शहरं
Join us  
Trending Stories
1
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
2
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
3
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
4
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
5
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
6
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
7
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
8
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
9
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
10
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
11
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
12
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
13
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
14
AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!
15
'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
16
भारताच्या शेजारील देश भूकंपाने हादरला; म्यानमारमध्ये ४.० तीव्रतेचा भूकंप, भारतावरही परिणाम?
17
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
18
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही
19
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
20
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ

सायकलसाठी शासकीय दरबारी हेमंतच्या चकरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2018 22:32 IST

शासनाने दिव्यांगांना सन्मानाने जगता यावे याकरिता अर्थसहाय्य देणाऱ्या अनेक योजना कार्यान्वीत केल्या आहेत. या योजना असतानाही दिव्यांगाना त्याचा कवडीचाही लाभ होत नसल्याचे वर्धेत दिसत आहे.

ठळक मुद्देदिव्यांगाची हेळसांड : पोटाची खळगी भरण्यासाठी शिवतो चपला-जोडे

सचिन देवतळे ।लोकमत न्यूज नेटवर्कविरूळ (आकाजी) : शासनाने दिव्यांगांना सन्मानाने जगता यावे याकरिता अर्थसहाय्य देणाऱ्या अनेक योजना कार्यान्वीत केल्या आहेत. या योजना असतानाही दिव्यांगाना त्याचा कवडीचाही लाभ होत नसल्याचे वर्धेत दिसत आहे. याच शासकीय योजनेतून एक तीनइ चाकी सायकल मिळावी याकरिता रसुलाबाद येथील दिव्यांग हेमंत शेगोकार शासकीय कार्यालयाचे उंबरठे झिजवित आहे. पण त्याला कोणाकडूनही मदत मिळत नसल्याचे विदारक वास्तव आहे.हेमंतला वृद्ध आई सतत आजारी असलेली पत्नी व दोन चिमुकली मुलं असा संसाराचा गाढा रेटायचा आहे. संसाराचा हा गाडा चालविण्याकरिता हेमंत हा रोज २० की.मी.चा प्रवास करून तीनचाकी सायकल वर गावोगावी फीरुन चपला व जोडे शिवतो. यातुन मिळणाºया पैशातुन त्याचा उदरनिर्वाह चालतो. वृद्ध आईचा व आजारी असलेल्या पत्नीचा औषधाचा खर्च मुलांचे शिक्षण व पोटाची आग या कमाईतुन तो विझविण्याचा केविलवाणा प्रयत्न करतो. तीन चाकी सायकलवर तो आपले दुकान थाटुन गावोगावी चपला जोडे शिवायचा धंदा करतो. १५ वर्षांपासून त्याचा हा व्यवसाय सुरू आहे. सध्या त्याच्याकडे असलेल्या सायकलची खस्ता हाल झाल्याने त्याला या सायकलवरून प्रवास करणे कठीण झाले आहे. ही सायकल चालविताना त्याला थकवा येतो. यातून चक्कर आल्याने अनेक वेळा तो चक्कर येवून पडल्याचे प्रकार घडले आहेत. याचा त्याच्या व्यवसायावर विपरीत परिणाम होवून त्याच्या कुटुंबियांवर उपासमारीची वेळ आली आहे. यासाठी तो बँटरीवरची सायकल मिळावी म्हणून त्याने दोन वर्षांपूर्वी शासकीय दप्तरी अर्ज केला; परंतु दोन वर्षांपासून अजुनही त्याला बँटरीवर चालणारी सायकल मिळालीच नाही. या मागणीकरिता तो दोन वर्षांपासून शासकीय दप्तरी चकरा मारतो आहे. आमदार खासदारांनाही तो भेटला. पण त्याला कुणाकडूनच मदत मिळाली नाही.जन्मत:च दोन्ही पायांनी अधू असलेल्या हेमंतला चालताच येत नाही. इतरांच्या मदतीने दिवसभराच्या क्रीया पार पाडाव्या लागतात. कुणाची मदत भेटली तर ठीक नाही तर त्याच जागेवर पडुन राहावे लागते. एखाद्या परक्या व्यक्तीला तो सायकलवर बसून मागतो. चक्क २० किमी अंतर काूपन तो संसाराचा गाडा ओढतो. राहायला पडके घर आहे. शासनाच्या योजनेतून नवे घर मिळावे याकरिताही त्याचा संघर्ष सुरूच आहे.हेमंतची अवस्था पाहिल्यावर दिव्यांगाकरिता असलेल्या शासनाच्या योजना कदाचित त्याच्याकरिता नसाव्या असाच प्रयत्य येतो. यामुळे शासनाच्या अधिकाºयांनी गावातील लोकप्रतिनिधींनी हेमंतच्या वेदाना समजून त्याला मदत करून शासनाच्या योजनाचा लाभ मिळवून देण्याकरिता कार्य करण्याची गरज आहे.घरकुलासाठीही धावपळप्रत्येकाना हक्काचे घर मिळावे याकरिता शासनाच्यावतीने पंतप्रधान घरकुलन योजना अंमलात आणली. या योजनेत दारिद्र्य रेषेखाली असलेल्या व्यक्तीला घर देण्याकरिता शासन अनुदानही देत आहे. सर्वच निकषात बसत असलेल्या हेमंतला मात्र या घरकुलाकरिता संघर्ष करावा लागत असल्याचे दिसते.