शहरं
Join us  
Trending Stories
1
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
2
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
3
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
4
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
5
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
6
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
7
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
8
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
9
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
10
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
11
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
12
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
13
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
14
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
15
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
16
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
17
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
18
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)
19
"घासीराम कोतवाल'च्या प्रयोगासाठी देशभर...", संजय मिश्रांचं ३० वर्षांनंतर रंगभूमीवर पुनरागमन
20
तिवारी, शुक्ला, थरुर..; मोदी सरकारविरोधात राहुल गांधींना स्वकीयांनीच दिला घरचा आहेर

अग्निस्फोटाची धग कायमच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2019 20:43 IST

आशिया खंडातील सर्वांत मोठे दारूगोळा भांडार असलेल्या केंद्रीय दारुगोळा भांडारात ३१ मे २०१६ च्या मध्यरात्री १.३० वाजता भयंकर अग्निस्फोट झाला. यात सेनेतील दोन अधिकाऱ्यासह १९ कर्मचारी व जवानांना वीरमरण आले तर कित्येक सैनिक व अग्निशमन दलातील जवान जखमी झाले होते.

ठळक मुद्देघटनेला आज तीन वर्षे पूर्ण : कुटुंबीयांना दिलेल्या आश्वासनाची पूर्तता नाहीच

प्रभाकार शहाकार।लोकमत न्यूज नेटवर्कपुलगाव : आशिया खंडातील सर्वांत मोठे दारूगोळा भांडार असलेल्या केंद्रीय दारुगोळा भांडारात ३१ मे २०१६ च्या मध्यरात्री १.३० वाजता भयंकर अग्निस्फोट झाला. यात सेनेतील दोन अधिकाऱ्यासह १९ कर्मचारी व जवानांना वीरमरण आले तर कित्येक सैनिक व अग्निशमन दलातील जवान जखमी झाले होते. त्यात स्थानिक पाच कर्मचाऱ्यांचा समावेश होता.रात्रीच काळ्याकुट्ट अंधारात किंकाळ्या, हादरे, पळापळ व भयग्रस्तांचा आक्रोशामुळे शहर व परिसर हादरून गेला. त्या काळाकुट्ट घटनेतील थरार पाहाता पुन्हा नको त्या काळ्याकुट्ट घटनेच्या आठवणी असे म्हणण्याची वेळ आली असली तरी ज्या वीर जवानांनी आपल्या प्राणांची आहुती देवून जिल्ह्यातील लाखो नागरिकांचा जीव वाचविला त्यांना कधीच विसरता येणार नाही. त्या १९ विरांचे स्मारक दारुगोळा भांडारात असले तरी शहरवाशी दर वर्षी ३१ मे रोजी या शहीदांचे स्मरण करुन त्यांना मानाचा मुजरा करुन भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतात.३१ मे २०१६ च्या काळाकुट्ट थरारात लिलाधर चोपडे, अमित दांडेकर, बाळू पाखरे, अमोल येसनकर, प्रमोद मेश्राम या अग्निशमन दलातील जवानांचा सहभाग होता. लिलाधर चोपडे यांच्या मागे पत्नी शोभा व वर्षा, पल्लवी, काजल या उपवर झालेल्या बेरोजगार मुली, अमित दांडेकर यांच्यामागे पत्नी प्राची व आठ वर्षाचा मुलगा व तीन वर्षांची मुलगी आहे. विशेष म्हणजे अमितचे वडील व दोघे भाऊसुद्धा संरक्षण विभागाच्या सेवेतच आहेत. बाळू पाखरे या कर्तबगार शहिदामागे पत्नी, जावई, मुलगा व वृद्ध आई आहे.अमोल येसनकर हा ऐन उमेदीच्या काळातच आपल्याला सोडून गेल्याचा दु:ख त्याच्या वृद्ध माता पित्यास आहे. तर प्रमोद मेश्राम यांची पत्नी व १२ वर्षांचा पार्थ व ४ वर्षाचा यथार्थ आजही आपले बाबा परत येणार या प्रतीक्षेत आहेत.घटनेला तीन वर्षे लोटूनही अग्निस्फोटाची धग कायम आहे. वीरांच्या कुटुंबाला शहिदांना मिळणाऱ्या सर्वसोईसवलती देण्याची व शहीद कुटुंबाला २५ लाख देण्याची घोषणा, कुटुंबातील एकाला शासकीय सेवेत घेणे या वीरांना शहीदांचा दर्जा देण्याची घोषणा करण्यात आली होती. परंतु या घटनेतील १९ पैकी संरक्षक विभागातील अधिकारी व सैनिक यांना शहिदांचा दर्जा देण्यात आला. तर इतरांना सिव्हिलियन म्हणून दर्जा देण्याचे नाकारण्यात आले. वास्तविक पाहाता संरक्षण विभागातील अग्निशमन यंत्रणाही अत्यावश्यक सेवा म्हणून शासकीय सेवा समजली जाणे आवश्यक आहे.या मागणीसाठी फेब्रुवारी २०१९ मध्ये दिल्ली येथे या परिवारातर्फे आंदोलनही करण्यात आले होते. परंतु शासनाने दखल घेतली नाही. खासदार रामदास तडस यांनी लोकसभेत प्रश्नही उपस्थित केला होता.या शहीद कुटुंबांना सर्व सोयी उपलब्ध करून दिल्याचे शासन सांगत असले तरी शहीद पाखरे व येसनकर परिवारास अद्यापही कुठलीही राशी मिळाली नसून शहीद परिवारातील भंडारा येथील शहीद धनराज मेश्राम व स्थानिक प्रमोद मेश्राम या दोन वीरांच्या पत्नींना शासकीय सेवेत घेतल्याची माहिती शहीद बाळू पाखरे परिवाराचे विक्की पाखरे यांनी लोकमतला दिली.गावांच्या पुनर्वसनाचा निर्णय कागदोपत्रीचदारूगोळा भांडारात वारंवार होणाºया या भयानक घटनेतून भांडारालगतच्या नाचणगाव, पिंपरी (खराबे), आगरगाव, नागझरी या गावांचे इतरत्र पुनर्वसन करण्यात यावे, असा निर्णय शासनदरबारी झाला असतानाही हा निर्णय अनेक वर्षांपासून कागदोपत्रीच राहिला. आता तरी हा प्रश्न ऐरणीवर येईल का? असा प्रश्न परिसरातील ग्रामस्थ करीत आहेत.

टॅग्स :Blastस्फोट