शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रशासकराज संपणार : १५ जानेवारीला मतदान, तर १६ जानेवारीला निकाल! महापालिकांचा महासंग्राम
2
आजचे राशीभविष्य, १६ डिसेंबर २०२५: सरकारी कामात यश, अचानक धनलाभ; सुखाचा दिवस
3
पाकिस्तानमध्ये शिजला पहलगाम हल्ल्याचा कट, सहा जणांविरोधात १,५९७ पानांचे आरोपपत्र!
4
इंडिगो गोंधळाबाबतच्या याचिकेवर सुनावणी घेण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार; दिल्ली उच्च न्यायालयात दाद मागण्याचे आदेश
5
एक कोटी मतदार बजावणार हक्क; मुंबई महापालिका निवडणूक : एक लाख दुबार मतदार तपासणीत वगळले जाण्याची शक्यता
6
ऑर्डर कॅन्सल करण्याच्या कारणावरून वाद; डिलिव्हरी बॉयचा मित्रावर चाकूहल्ला
7
संपादकीय : यत्र, तत्र, पाकिस्तान सर्वत्र! ऑस्ट्रेलियातील हल्ल्याचे पाकिस्तानी कनेक्शन
8
...जेव्हा गुंडच पोलिसांच्या कॉलरला हात घालतात; कांदिवलीत ५ अटकेत
9
सर्वोच्च न्यायालयाचा सल्ला-उत्तर कमी, गुंता अधिक! न्यायालयीन सल्ल्यामुळे राजकीय अनिश्चितता वाढली
10
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
11
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
12
भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई
13
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
14
कुख्यात गँगस्टर सुभाषसिंह ठाकूरचा ताबा मिरा भाईंदर पोलिसांकडे; मंगळवारी कोर्टात हजर करणार
15
कोंबड्यांचा व्यवसायाआड चालणारा अमली पदार्थांचा कारखाना पोलिसांकडून उद्ध्वस्त, ११ अटकेत
16
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
17
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
18
बालविवाह थांबवला..! नवरदेव लग्न मंडपात जाणार होता, पण त्यापूर्वीच दामिनी पथकाची धडक अन्...
19
डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
20
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

गांधी जयंतीदिनी दक्षिण आफ्रिकेतही पदयात्रा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2018 09:36 IST

यंदा गांधीजींची १५० वी जयंती तर डॉ. नेल्सन मंडेला यांचे जन्मशताब्दी वर्ष आहे. पू. बापूंची कर्मभूमी दक्षिण आफ्रिका असल्याने गांधी -नेल्सन मंडेला समता यात्रेचे आयोजन दक्षिण आफ्रिकेत गांधी जयंतीपासून करण्यात आले आहे.

ठळक मुद्देसेवाग्रामचे अनुयायी सहभागी गांधी-नेल्सन मंडेला यांच्या कार्याची महती सांगणार

दिलीप चव्हाण।लोकमत न्यूज नेटवर्कसेवाग्राम : महात्मा गांधींनी आपल्या कार्याची सुरूवात दक्षिण आफ्रिकेतील फिनिक्स आश्रमची स्थापना करून केली. गांधीजींनी जे कार्य केले तोच वारसा डॉ. नेल्सन मंडेला यांनी पुढे चालविला. या दोन्ही महापुरूषांचे कार्य शांती, अहिंसा आणि समतेच्या मार्गाने समतेसाठी होते.यंदा गांधीजींची १५० वी जयंती तर डॉ. नेल्सन मंडेला यांचे जन्मशताब्दी वर्ष आहे. पू. बापूंची कर्मभूमी दक्षिण आफ्रिका असल्याने गांधी -नेल्सन मंडेला समता यात्रेचे आयोजन दक्षिण आफ्रिकेत गांधी जयंतीपासून करण्यात आले आहे. या यात्रेला मंडेला गांधी शांती पदयात्रा असे नाव दिलेले आहे. ही यात्रा फिनिक्स आश्रमपासून निघून डॉ. नेल्सन मंडेला यांच्या निवासस्थानी समारोप होईल. ही यात्रा जवळपास दोन महिने चालणार असून ११०० कि़मी.ची ही पदयात्रा राहणार आहे.या यात्रेत सेवाग्राम आश्रमचे जालंधरनाथ चन्नोले सहभागी असून त्यांच्या सोबत योगेशभाई माथुरिया (पुणे), दिलीप तांबोळकर (पुणे), साक्षी माथुरीया (पुणे) आणि संग्राम पाटील (सातारा) याचा पण समावेश आहे.दक्षिण आफ्रिकेतील गांधी मेमोरियल कमिटी आणि नेल्सन मंडेला जन्म शताब्दी वर्ष समिती यांच्यावतीने या पदयात्रेचे आयोजन करण्यात आले असल्याचे पत्र डेव्हीड गेंगण यांनी पाठविले. तसेच गांधीजींच्या नातीन ईला भट्टाचार्य यांनी पण यात्रेसाठी पुढाकार घेतल्याची माहिती मिळाली आहे. याबाबत लोकमतशी बोलताना जालंधरनाथ म्हणाले की, महात्मा गांधीजींनी आपल्या सार्वजनिक जीवनाची सुरूवात दक्षिण आफ्रिकेमधून केली. तेथील भारतीय लोकांचा आवाज उठविण्यासाठी इंडियन ओपिनियन या पत्रिकेचे संपादन केले.शोषणमुक्त अहिंसक, स्वावलंबन हेच स्वराज्य हे जीवन जगण्यासाठी डरबन व जोहान्सबर्ग हे मोठे शहर सोडून फिनिक्स या छोट्या गावामध्ये आश्रमची सुरूवात केली. गांधीजींची १५० वी जयंती वर्ष २०१९ ला आहे.च्चारही पदयात्री २१ सप्टेंबर रोजी पुण्यावरून मुंबईकडे पायदळ निघाले आहे.२९ रोजी मुंबईवरून जोहान्सबर्र्गसाठी रवाना होतील. २ आॅक्टोबर रोजी फिनिक्स आश्रम (जोहान्सबर्ग) वरून पदयात्रेला प्रारंभ होईल. आणि समारोप डॉ. नेल्सन मंडेला यांच्या निवासस्थानी २० नोव्हेंबरला होणार महात्मा गांधीजींच्या ऐतिहासिक स्थळांना पदयात्रेदरम्यान भेटी देण्यात येणार आहे. या पदयात्रेला विश्व पदयात्रेचे स्वरूप पुढे देण्यात येणार असून आफ्रिकेनंतर बांग्लादेश, जपान, अमेरिका व नेपाळ या देशात अशीच यात्रा काढण्यात येणार आहे.संपूर्ण जगाला दक्षिण आफ्रिकेतील गांधीजींच्या कार्याची ओळख व्हावी. त्यांचे महत्व सामान्य जनतेपर्यंत पोहचविण्याकरिता गांधी १५० शांती पदयात्रेची सुरूवात दक्षिण आफ्रिकेतून करण्याच ठरविले. त्यांचा वारसा डॉ. नेल्सन मंडेला यांनी पुढे नेला. मानवी हक्क व रंगेभेदावर अहिंसक मार्गाने प्रभावी आंदोलन केले. त्याचे जन्मशताब्दी वर्ष आहे. त्यांच्या कार्याला स्मरण गांधी नेल्सन मंडेला समता शांती यात्रा असे या यात्रेचे स्वरूप असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Mahatma Gandhiमहात्मा गांधी