१.६४ लाख रुपयांच्या रोखीसह ३.६५ लाखांचा मुद्देमाल जप्तवर्धा : येथील एका मंदिर ट्रस्टच्या मालकीच्या असलेल्या कपड्याच्या दुकानाच्या वर कापडी पेन्डॉल टाकून प्लास्टिकच्या क्वाईनवर सुरू असलेल्या जुगारावर पोलिसांनी धाड घातली. यात १५ जणांना अटक करण्यात आली असून त्यांच्याजवळून १.६४ लाख रुपये रोख व साहित्यासह ३ लाख ६५ हजार ३५५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. हा जुगार चालविणारा नितीन उर्फ मोटू जैन यालाही ताब्यात घेण्यात आले आहे. ही कारवाई शुक्रवारी करण्यात आली. पोलीस सुत्रानुसार, येथील येथील गोरस भांडार मार्गावर असलेल्या जैन कलेक्शन नामक कपड्याच्या दुकानाच्यावर कापडी मंडप टाकून नितीन उर्फ मोटू मानमल जैन (४५) रा. मोहिनी नगर, हा ताशपत्त्यावर हारजीतचा जुगार भरवित असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीवरून पोलिसांनी माहितीतील ठिकाणी घाड घालून कारवाई केली. या कारवाईत जैन याच्याकडून जुगाराचे साहित्य, क्वाईन, ताशपत्ते जप्त करण्यात आले. जप्त केलेले क्वाईन विविध रंगात असून प्रत्येकाची एक ठराविक किंमत असल्याचे सांगण्यात आले आहे. या कारवाईत श्यामलाल रिजूमल डोडानी (६५) रा. दयाल नगर, अनिल राजकूमार वलेचा (३५) रा. साई मंदिर रोड, धिरज श्रीराम साहू (३२) रा. आर्वी नाका, किशोर नथ्थूजी भोवरे (३२), भारत देवीदास रूद्रकार (३२), विजय पुंडलिक हाडगे (४१) तिघेही रा. मालगुजारीपुरा, सचिन मधुकर कोमलवार (३८) रा. साने गुरूजी नगर, अशोक वरंदमल विधाने (५८) व रामचंद्र अमृतलाल विनराणी (४९) दोन्ही रा. पोद्दार बगीचा, प्रकाश गोविंद पवार (६६) रा. मोहिनीनगर, अशोक आनंदराव चरडे (६१) रा. खडसे लेआऊट, मकरंद पुरुषोत्तम झामरे (६०) रा. जुनी म्हाडा कॉलनी, अंकुर सुभाष जैन (३०) रा. सिव्हील लाईन, अशी अटकेतील आरोपींची नावे असल्याचे पोलिसांनी सांगितले. या १५ जणांच्या ताब्यातून रोख १ लाख ६४ हजार १५५ रुपयांसह व इतर साहित्य २ लाख १ हजार २०० रुपसे असा एकूण ३ लाख ६५ हजार ३५५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपीतांविरूध्द शहर पोलीस ठाण्यात जुगार कायद्याच्या कलम ४,५ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला. गुन्ह्याचा पुढील तपास शहर पोलीस करीत आहेत.ही कारवाई पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांच्या मार्गदर्शनात उपविभागीय पोलीस अधिकारी माधव पडिले यांच्या नेतृत्वात पोलीस निरीक्षक पराग पोटे, सहायक पोलीस उपनिरीक्षक उदयसींग बारवाल, सलाम कुरेशी, नामदेव किटे, गिरीश कोरडे, नामदेव चाफले, दिवाकर परिमल, दीपक जाधव, हरिदास काकड, किशोर आप्तूरकर, कुणाल हिवसे, अमर लाखे, आनंद भस्मे, कुलदीप टांकसाळे, समीर कडवे, अमीत शुक्ला यांनी केली.(प्रतिनिधी)
प्लास्टिकच्या क्वाईनवर जुगार; १५ जणांना अटक
By admin | Updated: October 2, 2016 00:42 IST