शहरं
Join us  
Trending Stories
1
Sindhudurg: शिरोडा वेळागर समुद्रात आठ पर्यटक बेपत्ता, तिघांचे मृतदेह सापडले
2
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
3
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
4
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
5
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
6
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
7
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
8
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
9
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
10
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
11
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
12
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
13
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
14
बेडरूममध्ये कॅमेरा बसवून खासगी व्हिडीओ काढले अन् परदेशात...; पत्नीने समोर आलं पतीचे किळसवाणं कृत्य
15
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
16
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!
17
सणासुदीच्या तोंडावर सोन्या-चांदीचे दर घसरले! तुमच्या शहरात आज एका तोळ्याची किंमत किती?
18
POKमध्ये पाकचे अत्याचार, भारताची पहिली प्रतिक्रिया; असीम मुनीर यांचा घेतला खरपूस समाचार
19
'आता संयम ठेवणार नाही; पाकिस्तानला जगाच्या नकाशावरुन मिटवू...', लष्करप्रमुखांचा पाकला थेट इशारा
20
भारीच! महागडे प्रोडक्ट सोडा... गळणाऱ्या केसांवर रामबाण उपाय; एकदा करून बघाच

‘गोनीदां’ची साहित्यसंपदा म्हणजे चमत्कारच

By admin | Updated: December 12, 2015 04:56 IST

गो. नी. दांडेकर हे तटस्थवृत्तीचे व परखड प्रवृत्तीचे भक्त बितुल्य साहित्यिक होते. त्यांचे संघर्षमयी जीवन, प्रत्यक्ष

संजय इंंगळे तिगावकर : गो. नी. दांडेकरांच्या साहित्यकृतींवर चर्चावर्धा : गो. नी. दांडेकर हे तटस्थवृत्तीचे व परखड प्रवृत्तीचे भक्त बितुल्य साहित्यिक होते. त्यांचे संघर्षमयी जीवन, प्रत्यक्ष जीवनानुभवातून साकारलेली आणि सुस्पष्ट विचारांनी प्रेरित असलेली ग्रंथसंपदा म्हणजे एक चमत्कारच आहे. संत गाडगेबाबांच्या प्रत्यक्ष प्रदीर्घ सहवासातून गोनीदांना जीवनोत्कर्षी सेवा भावनेची शिकवण मिळाली. असे विचार येथील विदर्भ साहित्य संघाचे शाखाध्यक्ष संजय इंगळे तिगावकर यांनी व्यक्त केले.स्थानिक सत्यनारायण बजाज सार्वजनिक जिल्हा ग्रंथालयातर्फे स्व. गोपाळ नीलकंठ दांडेकर यांच्या जन्मशताब्दी निमित्त आयोजित अभिवादन कार्यक्रमात ते मुख्य अतिथी म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रंथालयाचे उपाध्यक्ष डॉ. दादासाहेब जासमवार विराजमान होते.प्रा. विकास काळे यांनी ‘सरस्वती स्तवन’ गायिले. याप्रसंगी आवर्जून उपस्थित असलेल्या गोनीदांच्या मेव्हणी वयोवृद्ध मंदा देसाई यांचा सत्कार ग्रंथपाल शीतल देशपांडे यांनी केला. प्रा. सरोज देशमुख यांनी गोनीदांचे आगळे व्यक्तीमत्व व त्यांचा अर्थपूर्ण साहित्यिक कलाकृतींचा माहितीपूर्ण आढावा सादर केला. कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रात गोनीदां लिखित ‘जैत रे जैत’ या राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त चित्रपटातील प्रसिद्ध कवी ना.धो. महानोर यांनी शब्दबद्ध केलेल्या ‘मी रात टाकली व जांभुळ पिकल्या झाडाखाली’ या दोन गाणी आपल्या मधुर स्वरात डॉ. भैरवी काळे यांनी सादर केले. त्यांना की-बोर्डची साथ आदित्य काळे व तबल्याची साथ प्रा. राम वानखेडे यांनी केली. गीतातील सामूहिक स्वर आकाश कांबळे, शैलेश पंचेश्वर, राहुल सावंत, वै. महंतारे यांनी दिला.यानंतर गोनीदांलिखित ‘पूर्र्णामायची लेकरं’ या कादंबरीचे प्रा. सरोज देशमुख यांनी केलेले संक्षिप्तीकरण ‘अभिवाचन’ स्वरूपात व स्थानिक सहयोगी कलावंत या संस्थेतील नाट्य साधकांनी अतिशय सादर केले. त्यात प्रा. राजेश देशपांडे, संतोष चोपडे, अरविंद भोसकर, श्रीकांत रोडे, अश्विनी इंगोले, सुषमा ठाकरे, ममता हरणे, छोटा राम चोपडे, या कलावंताचा सहभाग होता. कार्यक्रमाचे संयोजन प्राचार्य जयंत मादुस्कर यांनी केले. कार्यक्रमाला गोनीदां यांची कुटुंबिय मंडळी व साहित्यप्रेमी रसिकवर्ग प्रामुख्याने उपस्थित होता.(शहर प्रतिनिधी) ‘जैत रे जैत’ची गाणी सादरगोनीदां लिखित ‘जैत रे जैत’ या राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त चित्रपटातील प्रसिद्ध कवी ना.धो. महानोर यांनी शब्दबद्ध केलेल्या ‘मी रात टाकली व जांभुळ पिकल्या झाडाखाली’ या दोन गाणी आपल्या मधुर स्वरात डॉ. भैरवी काळे यांनी सादर केली. सोबतच गोनीदांच्या संघर्षमयी साहित्यकृतींचा आढावा यावेळी मान्यवरांनी घेतला. शहरातील साहित्यप्रेमी यावेळी उपस्थित होते.