शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

उन्हाळ्यातील लॉकडाऊन काळात मिळेल मुबलक पाणी; वर्धेकरांसाठी शुभवार्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2020 14:46 IST

गत वर्षी याच प्रकल्पाने उन्हाळ्याच्या सुरूवातीला तळ गाठल्याने वर्धेकरांना भीषण जलसंकटाला तोंड द्यावे लागले होते. यंदाच्या वर्षी या प्रकल्पात सध्यास्थितीत ४५.३६ टक्के जलसाठा असल्याने कोरोनाच्या संकटातही वर्धेकरांना मुबलक पाणी मिळणार आहे.

ठळक मुद्देधामप्रकल्पात ४५.३६ टक्के जलसाठा

लोकमत न्यूजवर्धा: वर्धा शहरातील १७ हजार तर वर्धा शहराशेजारील १८ हजार कुटुंबीयांच्या तृष्णातृप्तीसाठी महाकाळी येथील धाम प्रकल्प उपयुक्त ठरतो. पण, गत वर्षी याच प्रकल्पाने उन्हाळ्याच्या सुरूवातीला तळ गाठल्याने वर्धेकरांना भीषण जलसंकटाला तोंड द्यावे लागले होते. असे असले तरी यंदाच्या वर्षी या प्रकल्पात सध्यास्थितीत ४५.३६ टक्के जलसाठा असल्याने आणि वर्धा पाटबंधारे या उपलब्ध जलसाठ्याचे योग्य नियोजन केल्याने कोरोनाच्या संकटातही वर्धेकरांना मुबलक पाणी मिळणार आहे.प्राप्त माहितीनुसार, पावसाळ्याच्या दिवसात सुरूवातीला पावसाने हुलकावणी दिली. परंतु, नंतर वेळोवेळी झालेल्या पावसामुळे धाम प्रकल्प १०० टक्के भरला. धाम प्रकल्पाची एकूण जीवंत पाणी साठवण क्षमता ५९.४८५ दलघमी आहे. या प्रकल्पाद्वारे ९ हजार ५०० हेक्टरवरील शेतजमिनीला सिंचनासाठी पाणी दिले जाते. आतापर्यंत वर्धा पाटबंधारे विभागाच्यावतीने महाकाळी येथील धाम प्रकल्पातून चार वेळा सिंचनासाठी पाणी सोडण्यात आले आहे. वर्धा पाटबंधारे विभागाच्यावतीने शेतकरी हित लक्षात घेऊन धाम प्रकल्पातून आतापर्यंत एकूण ३२.०२ दलघमी पाणी सिंचनासाठी सोडले आहे. तर प्रत्येक महिन्याला ५ दलघमी पाणी पिण्यासाठी सोडण्यात येणार आहे. एकूणच वर्धा पाटबंधारे विभागाच्या प्रभावी नियोजनामुळे यंदा वर्धा तसेच वर्धा शहराशेजारील गावांमधील नागरिकांना कोरोनाच्या संकटातही उन्हाळ्यात मुबलक पाणी मिळणार आहे.गत वर्षी होता केवळ ६.२४ दलघमी जलसाठागत वर्षी उन्हाळ्याच्या दिवसात वर्धेकरांना भीषण जलसंकटाला सामोरे जावे लागले होते. इतकेच नव्हे तर वर्धा न.प. आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्यावतीने तब्बल आठ दिवसानंतर नागरिकांना पाणी पुरवठा केल्या जात होता. गत वर्षी २४ एप्रिलला धाम प्रकल्पात केवळ ६.२४ दलघमी इतकाच जीवंत जलसाठा होता. तर सध्यास्थितीत महाकाळीच्या धाम प्रकल्पात २६.९८ दलघमी जीवंत जलसाठा आहे.

टॅग्स :Waterपाणी