सेलू : तालुक्यातील काही शेतकऱ्यांनी परंपरागत पिकांना फाटा देत भाजीपाला वर्गीय पिके घेण्यास प्राधान्य दिले आहे़ यातून अनेक शेतकरी चांगले उत्पन्नही घेत आहेत; पण सध्या भेंडी आणि गवार या पिकांना रोगांनी ग्रासले आहे़ या पिकांच्या बचावासाठी कृषी विभागाने शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणे गरजेचे झाले आहे़ भेंडीच्या झाडाला वाकलेल्या रोगीट भेंड्या लागत आहेत तर झाडेही मुळातून उपटून निघत आहे. वातावरणातील बदल व बोचऱ्या थंडीमुळे ही अवस्था झाली असावी, असे मत शेतकरी व्यक्त करीत आहेत़ गवार पिकावर चुरड्याने आक्रमण केले असून गवाराच्या शेंगा रोगग्रस्त झाल्या आहेत़ सध्या गवार व भेंडीला बाजारात चांगला भाव आहे़ यात एकाएकी हाती आलेले पीक रोगाच्या दुष्टचक्रात अडकल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे़ पिकाबरोबर मेहनत व हिरवी स्वप्नेही करपण्याची शक्यता असल्याने मार्गदर्शन करणे गरजेचे झाले आहे़(तालुका प्रतिनिधी)
भेंडी, गवार पिकावरही रोगाचे सावट
By admin | Updated: January 8, 2015 22:59 IST