शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीर पोलिसांची मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त
2
"ही पाकची जुनी खोड..."; इस्लामाबादच्या स्फोटाचं खापर भारतावर फोडणाऱ्या पाकिस्तानला मिळालं चोख उत्तर! 
3
न्यायालयाचा दणका! महिलांना मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी पुणे पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश
4
लाल किल्ला स्फोटात मोठा खुलासा! सुरक्षा यंत्रणांच्या जोरदार कारवाईमुळे मोठा धोका टळला
5
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
6
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
7
लग्नाला नऊ वर्षे पूर्ण झाली, पतीने आपल्याच मित्रासोबत पत्नीचे लग्न लावून दिले; धक्कादायक कारण आले समोर
8
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
9
Bihar Exit Poll : बिहारमध्ये उत्सुकता शिगेला! पहिला एक्झिट पोल आला, नितीश की तेजस्वी?
10
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
11
राहुल द्रविडच्या लेकाची भारतीय U19 संघात वर्णी ; वैभव सूर्यवंशीचं नाव 'गायब' कारण...
12
छत्तीसगडच्या बीजापूरमध्ये मोठी चकमक, 6 नक्षलवादी ठार; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त...
13
बॉसनं नोकरीवरून काढलं, पठ्ठ्यानं असं काही केलं की आता कंपनीला बसणार मोठा दंड!
14
फरीदाबाद मॉड्यूलचा खरा मास्टरमाईंड आला समोर; डॉक्टरांना कट्टरपंथी बनवणारा मौलवी इरफान अहमद कोण?
15
Travel : भारताशी कनेक्शन, 'या' देशात जाताच करोडपती व्हाल! परदेशवारीचा प्लॅन करताय तर नक्की विचार करा
16
ती चूक यामाहा नाही करणार...! पहिली वहिली इलेक्ट्रीक स्कूटर आली!  Aerox लूक; इतकी रेंज देणार की...
17
Delhi Red Fort Blast : जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याचे कॉल डिटेल्स उघड; दिल्ली स्फोटाचं रहस्य उलगडलं, उमरने ‘तारिक’ नावाने घेतलं सिम कार्ड
18
Yamaha ची नव्या जमान्याची RX100...! स्टायलिश बाईक लाँच; किंमत फक्त ₹ १.** लाख!
19
IND vs SA : ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीवर गंभीर नाराज; गांगुलीनं असं दिलं उत्तर
20
संत्र्याच्या साली कचरा समजून फेकून देता, थोडं थांबा... त्वचेसह घरालाही होईल मोठा फायदा

सरकारवर विश्वासच उरला नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2018 00:00 IST

सरकारने स्वतंत्र विदर्भ राज्याचे आश्वासन दिले होते. भारतीय जनता पक्ष केंद्रात सत्तेवर आल्यास विदर्भ राज्य देवू असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले होते; मात्र आता हे दोनही नेते मौनीबाबा झाले आहे.

