शहरं
Join us  
Trending Stories
1
एखाद्याला खूश करण्यासाठी मुलांचे भविष्य खराब करू नका, हिंदी सक्तीवरून सुप्रिया सुळे भडकल्या!
2
Shefali Jariwala Death: शेफाली जरीवालाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीमुळे संशय वाढला
3
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, आज 'या' राशीतील लोकांनी आरोग्याची काळजी घेणे आवश्यक
4
"मला फक्त ५ मिनिटे आधी कळालं..."; अमेरिकेचे उपराष्ट्रपती जेडी वेंसच्या पत्नी उषा यांचा खुलासा
5
झटपट पैसे कमावण्यासाठी पती-पत्नीने सुरू केला असा धंदा, अश्लील चॅट, व्हिडीओ आणि...
6
Shefali Jariwali Death: "बिग बॉस शापित आहे", शेफाली जरीवालाच्या निधनानंतर अभिनेत्रीची पोस्ट
7
Philippines Earthquake: फिलीपिन्समध्ये ६.० तीव्रतेचा भूकंप, नागरिकांमध्ये घबराट!
8
आता मोबाइल ॲपद्वारे कुठूनही करता येणार मतदान; कोणत्या मतदारांना मिळणार अधिकार?
9
Shefali Jariwala: शेफाली जरीवालाच्या शेवटच्या एक्स पोस्टमध्ये 'या' व्यक्तीच्या नावाचा उल्लेख!
10
भारतासोबत ‘खूप मोठा’ व्यापार करार; डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली माहिती, भारताला कोणती चिंता?
11
Maharashtra Politics: हिंदीवरून महायुतीत गोंधळ, महाविकास आघाडीमध्ये ऐक्य
12
तरुण जोडप्यांना मुलांची आस, पण तरीही का घसरतोय देशाचा प्रजनन दर?
13
नग्न फोटो काढले; भयग्रस्त विद्यार्थिनीने जेवण सोडले; बीडमध्ये २ शिक्षकांकडून १० महिन्यांपासून लैंगिक छळ
14
आपले पूर्वज तरी कोण? कोणाशी जुळतो डीएनए? एम्स व कॅलिफोर्नियाच्या शास्त्रज्ञांचा महत्त्वपूर्ण शोध
15
भाजप प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण, १ जुलैला घोषणा; किरण रिजिजू निरीक्षक
16
विशेष लेख: इंदिरा गांधी यांच्या जागी दुसरे कुणी असते तरीही...
17
जुलैमध्ये १३ दिवस बँका राहणार बंद; राज्यनिहाय वेगळ्या सुट्ट्या, महाराष्ट्रात किती दिवस राहणार बंद?
18
मनोमीलनाआधी ‘मोर्चा’मीलन; हिंदी विरोधी मोर्चात राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र
19
अग्रलेख: अंतराळात भारतीय शुभकिरण! भारताचे स्वप्न पूर्ण होण्याचा क्षण
20
लेख: तुमच्या घरातला एसी आता ‘फार’ थंड नाही होणार!

उत्तम आरोग्यासाठी खेळ महत्त्वाचा

By admin | Updated: October 15, 2015 02:33 IST

डॉ. सुशीला नायर यांनी आरोग्य सेवेचे व्रत घेतले होते. उत्तम आरोग्यासाठी खेळ हा महत्वाचा असला तरी मानसिक व सामाजिक आरोग्य ...

बी.एस. गर्ग : महात्मा गांधी आयुर्विज्ञान संस्थेत क्रीडा स्पर्धासेवाग्राम : डॉ. सुशीला नायर यांनी आरोग्य सेवेचे व्रत घेतले होते. उत्तम आरोग्यासाठी खेळ हा महत्वाचा असला तरी मानसिक व सामाजिक आरोग्य उत्तम राखण्याचे कामही खेळाद्वारे साध्य होते. खेळताना खेळाडू वृत्ती जोपासून खेळण्याचे आवाहन महात्मा गांधी आयुर्विज्ञान संस्थेचे सचिव डॉ. बी. एस. गर्ग यांनी केले. महात्मा गांधी आरोग्य संस्थेच्या मैदानावर बुधवारपासून महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठांतर्गत आंतर विभागीय निवड चाचणी स्पर्धा सुरू करण्यात आली. यावेळी अध्यक्षीय भाषणातून ते बोलत होते. यावेळी अतिथी म्हणून अधिष्ठाता डॉ. के. आर. पातोंड, डॉ. मनीष जैन, डॉ. सतीश शर्मा व क्रीडा शिक्षक गिरीष भोवरे उपस्थित होते. सर्वप्रथम डॉ. सुशिला नायर यांच्या प्रतिमेला मान्यवरांनी सूतमाळ अर्पण केली. डॉ. पातोंड यावेळी म्हणाले, खेळांच्या या महाकुंभात सहभागी झालेले सहा विभागाचे खेळाडू विविध खेळात आपल्या खेळांचे प्रदर्शन करणार आहे. या सर्वांनी राष्ट्रीय स्तरावर विद्यापीठाचा नावलौकीक वाढवावा तसेच खेळात खेळाडूपणा जोपासावा असे ते म्हणाले. मैदानावर म.गा.आ.वि. संस्थेच्या वैद्यकीय महाविद्यालयाचा खेळाडू निखिल दारोडे याने क्रीडा ज्योत डॉ. बी. एस. गर्ग यांनी दिली. कस्तुरबा विद्या मंदिरच्या बँडपथकावर मार्च पथ झाल्यानंतर निखिल दारोडेने सर्व खेळाडूंना शपथविधी दिला. ध्वजारोहण डॉ. बी.एस. गर्ग यांच्या हस्ते झाले. विभागीय प्रमुख, मार्गदर्शक पंच आदींचा असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी स्मृतिचिन्ह देऊन सत्कार केला. विदर्भ, पुणे, कोल्हापूर, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा व मुंबई आदी विभागीय संस्थेचे ७५० खेळाडू या स्पर्धेत सहभागी झाले आहेत. यात कबड्डी, खो-खो, व्हॉलीबॉल, बास्केट बॉल आदी मैदानी खेळांचा समावेश होता. स्वागतपर भाषण डॉ. सतीश शर्मा यांनी केले. संचालन डॉ. शर्मा यांनी केले. आभार डॉ. मनीष जैन यांनी मानले. इतरही मान्यवर यावेळी उपस्थित होते.(वार्ताहर)