शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या मुंबईतील बैठकीला भाजप कार्यकर्त्यालाच पाठविले? फोटो समोर आल्याने उडाली खळबळ...
2
पाकिस्तानला मोठा झटका देण्याच्या तयारीत अफगाणिस्तान, करणार तगडा प्रहार; भारतही देणार साथ!
3
'काँग्रेसमुळे जम्मू-काश्मीरचा एक भाग पाकिस्तानात गेला', पंतप्रधान मोदींचा घणाघात...
4
दरमहा लाखोंची कमाई; तरीही महिन्याच्या शेवटी खर्चाला पैसे उरत नाही? आर्थिक तज्ञांनी सांगितलं खरं कारण
5
लिव्ह-इन पार्टनरच्या सांगण्यावरून रुग्णालयातून बाळ चोरलं, पण परत येताना रस्ताच विसरली! आणखी एक चूक केली अन्...
6
"रोहित आर्यने जो मार्ग स्वीकारला तो चुकीचा, पण..." काँग्रेसचे उपस्थित केले गंभीर प्रश्न
7
"मी मालिकेत येईन पण...", शिल्पा शिंदे 'भाभीजी घर पर है'मध्ये कमबॅक करणार? दिली प्रतिक्रिया
8
Mumbai Local Train Update: वांगणी-शेलू स्थानकादरम्यान मालगाडीच्या इंजिनात बिघाड; CSMT कडे जाणारी लोकलसेवा ठप्प
9
World Cup 2025 FINAL: टीम इंडियाला नडू शकते आफ्रिकन कर्णधार लॉरा वोल्वार्ड, जाणून घ्या रेकॉर्ड
10
भयानक! 'तो' वाद टोकाला गेला! बायकोने फेसबुक वापरल्याने नवरा संतापला, थेट जीवच घेतला
11
५ वर्षांसाठी ₹१० लाखांचं कार लोन घेतल्यास कोणत्या बँकेत किती पडेल EMI? पाहा संपूर्ण गणित
12
७-८ नव्हे तर 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' सिनेमा बनवण्यासाठी लागले तब्बल 'इतके' कोटी; महेश मांजरेकर म्हणाले- "बजेट वाढलं कारण..."
13
पृथ्वीच्या 'महाविनाशा'चा धोका टळला? शास्त्रज्ञांचा नवीन अभ्यास समोर आला...
14
सोने महागले! मागणी १६% ने घटली; लोक आता ज्वेलरीपेक्षा 'या' फॉर्ममध्ये करतायेत मोठी गुंतवणूक
15
जेमिमा रॉड्रीग्ज, गौतम गंभीर अन् माखलेली जर्सी... १४ वर्षांपूर्वीचा भारताचा 'विजयी' योगायोग
16
नोव्हेंबरमध्ये जन्मलेल्या व्यक्ती म्हणजे प्रेमाचा सागर, पण पोटात ज्वालामुखी; वाचा गुण दोष!
17
Rakhi Sawant : "मी दोन्ही किडन्या विकल्या, सलमानसाठी सोन्याची अंगठी घेतली"; राखी सावंतचा धक्कादायक दावा
18
सौदी अरेबियाने घेतला मोठा निर्णय! लाखों भारतीय मुस्लिमांवर होणार थेट परिणाम; नेमकं प्रकरण काय?
19
ट्रम्पना ठेंगा! भारतात परत येतेय 'ही' ऑटो कंपनी; ४ वर्षांपूर्वी बंद केलेली फॅक्ट्री परत होणार सुरू
20
वेगाची राणी...! महाराष्ट्राची लेक, डायना पंडोले इतिहास रचणार; फेरारी क्लब चॅलेंजमध्ये भाग घेणारी पहिली भारतीय महिला रेसर

गांधीवादी कार्यकर्ते जयवंत मठकर यांचे पुण्यात निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2022 13:06 IST

गांधीवादी कार्यकर्ते व सेवाग्राम आश्रमचे माजी अध्यक्ष जयवंत मठकर यांचे वयाच्या ८५ व्या वर्षी निधन झाले. ते गेल्या दोन महिन्यांपासून आजारी होते.

