शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वे प्रवाशांना गंडा घालणारे तोतया पोलीस जेरबंद  

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2018 18:50 IST

धावत्या रेल्वेत प्रवाशांना पोलीस असल्याची बतावणी करून गंडा घालणाºया टोळीतील दोन चोरट्यांना वर्धा रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानांनी जेरबंद केले

वर्धा - धावत्या रेल्वेत प्रवाशांना पोलीस असल्याची बतावणी करून गंडा घालणाºया टोळीतील दोन चोरट्यांना वर्धा रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानांनी जेरबंद केले. त्यांच्याकडून एक मोबाईलसह रोख ४ हजार ३०० रुपये जप्त करण्यात आले आहे. सागरसिंह वीरसिंह भोंड (२२) व कमलसिंह बीरसिंह भोंड (२०) रा. बल्लारशाह, असे अटकेतील आरोपींची नावे असल्याचे सांगण्यात आले.चन्नई-अमदाबाद नवजीवन एक्स्प्रेसने छत्तीसगढ राज्यातील टोला जिल्ह्यातील पुरुषोत्तम देवसिंह तारम (३२), तरुणकुमार जोहरालाल आमिले (३१) व जितेंद्रकुमार जवाहरलाल उमाले हे प्रवास करीत होते. दरम्यान चार व्यक्ती त्यांच्याजवळ आले. त्यांनी आपण पोलीस असल्याचे सांगून त्यांच्या साहित्याची पाहणी केली. परंतु, साहित्याची पाहणी केल्यानंतर त्यांनी सदर तीनही व्यक्तींकडे असलेली एकूण रोख १३ हजार ६१० रुपये आपल्याकडे ठेवून घेत घटनास्थळावरून पोबारा केला. काही वेळानंतर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी घटनेची माहिती रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानांना दिली. माहिती मिळताच व तक्रारकर्त्यांनी सांगितलेल्या संशयीत आरोपींच्या वर्णनावरून धावत्या रेल्वेतच आरोपींना ताब्यात घेण्यासाठी शोध मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेदरम्यान  तक्रारकर्त्यांनी सांगितलेल्या वर्णनावरून सागरसिंह भोंड व कमलसिंह भोंड यांना ताब्यात घेण्यात आले. शहानिशा केल्यानंतर प्रवाशांना गंडा घालणारे हेच ते तोतया पोलिसांच्या टोळीतील सदस्य असल्याचे पुढे आले. त्याच्या जवळून रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानांनी एक मोबाईल व रोख ४ हजार ३०० रुपये जप्त केले आहे. तर टोळीतील दोन सदस्यांनी यशस्वी पळ काढला. त्यांचा शोध सध्या घेतल्या जात आहे. सदर दोन्ही आरोपींविरुद्ध वर्धा लोहमार्ग पोलीस ठाण्यात भादंविच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई नागपूरचे वरिष्ठ सुरक्षा मंडळ आयुक्त ज्योतीकुमार सतीजा, वर्धा रेल्वे सुरक्षा बलचे ठाणेदार सुरेश कांबळे, उपनिरीक्षक अश्विनीकुमार बारले यांच्या मार्गदर्शनात ए.एस.आय. सुरेश अस्वले, अतुल सावंत, विकास बोरवार यांनी केली.

टॅग्स :ArrestअटकCrimeगुन्हा