शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
2
अग्नितांडव! दिल्लीतील रुग्णालयाला भीषण आग; एकाचा मृत्यू, काचा फोडून रुग्णांना वाचवलं
3
ओलाची लाली उतरू लागली! ईलेक्ट्रीक मोटरसायकल आणली तरी खरेदीदार मिळेनात, जुलैची विक्री पहाल तर...
4
जगदीप धनखड बेपत्ता? उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा दिल्यापासून संपर्कात नाहीत; विरोधकांनी सरकारला घेरले
5
एका घरात दोनच 'लाडक्या बहिणी', इतरांचा होणार पत्ता कट; सरकारच्या नियमानं महिला धास्तावल्या
6
मायेची सावली! भावासाठी बहीण झाली ढाल; किडनी डोनेट करुन दिलं जीवदान, रक्षाबंधन झालं खास
7
मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीचा लग्नानंतर ६ महिन्यातच मृत्यू; प्रकरणात आला नवा ट्विस्ट
8
ऑपरेशन सिंदूरवेळी एकट्या S-400 ने पाकिस्तानची एवढी विमाने पाडली, हवाईदलप्रमुखांचा मोठा गौप्यस्फोट
9
Salim Pistol: बेकायदेशीर शस्त्रांचा पुरवठा करणाऱ्या 'सलीम पिस्तूल'ला नेपाळमधून अटक!
10
PIB Fact Check: रजिस्टर्ड पोस्ट सेवा बंद करण्यात आलीये का? पाहा व्हायरल दाव्यामागील सत्य
11
टीम इंडियाचा कॅप्टन गिल इथंही टॉपला! क्रिकेटच्या पंढरीत घातलेली जर्सी लिलावात ठरली लाख मोलाची
12
Video - २ रुपयांची राखी १०० रुपयांना; दुकानदाराने सांगितला व्यवसायामागच्या 'चालूगिरी'चा खेळ
13
Monsoon Travel : कुर्ग की मुन्नार; पावसाळी पिकनिकसाठी कोणतं ठिकाण ठरेल बेस्ट?
14
अमेरिका १, सिंगापुर २, नॉर्वे ३... ही यादी पाहून डोनाल्ड ट्रम्प डोकं पकडतील, कोणती आहे यादी? जाणून घ्या
15
मध्यमवर्गीयांना गरिबीच्या खाईत लोटतात या पाच सवयी, त्वरित न बदलल्यास होईल पश्चाताप
16
शरणूसोबत 'मस्साजोग' करायचं होतं; सोबत ट्रिमर, साडी, ब्लाऊज अन् कंडोम होतं, सत्य समजताच पोलीस चक्रावले
17
काश्मीर मुद्द्यावर पाकिस्तानचं पुन्हा रडगाणं; आता म्हणतायत "अमेरिका किंवा इतर कोणत्याही देशाची मध्यस्थी चालेल पण..."  
18
रेल्वेची राऊंड ट्रिप योजना...! तिकिटांवर २० टक्के डिस्काऊंट देणार, अटी एवढ्या की...; एवढे करून मिळाले जरी...
19
ICC नं टीम इंडियाला दिली होती वॉर्निंग; तरीही कोच गंभीर राहिला 'खंबीर', अन्... पडद्यामागची गोष्ट
20
अतूट नातं! १७ वर्षांपासून 'या' अभिनेत्याला राखी बांधतेय ऐश्वर्या राय; प्रेमाने मारते 'अशी' हाक

शासनाची कर्जमाफी नसून कर्जवसुलीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2017 01:00 IST

फडणवीस शासनाने ऐतिहासिक कर्जमाफी जाहीर केल्याचे सांगितले जात आहे. वास्तविकतेत ही कर्जमाफी शेतकऱ्यांची दिशाभुल करणारी आहे.

