शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

उच्च शिक्षणाची जबाबदारी शासनाने घेण्याची गरज

By admin | Updated: February 11, 2016 02:33 IST

शिक्षण महागल्याने सामान्य वर्गातील मुले उच्च शिक्षणापासून वंचित राहात आहेत. त्यामुळे उच्च शिक्षणाची जबाबदारी शासनाने घेतल्याशिवाय सामाजिक न्याय मिळणार नाही.

अविनाश डोळस : राज्यस्तरीय शिक्षण हक्क परिषदवर्धा : शिक्षण महागल्याने सामान्य वर्गातील मुले उच्च शिक्षणापासून वंचित राहात आहेत. त्यामुळे उच्च शिक्षणाची जबाबदारी शासनाने घेतल्याशिवाय सामाजिक न्याय मिळणार नाही. असे मत राज्य शासनाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर चरित्र व साधने प्रकाशन समितीचे सदस्य सचिव प्रा. अविनाश डोळस यांनी व्यक्त केले. महाराष्ट्र राज्य प्रजासत्ताक शिक्षक कर्मचारी संघाची सहावी राज्यस्तरीय शिक्षण हक्क परिषद आर्वी येथे घेण्यात आली. यावेळी अध्यक्षस्थानावरून डोळस बोलत होते. उद्घाटन यवतमाळचे गजलकार प्रा. सिद्धार्थ भगत यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी प्रजासत्ताकचे राज्याध्यक्ष अरुणकुमार हर्षबोधी, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे सिनेट सदस्य डॉ. सुभाष गवई, आनंदार्च, डॉ. चव्हाण आणि शिक्षण हक्क परिषदेचे निमंत्रक अशोक गाडगे उपस्थित होते. करण्यात आले. स्वागताध्यक्ष म्हणून न. प. सदस्य प्रा. पंकज वाघमारे होते. सर्वंप्रथम नागपूरचे कवी भाऊ पंचभाई, रोहीत वेमुल्ला व प्रजासत्ताकचे आर्वी शाखेचे सचिव धर्मपाल टोकसे यांना मौन आदरांजली देण्यात आली. परिषदेचे निमंत्रक अशोक गाडगे यांनी प्रास्ताविक केले. हर्षबोधी यावेळी म्हणाले, शाळांचे स्तरीकरण व अभ्यासक्रमांचे विषमीकरण झाल्याने समान शिक्षणाचा आशयच संपून गेला आहे. त्यामुळे संविधानातील समान आणि नि:शुल्क शिक्षणासाठी जनआंदोलन उभारणे गरजेचे आहे. धम्मा कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली संविधानातील शिक्षण आणि शासकीय धोरण या विषयावर झालेल्या परिसंवादात संजय बोधे, प्रा. डॉ. कमलाकर पायस, प्रा. सुनंदा वालदे यांचा सहभाग होता. सर्वांना समान, दर्जेदार आणि नि:शुल्क शिक्षण या विषयावर घेण्यात आलेल्या खुल्या चर्चासत्रात संजय गुजर, नवीन पाटील, मारोती पाटील, हेमंत गांजरे, प्रकाश दातार, गिरीश नरांजे यांनी सहभाग घेतला. नागपूर व अमरावती विद्यापीठाने पीएचडी प्रदान केलेल्या डॉ. प्रवीण काळे, डॉ. अनिल भगत, डॉ. अनिल दहाट, डॉ. प्रशांत धनविज, डॉ. तारेश आगाशे, डॉ. कमलाकर पायस, डॉ. राजु कांबळे यांच्यासह सेवानिवृत्त शिक्षक बाळकृष्ण मिरगे, चरणदास कांबळे, मुख्याध्यापक संतोष तागडे, समाजसेवक सुनील तेलगोटे, हस्तलिखीतामुळे लिम्का बुक मध्ये नोंद झालेले धनंजय नाखले यांचा सन्मान करण्यात आला. समारोपीय समारंभात वर्धा जिल्हा नियोजन समितीचे सदस्य डॉ. सिद्धार्थ बुटले, शिक्षण हक्क परिषदेचे मुख्य संयोजक राजकुमार सोनटक्के, संयोजक अशोक खंडारे, सहसंयोजक अरविंद वावरे, विलास गायकवाड उपस्थित होते. अनिल खैरकार, अरुण डंभारे, सूर्यभान नडे, नारायण कुसळे, नवीन वासेकर, सचिन कांबळे, गौतम बागडे, संदीप चवात, विश्वेश्वर पायले, दत्तात्रय खंदारे, अरविंद माणिककुळे, सत्येंद्र गोटे, मनोहर लांडगे, किशोर ढाले, सोनाली कांबळे, संगीता वाघमारे, सुषमा पाखरे, पदमा तायडे, मिरा इंगोले यांना शिक्षणसेवा पुरस्काराने सन्मानित केले. संचालन प्रकाश कांबळे, संध्या भगत, विश्वेश्वर पायले, प्रास्ताविक अशोक गाडगे, संजय बोधे, विजय शेंडे तर आभार राजकुमार सोनटक्के, अशोक खंडारे, दत्तात्रय खंदारे यांनी मानले. मुकुंद वाघमारे, वसंत पाटील, निलेश नाखले, रविंद्र नाखले, राऊत, अढाऊ, नगराळे, हेमंत मडावी यांनी सहकार्य केले.(शहर प्रतिनिधी)