वैश्विक पदयात्रेकरूंनी राष्ट्रपित्याला केले अभिवादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 1, 2020 06:00 AM2020-02-01T06:00:00+5:302020-02-01T06:00:12+5:30

गांधीजींनी समाजातील शेवटच्या मानसाचा विचार केला आहे. बापूंनी सुशासन सांगताना स्वशासन या बद्दल जे सांगितले, ते महत्त्वाचे आहे. जो स्वशासनवर निष्ठा ठेवतो आणि वागतो तोच सुशासन निर्माण करू शकतो. त्यामुळे सुशासनची अपेक्षा करायची असेल तर सुरूवात आपल्या पासून करावी लागेल. सत्याकडे पाहण्याचा आपापला दृष्टिकोन आहे.

Global tourists greet the Rashtrapita | वैश्विक पदयात्रेकरूंनी राष्ट्रपित्याला केले अभिवादन

वैश्विक पदयात्रेकरूंनी राष्ट्रपित्याला केले अभिवादन

Next
ठळक मुद्देशांती भवनात समारोप कार्यक्रम : आश्रम प्रतिष्ठानतर्फे यात्रेकरूंचे स्वागत

लोकमत न्यूज नेटवर्क
सेवाग्राम : वैश्विक पदयात्रेचा समारोप येथील शांतीभवन येथे झाला. यात्रेकरुंनी बापुकूटीची माहिती जाणून घेत राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना अभिवादन केले.
गरीबी निर्मूलन, हिंसामुक्ती, समानता व न्याय आणि जल-वायू परिवर्तन हे चार मुद्दे घेऊन बा-बापू यांच्या १५० व्या जयंतीअंतर्गत निघालेली वैश्विक पदयात्रा गांधीजींच्या पुण्यतिथीला नई तालिम समिती परिसरात पोहोचली. आनंद निकेतन विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सर्व पदयात्रेकरूंचे स्वागत करण्यात आले. तसेच सायंकाळी आश्रम परिसरात आश्रम प्रतिष्ठानचे अध्यक्ष टी. आर. एन. प्रभू यांनी यात्रेकरुंचे स्वागत केले. शांतीभवन येथील कार्यक्रमाला एकता परिषदचे संस्थापक डॉ. राजगोपाल, पी. व्ही. बालभाई, मिनाक्षी नटराजन, मिलून कोठारी, रेवा जोशी, निकोलस बार्ला, गौतम राणा आदी हजर होते.

जगात शांती, न्यायाची भावना निर्माण व्हावी : बालभाई
महात्मा गांधी यांच्या जयंतीदिनी दिल्ली येथून निघालेली पदयात्रा गांधींच्या पुण्यतिथीला सेवाग्रामला पोहचली. या यात्रेत ५० नागरिक सहभागी आहे. विश्वशांती यात्रेच्या माध्यमातून गांधीजींचे विचार पोहचविण्याचे काम होत आहे. त्यामुळे आमची जबाबदारी आहे या यात्रेचा भाग होण्याची.यात्रेला जय जगत असेही नाव दिले आहे. आचार्य विनोबा भावे यांनी जय जगतचा नारा दिला. या मागील जी भावना आहे, ती लोकांपर्यंत पोहचली पाहिजे. या यात्रेतून देशातच नव्हे तर जगात शांती, न्यायाची भावना निर्माण व्हावी, असे यावेळी बालभाई यांनी सांगितले.

आजचे सरकार संदूक आणि बंदुकीवर चालत आहे- मीनाक्षी नटराजन
गांधीजींनी समाजातील शेवटच्या मानसाचा विचार केला आहे. बापूंनी सुशासन सांगताना स्वशासन या बद्दल जे सांगितले, ते महत्त्वाचे आहे. जो स्वशासनवर निष्ठा ठेवतो आणि वागतो तोच सुशासन निर्माण करू शकतो. त्यामुळे सुशासनची अपेक्षा करायची असेल तर सुरूवात आपल्या पासून करावी लागेल. सत्याकडे पाहण्याचा आपापला दृष्टिकोन आहे. आजचे सरकार हे संदूक आणि बंदुकीवर चालत आहे. गांधीजींनी बंधुत्व आणि प्रेमाचा संदेश दिला. सध्या हिंसा आणि भयमुक्त वातारण आवश्यक आहे. लोकप्रतिनिधी हे शासक नसून सेवक आहे हे लोकांनी लक्षात ठेवले पाहिजे. चांगल्या वातावरणासाठी गांधीजींच्या अहिंसेचा मार्ग स्विकारला पाहिजे, असे मीनाक्षी नटराजन यांनी सांगितले.

गांधी जयंतीदिनी समारोप
भारतातील पदयात्रेचा समारोप झाला आहे. या यात्रेत ५० व्यक्तींचा समावेश आहे. ११ हजार कि.मी. आणि ३६५ दिवसांची ही यात्रा असून सयुंक्त राष्ट्रसंघात निवेदन देण्यात येणार आहे. जिनेवा या ठिकाणी गांधीजींच्या जयंतीदिनी समारोप होणार आहे. स्पेन मधून निघालेली दुसरी वैशिष्ट्य पदयात्रेत सहभागी पदयात्रेकरूंना भेटण्यासाठी सेवाग्रामला आले आहेत. विशेष म्हणजे या यात्रेत देशातील विविध राज्यातील देवाशीस, मुरली, खशबू चौरसिया, नीरू दिवाकर, मुदीत श्रीवास्तव, आशिमा, जयसिंह जादौन, पार्थ, अजित, सन्नी कुमार, श्रृती तसेच भारत व १४ देशातील मुला-मुली सहभागी झाले आहेत.

Web Title: Global tourists greet the Rashtrapita

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :tourismपर्यटन