अजित नवले यांची टीका : सुकाणू समितीचे शेतकरी जनजागरण संमेलनलोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : फडणवीस शासनाने ऐतिहासिक कर्जमाफी जाहीर केल्याचे सांगितले जात आहे. वास्तविकतेत ही कर्जमाफी शेतकऱ्यांची दिशाभुल करणारी आहे. या निर्णयाचा पीक कर्ज घेणाऱ्या केवळ २९.८२ टक्के शेतकऱ्यांनाच लाभ होणार आहे. यामुळे कर्जमाफीच्या निर्णयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नापास झाले असून जाहीर केलेली कर्जमाफी ही कर्जमाफी नसून ती कर्जवसुलीच असल्याची टीका सुकाणू समितीचे राज्य नियंत्रक डॉ. अजित नवले यांनी वर्धेत केली. ते स्थानिक माहेश्वरी भवन येथे सोमवारी शेतकरी सुकाणू समितीच्यावतीने आयोजित शेतकरी जनजागरण संमेलनात बोलत होते.यावेळी व्यासपीठावर अखिल भारतीय किसान सभेचे डॉ. अशोक ढवळे, किशोर ढबाले, गणेश जगताप, श्रीनिवास खांदेवाले, महेश कोपूलवार, कवी ज्ञानेश वाकोडकर, गजेंद्र सुरकार आदींची उपस्थिती होती.डॉ. नवले पुढे म्हणाले, प्रमुख तीन मागण्यांवर एकमत करून सुकाणू समिती तयार झाली आहे. विविध आंदोलनानंतर सुरुवातीला राज्यातील भाजपा सरकार अल्प भुधारक शेतकऱ्यांचे कर्ज माफ करायला तयार होते; परंतु, ते आम्हाला मान्य नव्हते. त्यानंतर सरसकट कर्ज माफीचे आश्वासन मिळाल्याने आम्ही आंदोलन मागे घेतले. यात पुन्हा सरकारने दगाबाजी केली. पाच एकरपेक्षा जास्त भुधारक कोरडवाहू शेतकरी आहेत. ५८ लाख शेतकरी माय-माऊलीचे दागिने गहाण ठेऊन पुन्हा कर्ज मिळेल या आशेने बँकेकडून घेतलेल्या कर्जाची वेळीच परतफेड करतात. त्यांच्या तोंडाला देखील या सरकारने पाने पुसली. वेळोवेळी मुख्यमंत्र्यांकडून शब्द फिरविल्या जात असल्याने सरकारने जाहीर केलेला निर्णय कर्जमाफीचा की कर्जवसुलीचा हेच कळायला मार्ग नाही. चांगले पिकल्यावर सरकारने शेतकऱ्यांना वेठीस धरून लुटले आहे. आम्ही सरसकट कर्जमाफी मागतोय म्हणजे भिक मागत नसून शेतकऱ्यांना लुटून नेलेल्यातील मुठभर मागत आहे. २३ जुलैला पुण्याच्या बैठकीत आंदोलनाची पुढील दिशा निश्चित होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेला शब्द पाळावा. अन्यथा शेतकरी सरसकट कर्जमाफी किंवा सरसकट मुख्यमंत्र्यांची उचलबांगडी करतील. २६ जुलैपर्यंत राज्य सरकारने योग्य निर्णय घ्यावा अन्यथा त्यानंतर महाराष्ट्र पेटेल असा इशाराही यावेळी डॉ. नवले यांनी दिली.डॉ. अशोक ढवळे यांनी शेतकरी आत्महत्येत महाराष्ट्र देशात पहिला क्रमांकावर असून त्यातही महाराष्ट्रात विदर्भ प्रथम आहे. त्याला १९९१ चे शेतकरी विरोधी धोरण कारणीभूत आहे. उत्पादन खर्च वाढला असून त्याच्या तुलनेत सध्या शेतमालाला भाव नाही. ४३९ जाहीर सभा घेऊन निवडणुकीच्या काळात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी स्वामिनाथन आयोगाच्या शिफारसी लागू करू असे आश्वासन दिले होते. परंतु, सत्तेत आल्यावर त्यांनी न्यायालयात हे आम्ही लागू करू शकत नसल्याचे शपथपत्र न्यायालयात सादर केले. हा प्रकार शेतकऱ्यांची फसवणूक करणारा असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला.संमेलनात गोंदिया येथील संजय देवळे, सुभाष काकुस्ते, गणेश जगताप, किशोर ढबाले, ज्ञानेश वाकोडकर, खांदेवाले, महेश कोपूलवार यांनीही विचार मांडले. संचालन नगरसेवक यशवंत झाडे यांनी केले तर आभार गजेंद्र सुरकार यांनी मानले. संमेलनाला सुकाणू समितीचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच शेकडो शेतकरी उपस्थित होते. राष्ट्रगिताने कार्यक्रमाची सांगता झाली.शहरातून काढली दुचाकी रॅलीसंमेलनाच्या पूर्वी सुकाणू समितीच्यावतीने स्थानिक शास्त्री चौक ते बजाज चौकापर्यंत दुचाकी रॅली काढण्यात आली. सदर रॅलीने पावडे नर्सिंग होम, शिवाजी चौक ते बजाज चौक असे मार्गक्रमण केले. शिवाजी चौकात मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करण्यात आले. दुचाकी रॅलीत मोठ्या संख्येने तरुण सहभागी झाले होते.