ठळक मुद्देवामनराव चटप यांचा आरोप : शासनाकडून शेतकऱ्यांसह सर्व वर्गांची फसवणूक

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : सरकारने स्वतंत्र विदर्भ राज्याचे आश्वासन दिले होते. भारतीय जनता पक्ष केंद्रात सत्तेवर आल्यास विदर्भ राज्य देवू असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले होते; मात्र आता हे दोनही नेते मौनीबाबा झाले आहे. हे आश्वासन सरकारने पाळलेले नाही. या सरकारसारखे खोटारडे सरकार आपण पाहिले नाही. समाजातील सर्व वर्गांचा विश्वास या सरकारवरून उडाला अशी घणाघाती टिका माजी आमदार अ‍ॅड. वामनराव चटप यांनी केली.निवडक पत्रकारांशी बोलताना चटप यांनी स्वतंत्र विदर्भ राज्य मिळविल्याशिवाय प्राण सोडणार नाही, अशी प्रतीज्ञाही केली. गेल्या ५८ वर्षांपासून स्वतंत्र विदर्भ राज्याचा हा लढा आम्ही लढतो आहे. आता ही चळवळ तरुणांच्या हातात सोपविण्याची वेळ आली आहे. आम्हाला विदर्भात कुठलाही विकास नको आहे, स्वतंत्र राज्य दिल्याशिवाय आमचे काही भले होणार नाही. या मतावर मी ठाम असल्याचे ते म्हणाले. महाराष्ट्र हे देशातील नंबर एकचे राज्य होते. आज हे राज्य भिकारचोट झाले आहे. राज्यावर प्रचंड मोठ्या कर्जाचा डोंगर उभा झाला आहे. विदर्भाला सिंचनाचे ६० हजार कोटी रुपये अद्याप मिळालेले नाही. याशिवाय अनुशेषाचे १५ हजार कोटी कमी मिळाले. शेतकºयांसाठी ३४ हजार कोटींची छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना जाहीर करण्यात आली. अद्याप १३ कोटी रुपयांचे वाटपच करण्यात आले आहे. उर्वरीत पैसे वाटण्याची सरकारची व्यवस्था नाही. खुल्या बाजारातून हे पैसे उभे करण्यासाठी रिझर्व्ह बॅकेची परवानगी आम्ही घेत असल्याचे मंत्र्यांनी सभागृहात सांगितले. याची टोपी त्यांच्या डोक्यात फसविण्याचा हा प्रकार आहे. ५ लाख ३ हजार ७८ कोटी पेक्षा अधिक रुपयाचे कर्ज राज्याच्या उरावर तयार झाले आहे. ८१ हजार पदे रिक्त पडले आहे. वर्ग ३ आणि ४ चे पदे सरकारने रद्द करून टाकले आहे. अशा महाराष्ट्रात विदर्भाचा विकास होण्याची दुरामात्र शक्यता नाही. त्यामुळे स्वतंत्र विदर्भ राज्य हाच आता पर्याय आहे. यापूर्वी आम्ही डॉ. श्रीनिवास खांदेवाल यांच्या नेतृत्वात दोन वेळा स्वतंत्र विदर्भ राज्याचा अर्थसंकल्प तयार केला. हा अर्थसंकल्प शिलकी स्वरूपाचा आहे. यात शेतकºयांना वीजेत सवलत देण्यात आली. अशी माहितीही त्यांनी दिली.कापूस उत्पादकांना सापत्न वागणूक कापूस पट्ट्यातील मुख्यमंत्री असताना दिली जात आहे. ऊस उत्पादकांना मदत देण्याबद्दल आमचा आक्षेप नाही. मात्र राज्यातील सर्वात मोठे पीक हे कापसाचे आहे. आठ जिल्ह्यांमध्ये केवळ कापसावरच अर्थकारण चालते. असे असताना कापूस उत्पादकांना शासनाकडून अत्यंत दयनीय वागणूक दिली जात आहे.केंद्रीय कृषीमंत्री राधामोहन राव यांनी शेतकरी व्यसनामुळे आत्महत्या करीत आहे. नपूंसक असल्याने तसेच कौटुंबिक कलहातून या आत्महत्या होत असल्याचे त्यांनी लोकसभेत सांगितले. कापूस पट्ट्यात मोठ्या प्रमाणावर आत्महत्या झाल्या आहे. मात्र विदर्भातील एकाही खासदाराने केंद्रीय मंत्र्यांच्या या विधानावर आक्षेप नोंदविला नाही. ऐवढे खासदार पंतप्रधानांना घाबरतात, असेही अ‍ॅड. चटप म्हणाले. कापसाला ७ हजार रूपयांवर हमी भाव मिळतो; परंतु केंद्र सरकारने यावर्षी हमी भावात केवळ १५० रूपयांची वाढ केली आहे. या संदर्भात केंद्रीय किसान समितीने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली. यात आम्ही ५ हजारांपेक्षा जास्त भाव देऊ शकत नाही असे सरकारच्यावतीने न्यायालयात लेखी स्वरूपात सांगण्यात आले अशी माहितीही अ‍ॅड. चटप यांनी दिली.

टॅग्स :Wamanrao Chatapवामनराव चटप