वर्धा : वर्धेचे माजी खासदार विजयराव मुडे यांचे आर्वी येथे शुक्रवारी सायंकाळी ७ वाजता निधन झाले. ते १९९५-९६ या काळात वर्धा लोकसभा मतदारसंघाचे खासदार होते. एक वर्ष महाराष्ट्र विधान परिषदेवर आमदार म्हणूनही त्यांनी काम केले. त्यांच्या खासदारकीच्या कार्यकाळात तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी वर्धा येथे हिंदी विश्वविद्यालयाची स्थापना केली. या स्थापनेत विजयराव मुडे यांचा मोठा सहभाग होता. मुडे यांची कन्या अर्चना मुडे-वानखेडे या वर्धा जिल्हा भाजपच्या महिला आघाडीच्या अध्यक्ष आहेत.
माजी खासदार विजयराव मुडे यांचे निधन
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2020 06:34 IST