शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला डॉक्टर हॉटेलमध्ये का राहत होती? प्रशांत बनकरसोबत भांडण झालेले, समोर आले मोठे कारण...
2
'AI'ची मोठी चूक! चिप्सच्या पाकिटाला बंदूक समजले; शाळकरी विद्यार्थ्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या...
3
फक्त आरोग्य विमा काढणे पुरेसे नाही? 'या' एका नियमामुळे तुमचा क्लेम रिजेक्ट होईल, खिशाला बसेल भुर्दंड
4
"टाटा समूहात जे सुरू आहे, ते पाहून..," रतन टाटांचे निकटवर्तीय नोशीर सूरावालांनी अखेर मौन सोडलं
5
पैसे कमावण्याची संधी? ५ मोठे आयपीओ बाजारात येणार; लेन्सकार्टसह 'या' कंपन्यांची लिस्टिंगची तयारी
6
खळबळजनक! सुसाट डिफेंडरची ५ वाहनांना जोरदार धडक; तिघांचा मृत्यू, ५ जण जखमी
7
Numerology: ‘या’ ४ पैकी तुमची बर्थडेट आहे? १८ वर्षांची महादशा-दोष दूर; राहु कृपेने पैसा-लाभ
8
दक्षिण चीन समुद्रात खळबळ; अर्ध्यातासाच्या अंतराने अमेरिकन नौदलाची दोन विमाने कोसळली
9
माजी CJI चंद्रचूड यांच्या विधानाचा आधार, राम मंदिराविरोधात याचिका; वकिलाला ६ लाखांचा दंड
10
८ वा वेतन आयोग कधी लागू होणार? घोषणेच्या १० महिन्यांनंतरही अधिसूचनेची प्रतीक्षाच
11
भारतापासून १४ हजार किमी दूर, १४ लाख लोकसंख्या; ‘हा’ देश बांधणार राम मंदिर, हिंदू वस्ती किती?
12
Stock Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, निफ्टी ७० अंकांच्या तेजीसह उघडला; मेटल-रियल्टी शेअर्समध्ये खरेदी
13
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना ऑक्टोबर सांगता सुखाची, पद-पैसा-लाभ; ६ राशींना खडतर काळ!
14
ऑफर्स, ऑनलाईन चॅट्स, फसवणुकीचं जाळं...; iPhone चं आमिष दाखवून लाखोंची फसवणूक
15
भयानक प्रकार! भाजप नेत्याने शेतकऱ्याला थारखाली चिरडले, वाचवायला आलेल्या मुलींचे कपडे फाडले
16
आधार कार्डापासून ते बॅंक अकाऊंट पर्यंत, १ नोव्हेंबरपासून बदलणार ‘हे’ ५ नियम; तुमच्या खिशावर थेट होणार परिणाम
17
आंतरराष्ट्रीय जुजित्सू खेळाडू रोहिणी कलम यांनी आयुष्य संपविले; एक फोन आला आणि ती खोलीत गेली...
18
८ मिनिटांत ८ अब्ज रुपयांचे दागिने चोरणारे चोर सापडले; पॅरिसच्या म्युझियममध्ये टाकलेला दरोडा
19
कोणत्याही परिस्थितीत पीडितेला न्याय अन् आराेपींना शिक्षा मिळेल; देवेंद्र फडणवीस यांची फलटणमध्ये ग्वाही
20
टॅरिफची धमकी मिळाल्याने थायलंड-कंबोडियात युद्धबंदी; ट्रम्प यांच्या आणखी एका मध्यस्थीला मिळाले यश

शेतमालाला भाव, तरुणांना रोजगार देण्यात सरकार अपयशी

By रवींद्र चांदेकर | Updated: November 8, 2024 18:05 IST

शरद पवार यांचा घणाघात : महाराष्ट्राचा चेहरा बदलण्यासाठी साथ देण्याचे आवाहन

हिंगणघाट (वर्धा) : कापूस, सोयाबीन, ऊस पिकांना भाव नाही. त्यामुळे शेतकरी कर्जबाजारीमुळे आत्महत्या करीत आहेत. आमच्या हातात सत्ता होती, त्यावेळी सर्वच क्षेत्रात महाराष्ट्र नंबर एक होता. परंतु, भाजपच्या हातात सत्ता गेल्यावर राज्याचा पहिला नंबर घसरला, असा घणाघात राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी शुक्रवारी येथील गोकुळधाम मैदानावर आयोजित सभेत केला.

महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार अतुल वांदिले यांच्या निवडणूक प्रचार सभेत ते बोलत होते. ते पुढे म्हणाले, देशात ६० टक्के शेतकरी आहेत. त्यांच्यावर सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे आत्महत्या करण्याची वेळ येत आहे. सोयाबीन, कापूस, ऊस या पिकांना उत्पादन खर्चावर आधारित भाव मिळत नाही. दुसरीकडे शेतीचा खर्च वाढत आहे. अशावेळी तरुणाच्या झुंडी नोकरीसाठी देशभरात हिंडत आहेत. देश रसातळाला जात असताना देशात जाती धर्माचे राजकारण सुरू आहे. भाजपने दहा वर्ष सत्ता उपभोगूनही शेतकऱ्यांच्या पदरी निराशा पडली आहे. शेतमालाचे भाव पडलेले आहेत. देश व राज्याची अर्थव्यवस्था संकटात आहे. तरुणांच्या हाताला काम नाही, त्यांना नोकरी नाही हे चित्र बदलायचे आहे. याकरिता महाविकास आघाडीच्या हातात पुन्हा एकदा सत्ता द्या, असे आवाहन त्यांनी केले.

भाजपची दहा वर्ष सत्ता असताना यंदाच्या लोकसभा निवडणुकीत स्वबळावर सत्ता स्थापन करू शकले नाही. त्यांना अन्य पक्षांच्या मदतीने सरकार बनवावे लागले. हा देश शेतकऱ्यांचा आहे. सत्तेचा वापर शेतकऱ्यांसाठी झाला पाहिजे. मात्र, केंद्रातील भाजपला याची जाणीव नाही. मी कृषिमंत्री असताना शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबविण्यासाठी त्यांचे ७० हजार कोटींचे कर्ज माफ केले होते. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य लाभले होते. सध्या केंद्र व राज्य शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे पुन्हा शेतकऱ्यांवर आत्महत्या करण्याची वेळ येऊन ठेपल्याचा घणाघात त्यांनी केला.

सभेला राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख, उमेदवार अतुल वांदिले, नीतेश कराळे, माजी उपनगराध्यक्ष मुरलीमनोहर व्यास यांनीही मार्गदर्शन केले. मंचावर माजी आमदार सुरेश देशमुख, जिल्हाध्यक्ष सुनील राऊत, माजी आमदार डॉ. वसंत बोंडे, उद्धवसेनेचे उपजिल्हा प्रमुख राजेंद्र खुपसरे, सतीश धोबे, काँग्रेसचे प्रवीण उपासे, पंढरी कापसे, भाईजी मुंजेवार उपस्थित होते. यावेळी सुनील डोंगरे व माजी नगरसेविका शुभांगी डोंगरे, आरपीआयचे अनिल मून यांनी महाविकास आघाडीच्या उमेदवाराला पाठिंबा घोषित केला. विजय तामगाडगे यांनी सूत्रसंचालन केले.

विधानसभा डोळ्यांसमोर ठेवून निर्णयराज्य शासनाने विधानसभा निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून पैशांच्या योजना राबविण्याचा सपाटा लावला. १० वर्षे त्यांना या योजना राबवता आल्या नाही. ते पुन्हा सत्तेत आल्यास या योजनांचे खरे स्वरूप दिसेल. सर्व सामान्यांची फसगत होईल. महाविकास आघाडी सत्तेत आल्यास आम्ही महालक्ष्मी योजना, कृषी समृद्धी, युवकांना शब्द, कुटुंब संरक्षण आणि समानतेची हमी, या गॅरंटीवर काम करू, असा विश्वास शरद पवार यांनी दिला.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४wardha-acवर्धाSharad Pawarशरद पवार