शहरं
Join us  
Trending Stories
1
मविआचे उमेदवार अजित पवारांच्या पाया पडले, दादा अवघडले; पंगतीला बोलणेही टाळले
2
बस झालं, हार्दिक पांड्याला पूर्वीसारखं महत्त्व देण्याची गरज नाही; इरफान पठाण संतप्त 
3
'डिप्रेशनमध्ये मी तेव्हा आयुष्य संपवून टाकणार होतो'; जो बायडेन यांचा धक्कादायक खुलासा
4
IPL 2024 DC vs MI: मुंबईने टॉस जिंकला! हार्दिकने रिषभच्या मनासारखा निर्णय घेतला, पृथ्वीला विश्रांती
5
अरविंद केजरीवाल यांनी सर्वोच्च न्यायालयात सादर केले ५३ पानी उत्तर, EDच्या आरोपांचा घेतला समाचार
6
' माझी कामं स्वतःच्या प्रचार पुस्तिकेत छापली'; सुप्रिया सुळेंची नक्कल करत अजित पवारांची टीका
7
सिट्रॉएन, महिंद्रानंतर होंडाची बारी; अमेझला 2019 मध्ये 4 स्टार, 2024 मध्ये दोन स्टार
8
T20 WC 2024: हर्षा भोगलेंनी निवडला भारतीय संघ; KL राहुलला वगळलं, नव्या चेहऱ्यांना संधी
9
"शिवरायांच्या गादीविरोधात प्रचार करण्यासाठी मोदी कोल्हापुरात’’, संजय राऊत यांची बोचरी टीका 
10
रत्नागिरी: प्रचार ऐन रंगात आला, अन् ठाकरेंच्या जिल्हा प्रमुखाला तडीपारीची नोटीस
11
FD Vs NSC: नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट की ५ वर्षांची एफडी; ₹२ लाखांच्या गुंतवणूकीवर कुठे जास्त फायदा?
12
ऑनलाइन केक मागवला पण OTP देणे पडले महागात; खाते झाले रिकामे, नेमकं झालं काय?
13
काँग्रेसचा प्रचार यापुढे करणार नाही, नसीम खान यांची घोषणा; मुंबईत काँग्रेसला आणखी एक धक्का!
14
Crypto Investment : लोकांमध्ये पुन्हा Cryptocurrency ची क्रेझ, का वाढतंय आकर्षण?
15
'विशाल पाटलांबाबतची खेळी जयंत पाटलांकडून'; भाजपच्या माजी आमदाराचा खळबजनक दावा
16
एकनाथ शिंदेच जणू! महेश मांजरेकरांच्या 'जुनं फर्निचर' मधील या अभिनेत्याला ओळखलंत का?
17
Vastu Shastra: पाण्याचा माठ, टाकी घराच्या 'या' दिशेला असेल तर; पाण्यासारखा वाया जाईल पैसा!
18
शाहू महाराज एका पक्षाच्या दावणीला बांधले गेले; मोदींच्या सभेपूर्वी राजेश क्षीरसागरांचा हल्लाबोल
19
Tarot Card: केलेल्या मेहनतीचे फळ मिळण्याचा काळ; टॅरो कार्डच्या मदतीने वाचा साप्ताहिक भविष्य!
20
Virat Kohli ने ३ नंबर 'या' फलंदाजासाठी सोडावा, स्वत: चौथ्या क्रमांकावर बॅटिंगला यावं, Harbhajan Singh चा सल्ला

एकरकमी देयक भरणाऱ्या वीज ग्राहकांना दोन टक्के सूट द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 08, 2020 5:00 AM

आदिवासी बांधवांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासन अनेक योजना राबवित आहे. या योजनांचा लाभ खºया लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवावा असे प्रतिपादन ना. प्राजक्त तनपुरे यांनी केले. स्थानिक जिल्हा परिषदेच्या सभागृहात अमरावती आणि नागपूर या दोन्ही विभागातील आदिवासींसाठी राबविण्यात येत असलेल्या योजनांचा आढावा घेतला. २०१९-२० या वर्षात मंजूर नियतव्यय ४० कोटी रुपये होता त्यापैकी ९७ टक्के खर्च झालेला आहे.

