शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

गांधी स्मारक ट्रस्टला देशभरातील गांधीवाद्यांचा कडवा विरोध, साबरमती आश्रमात यात्रेचा समारोप, सरकारविरोधातील एकजूट

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2021 08:46 IST

Sabarmati Ashram : साबरमती आश्रम हे देशासाठी श्रद्धा व प्रेरणास्थान आहे. याच ठिकाणी राहून गांधीजींनी आपल्या कार्याला सुरुवात केली होती. ही राष्ट्रीय धरोवर आणि इतिहास पुसून काढण्याचे काम केंद्र सरकारच्या १ हजार २०० कोटी निधीच्या माध्यमातून होणार आहे.

सेवाग्राम (जि. वर्धा) : सेवाग्राम ते साबरमती आश्रम या  संदेशयात्रेचा रविवारी गुजरात विद्यापीठात सभा घेऊन समारोप करण्यात आला. संकल्प आणि साबरमती आश्रमातील गांधीजींच्या हृदयकुंज निवासस्थानासमोर सर्वधर्मप्रार्थनेने सांगता करण्यात आली.  यात गुजरातच्या मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली साबरमती आश्रम स्मारक ट्रस्टच्या कार्याला विरोध दर्शवून देशभर केंद्र व गुजरात सरकारच्या आश्रमातील हस्तक्षेपाला आणि विकास योजनांना विरोध करण्याचा निर्णय देशभरातील गांधीवादी नेते, कार्यकर्त्यांनी समारोपप्रसंगी जाहीर केला.

साबरमती आश्रम हे देशासाठी श्रद्धा व प्रेरणास्थान आहे. याच ठिकाणी राहून गांधीजींनी आपल्या कार्याला सुरुवात केली होती. ही राष्ट्रीय धरोवर आणि इतिहास पुसून काढण्याचे काम केंद्र सरकारच्या १ हजार २०० कोटी निधीच्या माध्यमातून होणार आहे. याच परिसरात आधुनिकीकरण करण्यात येणार असल्याने पर्यटनाचा विचार अधिक असल्याने गांधी विचारांनाच धक्का लावण्याचे काम होणार याची पूर्ण शाश्वती गांधीवाद्यांना असल्याने लोकांमध्ये याची माहिती पोहोेचावी, या उद्देशाने सेवाग्राम आश्रमातून १७ ऑक्टोबर रोजी संदेशयात्रा रवाना झाली होती.

महाराष्ट्रातील तसेच गुजरात राज्यात ठिकठिकाणी सभा तसेच लोकांशी संवाद साधून यात्रेचा उद्देश समजावून सांगितला.सरकारला सद्बुद्धी प्राप्त होवो. सरकारच्या योजनेला जनमानसातून विरोध झाला पाहिजे, अशीच भावना सहभागी तसेच संवादातून दिसून आलेली आहे. यात्रेचा समारोप झाला असला तरी केंद्र व गुजरात सरकारचा विरोध गांधीवादी देशभर करतील,   असे यात्रा संयोजक दिल्लीचे संजय सिंह यांनी पत्रकातून कळविले आहे. १४ राज्यांतील कुमार प्रशांत, प्रकाश शाह, उत्तम परमार, रामचंद्र राही, राजेंद्रसिंह राणा, आशा बोथ्रा, चंदन पाल, सवाई सिंह, डॉ. बिस्वजित, अशोक भारत, शैख हुसैन, अरविंद कुशवाह, टी.आर.एन. प्रभू, डॉ. सुगन बरंठ, पी.व्ही. राजगोपाल, अजमत उल्ला खान, चिन्मय मिश्रा, मनोज ठाकरे, भूपेश धीरण, राम धीरण यासह अहमदाबाद येथील सहयोगी  सहभागी होते.

टॅग्स :Mahatma Gandhiमहात्मा गांधी