शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
2
आजचे राशीभविष्य,१० नोव्हेंबर २०२५: दुपार नंतर समस्या कमी होऊ लागतील; सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होईल
3
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
4
विशेष लेख: 'हमारी छोरिया छोरो से कम हैं के?'
5
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
6
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
7
तक्रारदारासोबत गैरवर्तन, २ पोलिस अधिकारी निलंबित
8
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
9
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
10
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
11
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
12
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
13
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
14
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
15
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
16
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
17
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
18
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
19
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
20
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?

पुलगाव स्फोटातील मृत जवानांना शहिदाचा दर्जा द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2019 23:12 IST

वर्धा जिल्ह्यातील पुलगाव येथे भारतीय लष्कराच्या दारूगोळा डेपोमध्ये झालेल्या स्फोटात मरण पावलेल्या जवानांना शहिदांचा दर्जा देण्याची मागणी केली होती. या मागणीवर काय कार्यवाही झाली?

ठळक मुद्देरामदास तडस यांची मागणी : रस्ते, सेवाग्रामचा विकास, ड्राय पोर्ट, सिंचन प्रकल्पांवर चर्चा

वर्धा जिल्ह्यातील पुलगाव येथे भारतीय लष्कराच्या दारूगोळा डेपोमध्ये झालेल्या स्फोटात मरण पावलेल्या जवानांना शहिदांचा दर्जा देण्याची मागणी केली होती. या मागणीवर काय कार्यवाही झाली?- वर्धा जिल्ह्यातील पुलगाव येथील लष्कराच्या दारूगोळा डेपोमध्ये काही महिन्यांपूर्वी सलग दोनवेळा स्फोट झाले. यात पहिल्या स्फोटात ६ जण मरण पावले तर दुसऱ्या स्फोटात २० जवानांना प्राण गमवावे लागले. यातील काही जण लष्करांशी संबंधित होते. यात १३ जण अग्निशमन दलाचे जवान होते. या अग्निशमन दलाच्या जवानांना शहिदांचा दर्जा मिळालेला नाही. या जवानांनी केलेल्या शर्थीमुळे मोठी हानी टळली, ही वस्तुस्थिती आहे. या जवानांनी प्राणाची आहुती देऊन या परिसरातील सात ते आठ गावातील लोकांचे जीव वाचविले. या जवानांच्या हौतात्म्याला शहिदाचा दर्जा द्यावा, ही रास्त मागणी सरकारकडे केली आहे. या मागणीसाठी पाठपुरावा सुरू आहे.च्महात्मा गांधी यांच्या वास्तव्याने सेवाग्रामला एक वेगळी ओळख मिळाली आहे. या परिसराच्या विकासासाठी काय केले जाणार आहे?- सेवाग्रामच्या विकासासाठी विकास आराखडा तयार केला आहे. यासाठी २६६ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. बापूकुटीसह सेवाग्राम परिसर विकसित करण्यावर आपला भर राहणार आहे. सेवाग्रामसोबत जवळच असलेल्या पवनारचाही विकास केला जाणार आहे. विनोबा भावे यांच्यामुळे पवनारला वेगळे महत्त्व आहे. सेवाग्राम व पवनार या दोन्ही ठिकाणांचा एकत्रित विकास आराखडा तयार केला आहे. गावागावात महात्मा गांधी यांचे विचार पोहोचविण्यासाठी या तिरंगा यात्रेचा उपयोग होणार आहे.च्विनोबा भावे यांच्यामुळे मिळालेल्या भूदान जमिनीचा प्रश्न आहे.- भूदानात मिळालेल्या जमिनीचा वापर आता बेकायदेशीरपणे होत असल्याच्या तक्रारी मिळाल्या आहेत. तीन लाख हेक्टर जमीन भूदानात मिळाली होती. त्यापैकी एक लाख हेक्टर बेकायदेशीरपणे वापर किंवा विक्री झाली आहे. या प्रकाराची चौकशी व्हावी, ही मागणी केली आहे.च्काही वर्षांपूर्वी सिंदी रेल्वे येथे ड्राय पोर्ट सुरू होणार असल्याची घोषणा झाली होती. या घोषणेचे काय झाले?- ड्राय पोर्टने या भागाचा विकास होण्यास मदत होणार आहे. केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या सहकार्याने ड्राय पोर्ट विकसित केला जाणार आहे. येथे उद्योजक व व्यापाऱ्यांना उत्पादने साठविता येईल. त्यासाठी आवश्यक मूलभूत सुविधा निर्माण केल्या जाणार आहेत. ड्राय पोर्टची आवश्यक प्राथमिक तयारी आता पूर्णत्वास गेली आहे. त्यामुळे या भागातील बेरोजगारीचा प्रश्न सुटण्याची शक्यता आहे. ड्राय पोर्टमुळे अप्रत्यक्ष रोजगारही वाढणार आहे.च्वर्धा जिल्ह्यातील रखडलेले सिंचनाचे प्रकल्प केव्हा पूर्णत्वास जाणार?- गेल्या ३० वर्षांत पूर्ण न झालेले सिंचन प्रकल्प पूर्ण होण्याच्या मार्गावर आहेत. अप्पर वर्धा, लोअर वर्धा हे प्रकल्प पूर्ण झाले आहेत. लोअर वर्धा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर वरुड येथील संत्रा उत्पादकांना पाणी उपलब्ध होणार आहे. आजनसरा हा प्रकल्प कित्येक वर्षांपासून रखडलेला होता. या प्रकल्पाचे काम आता सुरू होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यामुळे विदर्भातील सिंचन प्रकल्पांना गती मिळाली आहे.च्रस्त्यांची कोणती कामे झाली आहेत?- वर्धा जिल्ह्यात आधी केवळ एकच राष्ट्रीय महामार्ग होता. आता या जिल्ह्यात नऊ राष्ट्रीय महामार्ग झाले आहेत.च्वर्धा जिल्ह्यात दारूबंदी असतानाही मोठ्या प्रमाणावर दारूची अवैधपणे विक्री होत आहे. यावर काय उपाययोजना करणार आहात?- पूर्णपणे दारूबंदी करण्यासाठी लोकजागृती करण्याचीच आवश्यकता आहे. शिवाय दारूच्या अवैध विक्रीला आळा घालण्यासाठी प्रत्येक गावात दारूबंदीच्या गटातील महिलांना संरक्षण दिले जाणार आहे.आपण पहेलवान म्हणून प्रसिद्ध आहात. कुस्ती या क्रीडा प्रकारासाठी काय करणार आहात?- हो, विदर्भ केसरीचा चारवेळा किताब मला मिळाला होता. लहानपणापासून कुस्ती खेळण्याची आवड होती. चांगले कुस्तीगीर निर्माण करण्यासाठी देवळीला विशेष स्टेडियम बांधले आहे. येथे नवोदित कुस्तीगीरांना प्रशिक्षणाची सोय केली आहे. कुस्तीसोबत कबड्डीलासुद्धा प्राधान्य देण्याची माझी योजना आहे. यासाठी राज्य सरकारने पाच कोटी रुपयांचा निधीही मंजूर केला आहे. यातून निश्चितच चांगले कुस्तीगीर निर्माण होतील, असा विश्वास वाटतो.

टॅग्स :Blastस्फोटRamdas Tadasरामदास तडस