शहरं
Join us  
Trending Stories
1
Gopal Badane : "मला निष्कारण अडकवलं जातंय"; निलंबित पीएसआय गोपाळ बदनेची पहिली प्रतिक्रिया
2
बिहारमध्ये तेजस्वींचा मास्टरस्ट्रोक; पंचायत प्रतिनिधींना पेन्शन, ५० लाखांचा विमा, ५ लाखांची मदत अन्...! केली घोषणांची आतशबाजी
3
बॉलिवूड सुपरस्टार सलमान खान 'दहशतवादी'...! पाकिस्तानची कारवाई, 'शाहबाज' सरकार बिथरलं; नेमकं काय घडलं?
4
'स्वत:चे घर घेणे' सर्वात वाईट निर्णय? 'भाड्याने राहा आणि कोट्यधीश व्हा'; बँकरने सांगितला फॉर्म्युला
5
'भारताने रशियन तेल आयात पूर्णपणे थांबवली', डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा केला दावा...
6
लेकीच्या लग्नासाठी बापाने जमवले ५ लाख; नवरीचा हार्ट अटॅकने मृत्यू, वरातीऐवजी निघाली अंत्ययात्रा
7
भुरटा नाही, अट्टल गुन्हेगार; ऑस्ट्रेलियन खेळाडूंची छेड काढणाऱ्या अकील खानची क्राइम कुंडली समोर
8
Video: शत्रुंजय टेकडीवर जंगलाच्या 'राजा'चा मुक्त वावर; सिंह दिसताच पर्यटक घाबरुन पळाले...
9
निवृत्तीनंतरही कर्ज मिळवणं सोपं! 'या' ३ महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा, बँक लगेच देईल लोन
10
पंकजा मुंडेंनी घेतली मयत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबीयांची भेट; मुख्यमंत्र्यांकडे केली 'ही' मागणी...
11
अखेर तारीख जाहीर! 'या' दिवशी येणार Lenskart चा IPO; ₹7278 कोटी उभारण्याची योजना...
12
शौर्याची गाथा निळ्या समुद्राखाली विसावणार, INS गुलदारचे रुपांतर देशाच्या पहिल्या पाण्याखालील संग्रहालयात
13
सोन्याच्या दरात मोठी घसरण! फक्त ४ दिवसांत ७,००० रुपयांहून अधिक स्वस्त; काय आहे कारण?
14
RO-KO च्या चाहत्यांसाठी खुशखबर! पुढील वनडे कधी खेळणार? जाणून घ्या तारीख...
15
समर्थक जिंदाबादच्या घोषणा देत असताना स्टेज कोसळला; बाहुबली नेते अनंत सिंह पडले खाली
16
भीषण, भयंकर, भयावह! रशियाचा युक्रेनवर मोठा ड्रोन अटॅक; ४ जणांचा मृत्यू, अनेक जण जखमी
17
"साताऱ्यातील आरोपीला गोळ्या घाला"; आरजी कर प्रकरणातील पीडितेच्या वडिलांची मोठी मागणी
18
"मी १० महिन्यांत १० दिवसही आनंदी नव्हती..."; पतीवर गंभीर आरोप करत महिलेने संपवलं आयुष्य
19
बाईक घसरली, रायडरचा मृत्यू, बसला आग... एक नव्हे दोन अपघात; कुर्नूलमध्ये नेमकं काय घडलं?
20
Today Daily Horoscope : आजचे राशीभविष्य - २६ ऑक्टोबर २०२५; प्रत्येक कामात यश, अचानक धनलाभ होईल

कपाशी पिकावर बुरशीजन्य रोगाचा हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2017 23:40 IST

कृषी विभागामार्फत जिल्ह्यातील कपाशी पिकाच्या क्षेत्राची पाहणी करण्यात आली आहे. यात कपाशीवर पिकावर बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव आढळून आलेला आहे.

ठळक मुद्देकृषी विभागाच्या सर्वेक्षणात उघड

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगणघाट : कृषी विभागामार्फत जिल्ह्यातील कपाशी पिकाच्या क्षेत्राची पाहणी करण्यात आली आहे. यात कपाशीवर पिकावर बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव आढळून आलेला आहे. हा प्रकार पावसाच्या खंडामुळे घडल्याचा संशय कृषी विभागाच्यावतीने व्यक्त केला.तालुक्यातील वडनेर, फुकटा, टेंभा, तिवसडी, दोंदुडा, बांबर्डा, मानकापूर, परसोडा रिठ, गांगापूर या गावात मोठ्या प्रमाणात तर आर्वी, काचनगाव, पवनी, वेळा, इंझाळा, सिरसगाव, गोपालपूर, नरसिंगपूर, वाघोली, पिपंळगाव, सातेफळ, कडाजना व कवडघाट इत्यादी गावात या आजाराची सुरुवात झाल्याचे दिसून आले आहे. या बुरशीजन्य आजारामुळे या भागातील एकूण ५०५.६० हेक्टर क्षेत्र बाधित झाल्याचे दिसून आले. या सर्व रोगांमुळे शोधण्याकरिता मौजा वडनेर येथे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ज्ञानेश्वर भारती, उपविभागीय कृषी अधिकारी गोविंद मोरे, तालुका कृषी अधिकारी राष्ट्रपाल मेश्राम, कृषी विद्यापीठाचे शास्त्रज्ञ डॉ.आर.टी. गोहोकर वनस्पतीरोग शास्त्रज्ञ यांच्या उपस्थितीत वडनेर शिवारात पंकज मोगलाना नगराळे, महादेव बाळकृष्ण नगराळे, राजेश्वर तानबाजी महाजन यांच्या शेतातील कापूस पिकाची पाहणी करण्यात आली.कपाशीवर बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव आढळून आला. त्यावर नैसर्गिक कारणांचा परिणाम जाणवल्याचे दिसून आले. पावसाचा खंड, हलकी जमीन व खंडानंतर पाऊस हे याचे मुख्य कारण असल्याचे समोर आले आहे. बुरशी जमिनीतून मुळाद्वारे कापसाच्या झाडावर मारा करून अन्नद्रव्ये घेणाºया झाडाच्या नलीका क्षतीग्रस्त करतात. यामुळे झाड अचानक वाळल्याचे दिसते.सदर सर्वेक्षणात वडनेर सरपंच विनोद वानखेडे, उपसरपंच सुमीत सरोदे, यांच्यासह कृषी पर्यवेक्षक ए.व्ही. कोहळे, कृषी सहाय्यक सी.बी. टापरे, कृषी सहायक व्ही.व्ही. बोरकर, कृषी सहायक पी.डब्ल्यु. निखाडे, संदीप हांडे, योगेश डहाके इत्यादींनी सर्वेक्षणाची माहिती सादर केली.