जिल्ह्यातील एकाही उद्योगात शासन निर्णयाची अंमलबजावणी करण्यात आली नसून नियम धाब्यावर बसविले जात आहेत.

ठळक मुद्देस्थानिकांना रोजगार नाहीच : बुधवारी मोर्चा

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्ह्यातील उद्योगांमध्ये स्थानिकांचा हक्क डावलून मोठ्या प्रमाणावर परप्रांतीयांचा भरणा करण्यात आला आहे. याकडे शासन-प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. उद्योगांमध्ये स्थानिकांना रोजगार उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते अ‍ॅड. उज्ज्वल काशीकर यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने गुरुवारी प्रशासनाला दिलेल्या निवेदनातून केली.उद्योग असलेल्या ठिकाणी तेथील ८० टक्के नागरिकांना रोजगार उपलब्ध करून १८ नोव्हेंबर १९६८ चा शासनाचा निर्णय आहे. मात्र, जिल्ह्यातील एकाही उद्योगात शासन निर्णयाची अंमलबजावणी करण्यात आली नसून नियम धाब्यावर बसविले जात आहेत. याकडे जिल्हा प्रशासनाचेही दुर्लक्ष होत आहे. परिणामी जिल्ह्यात सुशिक्षित बेरोजगारांच्या हाताला काम नाही. येथील बेरोजगारांना अन्य जिल्ह्यात रोजगार शोधावा लागत आहे. लोकप्रतिनिधींकडूनही या प्रश्नावर आग्रही भूमिका घेतली जात नसल्याने कंपनी व्यवस्थापनांचा कारभार आलबेल सुरू आहे. जिल्ह्यात उत्तम व्हॅल्यू स्टील इंडस्ट्रीज, भूगाव यासह देवळी तालुक्यात उद्योग आहेत. या उद्योगांमध्ये स्थानिकांची संख्या अल्प असून परप्रांतीयांची संख्या मोठी आहे. यामुळे नागरिकांवर उपासमारीची वेळ आली आहे. उद्योगांमध्ये स्थानिकांना रोजगार मिळवून देण्याच्या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी ११ सप्टेंबरला मोर्चा काढण्याचा इशारा अ‍ॅड. उज्ज्वल काशीकर, राकेश पांडे, समीर राऊत आदींनी निवेदनातून दिला आहे. मोर्चाला छत्रपती शिवाजी महाराज येथून सुरुवात होणार असून बजाज चौक, इंझापूर असे मार्गक्रमण करून उत्तम स्टील व्हॅल्यू उद्योगावर धडक देत व्यवस्थापकांना निवेदन सादर केले जाणार आहे.

टॅग्स :Governmentसरकार