शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

वायगावच्या हळदीमुळे जागतिक बाजारपेठ झाली पिवळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2018 11:38 IST

भौगोलिक उपदर्शन जिओग्राफिकल इंडिगेशन चेन्नईच्या सर्वेक्षणात वर्धा जिल्ह्याच्या समुद्रपूर तालुक्यातील वायगाव (हळद्या) येथे पिकणाऱ्या हळदीमध्ये दर्जेदार कर्क्यूमिन हा औषधी घटक ६ टक्के अधिक असल्याचे प्रमाणीत झाले आहे.

ठळक मुद्देमजूर नसल्याने शेती करणे झाले कठीणउत्पादकांना भाव नाही

सुधीर खडसे।लोकमत न्यूज नेटवर्कसमुद्रपूर : हळद हा भारतीय संस्कृतीतील एक मानबिंदू मानला जातो. या औषधीयुक्त बहुगुणी हळदीचे उत्पादन वर्धा जिल्ह्याच्या समुद्रपूर तालुक्यातील वायगाव (हळद्या) येथे होते. भौगोलिक उपदर्शन जिओग्राफिकल इंडिगेशन चेन्नईच्या सर्वेक्षणात वायगाव (हळद्या) शिवारातील जमिनीत पिकणाऱ्या हळदीमध्ये दर्जेदार कर्क्यूमिन हा औषधी घटक ६ टक्के अधिक असल्याचे प्रमाणीत झाले आहे. अनेक पिढ्यांपासून येथील शेतकरी हळदीची लागवड करीत भरघोस पीक घेतात. किंबहुना भारतच नव्हे तर जागतिक बाजारपेठेत येथील हळदीची ख्याती आहे.५ वर्षांपूर्वी सेलम जातीच्या हळदीला पर्याय म्हणून वायगाव हळदीवर डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या उद्यान विद्या शाखेच्या शास्त्रज्ञांनी संशोधन केले. यात इतर जातीच्या तुलनेत वायगाव (हळद्या) येथील हळदीमध्ये कर्क्यूमिनचे प्रमाण अधिक असल्याचे सिद्ध झाले होते. यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मागणी वाढू लागली. या जातीची हळद समजत नसली तरी ग्राहक वायगावचीच हळद द्या, असे दुकानदाराला आवर्जून सांगतात. वायगाव हे ‘ब्रँड’ लोकप्रिय झालेले आहे. या हळदीच्या जातीच्या बियाण्याला खर्च वजा जाता शेतकऱ्यांना ७० ते ७५ हजार रुपये प्रती हेक्टर नफा मिळत असल्याचेही सांगण्यात आले आहे.

हळद पिकावर बँक पीक कर्ज देत नाही. जमीन पाहून कर्ज दिले जाते.- आशिष श्यामराव पाटील, शेतकरी, वायगाव (हळद्या).दिवसेंदिवस मजूर मिळत नसल्याने हळदीची शेती करणे कठीण झाले आहे. या शेतीसाठी यांत्रिकीकरणाचा शोध लावणे गरजेचे झाले आहे.- गणपतराव घुमडे, शेतकरी, वायगाव (हळद्या).हळदीचे उत्पन्न एकरी १ लाख २५ हजार ते दीड लाखांपर्यंत होत असून घरचे बियाणे (बेणे) असल्याने पाणी देणे मशागतीकरिता ३० ते ४० हजारांचा खर्च येतो. यामुळे माझ्या अनेक पिढ्यांपासून हळदीची शेती करतो.- लक्ष्मणराव दळणे, शेतकरी, वायगाव (हळद्या).

हळद उत्पादक उपाशी, व्यापारी तुपाशीएवढी मोठी कोट्यवधीची उलाढाल करणाऱ्या हळदीची समुद्रपूर मार्केट कमिटीमध्ये बाजारपेठ नाही. यामुळे हळदीचे उत्पादन निघाल्यानंतर खरेदी करण्याकरिता व्यापारी, दलाल मोठ्या शहरांतून येऊन हळद उत्पादकाच्या घरी जात पडेल भावात खरेदी करतात व ती शहरात चढ्या भावाने विकतात. त्यापेक्षा समुद्रपूर मार्केट कमिटीने मार्केट यार्डवर हळद उत्पादकाचा माल जमा करून मोठ्या शहरांतील हळद खरेदीदारांना बोलवून लिलाव पद्धतीने विक्री केल्यास हळद उत्पादकांना चांगला भाव मिळू शकतो. हक्काची बाजारपेठही निर्माण होईल. हळद उत्पादनासाठी कठोर परिश्रम, मुबलक पैसा लागतो. मोठ्या प्रमाणात मजूर वर्ग लागतो. काळानुसार मजुरांची टंचाई निर्माण झाली आहे. यामुळे दिवसेंदिवस हळद उत्पादन क्षेत्र कमी होत असल्याचे दिसत आहे. सध्या ३२५ हेक्टरमध्ये हळदीचे पीक या परिसरात घेतले जात आहे.

टॅग्स :agricultureशेती