सेवाग्राम (वर्धा) : गांधी, विनोबा, जयप्रकाश यांच्या विचारांचे पाईक असलेले सर्वोदयी आणि विविध संस्थांच्या माध्यमातून भारतभर सतत कार्यरत असणारे सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठानचे माजी अध्यक्ष जयवंत गंगाराम मठकर यांचे वयाच्या ८५  व्या वर्षी निधन झाले. ते गेल्या दोन महिन्यांपासून आजारी होते. सोमवारी पुण्यात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पुण्यात मंगळवारला सकाळी अंतसंस्कार पार पडला.

गांधी, विनोबा आणि जयप्रकाश यांची विचारसरणी आणि सर्वोदयाचा विचार घेऊन आयुष्यभर त्यांनी काम केले. साने गुरूजी, कथामाला, राष्ट्रसेवा दल, सर्व सेवा संघ, सर्वोदय मंडळ, खादी ग्रामोद्योग मध्यवर्ती संघ, महात्मा गांधी लोकसेवा संघ, महाराष्ट्र सेवा संघ, महाराष्ट्र ग्रामदान मंडळाचे अध्यक्ष, सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठान इ.संस्थेत त्यांनी विविध पदांवर कार्य केले.

जयवंत मठकरांचा जीवनप्रवास

जयवंत मठकर हे मुळचे रत्नागिरी जिल्ह्यातील मठ या गावचे. त्यांचा जीवनप्रवास हा खडतर असाच राहिला आहे. मठकर यांचा परिचय सर्वोदय जगतात "काका"म्हणूनच सदैव राहिला आहे. त्यांचे विचार व कार्याची छाप याचा प्रत्यक्ष अनुभव सेवाग्रामसह वर्धा येथील अनेक संस्थानी, लोकांनी अनुभवला आहे. माणसे जोडणे, युवकांना सक्रिय करणे, जबाबदारी देणे यामधून ते सर्वांमध्ये लोकप्रिय बनले होते.

त्यांचा पाच वर्षांचा काळ हा आश्रम वासियांसाठी तसेच सेवाग्राम वासियांसाठी अत्यंत महत्त्वाचा व स्मरणीय असाच राहिला आहे. त्यांनी कापूस ते कापड हा उपक्रम सुरू केला. यातून आश्रमातच खादीला चालना दिली. पर्यटकही सूतकताई व विनाई पाहून गांधीजींच्या काळातील खादीचे काम प्रत्यक्ष पाहता येऊ लागले. सेवाग्राम येथील दारूबंदी महिलांना सक्रिय करणे, सर्वोपरी मदत करीत असल्याने दारूविक्रेत्यांवर नियंत्रण आले होते.

सर्वोदय समाज संमेलन घेण्यात त्यांचा विशेष पुढाकार होता. गांधीजींचे नातू प्रा.जगमोहन गांधी व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू अॅड. प्रकाश आंबेडकर यांना एकाच विचार पिठावर आश्रमात आणून गांधी-आंबेडकर वाद हा कधीच नव्हता तर ती वैचारिक लढाई होती हे त्यांनी दाखवून दिले.

सेवाग्राम आश्रमातील कार्यकर्त्यांशी त्यांचा संबंध प्रेमवत आणि पारिवारिक असाच राहिला आहे. कार्यकर्त्यांना नेहमीच ते मान सन्मान देत, आस्थेने चौकशी करीत असे. त्यांच्या निधनाने एक सक्रिय कार्यकर्ता गमावला आहे. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुली, जावई, एक मुलगा, सून, नातवंडे आणि मोठा आप्तपरिवार आहे.

टॅग्स :Deathमृत्यूSewagramसेवाग्रामwardha-acवर्धाsocial workerसमाजसेवक