शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

२५ हजार लोकसंख्येच्या आरोग्याशी खेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2018 23:40 IST

शहरातील २५ हजार नागरिकांना गेल्या दहा दिवसापासून दुर्गंधीयुक्त पिवळया पाण्याचा पुरवठा होत असल्यामुळे साथीच्या आजारांनी तोंड वर काढले आहे. विशेष म्हणजे सहा किलोमीटर ममदापूर तलावातून जलशुद्धीकरण केंद्रावर पाणी पोहचल्यावर तेथे शुद्ध होतच नाही.

ठळक मुद्देदुर्गंधीयुक्त पिवळ्या पाण्याचा पुरवठा : ममदापूर तलावातून दुर्गंधीयुक्त पाणी जलशुद्धीकरण केंद्रात

लोकमत न्यूज नेटवर्कआष्टी (शहीद) : शहरातील २५ हजार नागरिकांना गेल्या दहा दिवसापासून दुर्गंधीयुक्त पिवळया पाण्याचा पुरवठा होत असल्यामुळे साथीच्या आजारांनी तोंड वर काढले आहे. विशेष म्हणजे सहा किलोमीटर ममदापूर तलावातून जलशुद्धीकरण केंद्रावर पाणी पोहचल्यावर तेथे शुद्ध होतच नाही. त्यामुळे शासनाला लुटणारी यंत्रणा नियंत्रणात आणण्यासाठी वरिष्ठांनी व लोकप्रतिनिधींनी दखल घेण्याची मागणी आष्टी वासियांनी केली आहे.आष्टी नगरपंचायत हद्दीमधील एकूण १७ वॉर्डांना ममदापूर तलावामधुन पाणी आणून जलशुद्धीकरण केंद्रावरुन नळाद्वारे पाणी पुरवठा करण्यात येतो. जलशुद्धीकरण केंद्र आजारी पडले आहे. येथे शुद्ध होणाऱ्या पाण्याची पाहणी केली असता धक्कादायक माहिती पुढे आली. आहे. तलावातून लाल माती मिश्रित आलेले पाणी येथे शुद्ध होत नाही. ब्लिचींग पावडर व तुरटीचा वापर करुनही पाणी पिवळेच आहे. पाईपांना भलामोठा गंज चढला आहे. गेल्या अनेक वर्षापासून जलशुद्धीकरण केंद्राचे पाईप बदलविण्यात आले नाही. आष्टी पोलीस ठाण्याच्या मागील उंच टेकडीवर सदर केंद्र आहे येथे कोणीही फिरकून पाहत नाही. त्यामुळे महिन्याला देखभाल केल्या जात नाही. गोल रिंगण सिमेंट क्रॉक्रीटचे बनविले त्याठिकाणी शेवाळ प्रचंड साचली आहे. गेल्या दोन वर्षापासून एकदाही ड्राय करुन अळया नष्ट केल्या नाही एवढी भयंकर अवस्था आहे.ममदापूर तलावाची प्रत्यक्ष पाहणी केली असता तेथे गायी-म्हशी चारण्यासाठी गुराखी उन्हाळाभर जनावरांना तलावात बसायला सोडत होते. अनेक जनावर मृत्यु पावली ती याच पाण्यात पडून मेलीत. पशु पक्षी, रोही, डुक्कर यासारखे जंगली प्राणी येथे मेले. त्याचे मास पाण्यात कुजले. त्यामुळे पाण्याला प्रचंड वास येत आहे. तेच पाणी थेट जलशुद्धीकरण केंद्रात सोडण्यात येते. ममदापूर तलावात माती जास्त प्रमाणात आहे. गाळ काढण्याचे काम हाती घेतल्या जात नाही.तलावात रेती टाकल्या जात नाही. पाणी सोडण्याचे युनिट दुर्लक्षित आहे. येथे कोणीही येवून पाण्यात काही टाकले तर काहीच सुरक्षा नाही.ममदापूर तलाव व जलशुद्धीकरण केंद्र या दोन्हीच्या देखभाल व संरक्षणाची जबाबदारी नगरपंचायतीची आहे. मात्र त्यांचे दुर्लक्ष होत आहे. आष्टी, शहरामधून दरवर्षी लोकांकडून ४० लक्ष रुपये पाणीपट्टी कर गोळा होते. त्यामधून सर्व देखभाल केल्या जाते. पाणीकराच्या उत्पन्नातील ४० टक्केही निधी खर्च होत नसल्याच्या भावना नागरिकांनी व्यक्त केल्या आहे. दरवर्षी पावसाळ्यात पाणी पुरवठ्याचा प्रश्न ऐरणीवर येतो. पाणी पिवळे आले एवढी ओरड नागरिक करतात. प्रत्यक्षात वस्तुस्थिती फारच वाईट आहे. आष्टी नगरपंचायतची स्वच्छ पाणी देण्याची जबाबदारी आहे. पदाधिकाऱ्यांनी याची दखल घेवून दुर्गधीयुक्त पाण्याला आळा घालावा. स्वच्छ पाणी देण्यासाठी जलशुद्धीकरण केंद्राला वरचेवर भेटी देवून स्वच्छ झाले की नाही याची पाहणी करावी, तुरटी व ब्लिचींग पाण्यात टाकण्याच्या सुचना द्याव्यात. ममदापूर तलावातील पाण्यात रेती टाकून स्वच्छता राखावी, जनावरांना पाण्यात बसु देव नये अशी मागणी नागरिकांनी केली आहे. सामाजिक कार्य करणाऱ्यांनीही पाण्याच्या प्रश्नासाठी एकत्र येण्याची मागणी आष्टीकरांनी केली आहे. पाणीदार गावांसाठी काम करणाऱ्या संघटनानी ममदापूर तलावात गाळ काढण्यासाठी पुढाकार घ्यावा अशी मागणी आहे. ग्रामस्थांचाही लोकसहभाग यात असायला हवा शासनावर अंवलंबून न राहता हे काम होऊ शकेल.पाण्याच्या व्हॉल्वभोवताल घाणच घाणपाणीपुरवठा करणाºया पाईपलाईन मधील प्रभागनिहाय पाणी सोडण्यासाठी असणारे पाण्याचे व्हॉल्व पाहिले असता त्यात घाणच घाण आहे. डुक्करांच्या पिण्याच्या पाण्याची सोय येथे असल्याचे दिसून आले. नाल्यांमधील कचरा साचला, त्यामुळे घाणीचे पाणी रस्त्यावरून वाहते. हेच पाणी, पाणी सोडण्याच्या व्हॉॅल्वमध्ये जमा होते. पाणीपुरवठा सुरू झाल्यावर अलबत घाणीचे पाणी नागरिकांच्या पिण्याच्या पाण्यात जात आहे.

टॅग्स :water pollutionजल प्रदूषण