ठळक मुद्देप्राजक्त तनपुरे : वीज देयकांसंदर्भात ग्राहकांच्या जाणल्या समस्या, महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना दिल्यात सूचना

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : कोरोना विषाणू प्रादुभार्वाच्या काळात सर्वत्र रोजगार बंद पडले असून सर्वसामान्य माणसाच्या हाताला काम नाही. त्यातच अमाप वीजबिलाची भर पडली आहे. नागरिकांच्या वीज देयकासंदर्भातील समस्या जाणून घेऊन लॉकडाऊनच्या काळातील ३ महिन्याचे वीज देयक टप्प्याटप्प्याने भरण्याची मुभा द्यावी, तसेच एकरकमी देयक भरणाºयांना २ टक्के सूट देण्यात यावी, अशा सूचना राज्याचे नगरविकास, ऊर्जा, उच्च व तंत्रशिक्षण, आदिवासी विकास, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी महावितरणला दिल्यात.जिल्ह्यातील वीज देयकासंदर्भात नागरिकांच्या तक्रारी जाणून घेण्याकरिता शिववैभव सभागृहात बैठक घेण्यात आली. यावेळी महावितरणचे अधीक्षक अभियंता सुरेश वानखेडे, कार्यकारी अभियंता गोतमारे, सुरेश देशमुख, सुनील राऊत, वर्धा एमआयडीसी असोसिएशनचे प्रवीण हिवरे, माजी नगराध्यक्ष शेखर शेंडे उपस्थित होते.या बैठकीमध्ये उद्योगांना होणारा वीज पुरवठा आणि येत असलेल्या अडचणी, वीज देयक, स्थानिक मुलांच्या रोजगाराचा प्रश्न, दुर्गम भागातील आदिवासी मुलांच्या शिक्षण संदर्भातील प्रश्न व जिल्ह्यातील इतर समस्याबाबत निवेदने सादर करण्यात आली. शेतकऱ्यांना दिवसा स्वस्त दरात वीज मिळावी तसेच सर्वसामान्य ग्राहकाला व समाजातील शेवटच्या माणसाला वीज देण्याचे शासनाचे धोरण आहे, असे सांगून कोरोनामुळे लॉकडाऊनच्या काळात मिटर रिडींग घेणे शक्य नव्हते. त्यामुळे नागरिकांना सरासरी वीज देयक पाठविण्यात आले. रीडिंग झाले नसल्यास प्रत्यक्ष रिडींग घेतल्यानंतर वीज देयक कमी करण्यात येईल. महावितरणने सरासरी वीज देयक पाठविले असले तरी नागरिकांकडून सक्तीने वसुली केलेली नाही. कोणत्याही ग्राहकाकडून सक्तीने वसुली केली जाणार नाही असेही, ना. तनपुरे यांनी उपस्थित नागरिकांना सांगितले. वीज देयकासंदर्भात ग्राहकांच्या तक्रारींचे निरसन करण्यासाठी ग्राहक पंचायत घेऊन यामध्ये २ हजार ३०० ग्राहकांच्या समस्या सोडविण्यात आल्यात. तसेच प्रत्येक ग्रामपंचायतला भेट देऊन गावातील नागरिकांच्या तक्रारी तिथेच सोडविण्यावर भर देण्यात येत असल्याचे अधीक्षक अभियंता सुरेश वानखेडे यांनी सांगितले.आदिवासींच्या विकासाच्या योजना खऱ्या लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवाआदिवासी बांधवांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासन अनेक योजना राबवित आहे. या योजनांचा लाभ खºया लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवावा असे प्रतिपादन ना. प्राजक्त तनपुरे यांनी केले. स्थानिक जिल्हा परिषदेच्या सभागृहात अमरावती आणि नागपूर या दोन्ही विभागातील आदिवासींसाठी राबविण्यात येत असलेल्या योजनांचा आढावा घेतला. २०१९-२० या वर्षात मंजूर नियतव्यय ४० कोटी रुपये होता त्यापैकी ९७ टक्के खर्च झालेला आहे. २०२०-२१ साठी ३३ टक्के निधी खर्च करण्यास मान्यता देण्यात आली आहे. या निधीचा उपयोग आदिवासी युवकांना रोजगार निर्मितीसाठी करावा. प्रत्येक विभागाने त्यानुसार नियोजन करावे. कृषी, पशुसंवर्धन, दुग्धविकास यात नाविन्यपूर्ण योजना राबवावी असेही त्यांनी सांगितले. या बैठकीला आदिवासी विकास विभागाचे अमरावतीचे उपायुक्त नितीन तायडे, नागपूर उपायुक्त दीपक हेडाऊ, वर्धा प्रकल्प अधिकारी दिगंबर चव्हाण, उपवन संरक्षक सुनील शर्मा उपस्थित होते.

टॅग्स :electricityवीजmahavitaranमहावितरण