शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
4
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
5
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
6
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
7
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
8
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
9
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
10
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
11
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
13
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
14
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
15
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
16
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
17
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
18
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
19
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
20
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

वाळूघाट लिलावाअभावी शासनाच्या तिजोरीत ठणठणाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2020 19:42 IST

राज्यभरात नवीन वाळू निर्गती धोरणानुसार यावर्षी वाळूघाट लिलाव करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने पर्यावरण अनुमतीकरिता पर्यावरणविषयक जाहीर जनसुनावणी घेण्याचे निर्देश दिल्यामुळे या लॉकडाऊनच्या काळात लिलाव प्रक्रिया थांबली आहे.

ठळक मुद्देजनसुनावणीकरिता रखडली प्रक्रियाअवैध उपसा सुरूच

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : राज्यभरात नवीन वाळू निर्गती धोरणानुसार यावर्षी वाळूघाट लिलाव करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने पर्यावरण अनुमतीकरिता पर्यावरणविषयक जाहीर जनसुनावणी घेण्याचे निर्देश दिल्यामुळे या लॉकडाऊनच्या काळात लिलाव प्रक्रि या थांबली आहे. परिणामी, घाट लिलावातून येणाऱ्या कोट्यवधींच्या महसुलापासून शासन लांबच आहे.शासकीय व खासगी बांधकाम हे वाळूवर अवलंबून असल्याने वाळूघाट लिलावाअभावी बांधकामालाही ब्रेक लागले आहेत. एरव्ही मार्च-एप्रिल महिन्यामध्ये वाळूघाटांचे लिलाव व्हायचे. यातून शासनाला वर्ध्यासारख्या लहान जिल्ह्यातून जवळपास दहा कोटींचा महसूल मिळायचा. राज्याचा विचार केल्यास जवळपास साडेतीनशे ते चारशे कोटींचा महसूल शासनाच्या तिजोरीत जमा व्हायचा. मात्र, यावर्षी पर्यावरण अनुमतीकरिता जनसुनावणीची अट घालण्यात आली आहे. त्यामुळे यावर्षी पावसाळा लागायला काही दिवसच शिल्लक राहिले तरीही वाळू घाटांचे लिलाव झालेले नाही. अशा स्थितीत वाळूमाफियांचे चांगलेच फावत आहे. कोणतीही रॉयल्टी न भरता अवैधरीत्या उपसा सुरू आहे. चोरट्या मार्गाने आणलेली वाळू दामदुपटीने विकली जात असल्याने बांधकाम करणाऱ्यांचे बजेट कोलमडले आहे. त्यामुळे वाळूमाफियांच्या उपद्रवाने वाळूघाट खाली होण्यापूर्वी घाटांचा लिलाव होणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

लिलावाकरिता दीड महिन्याची प्रतीक्षाशासनाच्या नवीन धोरणानुसार वाळूघाटाची क्षमता पाहून एक ते पाच वर्षांकरिता वाळूघाट देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार राज्यातील प्रत्येक तालुकास्तरावर तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या व भूवैज्ञानिक, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रतिनिधी, जलसंधारण विभागाचे प्रतिनिधी असलेल्या तालुका तांत्रिक समितीद्वारे वाळूघाटांची यादी तयार करण्यात आली आहे. ही यादी जिल्हा खनिकर्म अधिकारी यांच्या मार्फत पर्यावरण अनुमतीकरिता प्रस्तावित करण्यात आली. अनुमतीकरिता पर्यावरणविषयक जाहीर जनसुनावणी घेण्याचे निर्देश दिल्याने संचारबंदीच्या काळात झूम अ‍ॅपद्वारे जनसुनावणी घेण्याकरिता जिल्हा प्रशासनाने तयारी सुरू केली आहे. जनसुनावणीच्या तारखा निश्चित केल्या असून सुनावणीनंतर येत्या एक ते दीड महिन्यात लिलावाचा मार्ग सुकर होण्याची शक्यता आहे.तालुकास्तरीय तांत्रिक समितीद्वारे जिल्ह्यातील ३७ वाळूघाट लिलावकरिता प्रस्तावित करण्यात आले आहेत. आता पर्यावरण अनुमतीकरिता जनसुनावणी घेण्याचे निर्देश दिल्याने येत्या १० जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात झूम अ‍ॅपद्वारे दुपारी १२ वाजता जनसुनावणी होणार आहे. हीच स्थिती राज्यातील इतरही जिल्ह्यातील असून जनसुनावणीनंतरच पर्यावरण अनुमती प्राप्त होऊन घाटाची लिलाव प्रक्रिया राबविली जाईल.डॉ.इम्रान शेख, जिल्हा खनिकर्म अधिकारी, वर्धा.

टॅग्स :sandवाळू