शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
2
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
3
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
4
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
5
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
6
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
7
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
8
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
9
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
10
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
11
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
12
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
13
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
14
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
15
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
16
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
17
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
18
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
19
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
20
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!

नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीतील अस्थितरता कायमच

By admin | Updated: July 15, 2016 02:25 IST

स्थानिक नगर परिषदेच्या नगराध्यक्षासह पाच नगरसेवकांना जिल्हाधिकाऱ्यांनी एका आदेशाद्वारे अपात्र ठरविले.

पुलगाव येथील प्रकरण : अपात्र नगरसेवकांबाबत न्यायालयीन सुनावणी सोमवारी पुलगाव : स्थानिक नगर परिषदेच्या नगराध्यक्षासह पाच नगरसेवकांना जिल्हाधिकाऱ्यांनी एका आदेशाद्वारे अपात्र ठरविले. या आदेशाला या पाचही नगरसेवकांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल करून आव्हान दिले. यावर गुरुवारी सुनावणी होणार होती; मात्र आता ही सुनावणी येत्या सोमवारी होणार असल्याचे न्यायालयाने जाहीर केले. याच काळात नगराध्यक्षाच्या निवडणुकीबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी कार्यक्रम जाहीर केला. दरम्यान, न्यायालयीन सुनावणी पूर्ण होईस्तोवर नराध्यक्षाची निवडणूक होणार नसल्याचे न्यायालयाने आदेशित केल्याने या निवडणुकीबाबत अस्थिरता कायम आहे. महाराष्ट्र लोकल अथॉरिटी डिसक्वालिफीकेशन अ‍ॅक्ट १९८६ चे कलम ७ यु. एस. १६ (१ए) कलमान्वये जिल्हाधिकाऱ्यांनी नगराध्यक्ष मनीष साहूसह पाच नगरसेवकांना अपात्र ठरविले होते. त्यानंतर रिक्त असलेल्या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू होवून १२ जुलै २०१६ ला निवडणुकही होणार होती; परंतु अपात्र ठरविण्यात आलेल्या नगराध्यक्षासह पाचही नगरसेवकांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यानुसार नगराध्यक्ष निवडणुकीपुर्वीच ११ जुलै रोजी उच्च न्यायालयात सुनावणी होवून नगराध्यक्ष पदाची निवडणूक न्यायालयीन सुनावणी पूर्ण होईपर्यंत पुढे ढकलण्यात आली. या प्रकरणी आज सुनावणी अपेक्षित होती; परंतु काही कारणास्तव ही सुनावणी येत्या सोमवारी होणार असल्याचे समजते. न्यायालयाच्या निर्णयाकडे संपूर्ण शहरवासीयांचे लक्ष लागले असून या प्रकरणामुळे सत्तारूढ काँग्रेस पक्षातील दोन्ही गट दंड थोपटून आमने-सामने उभे ठाकले आहे.(तालुका प्रतिनिधी) पालिकेवर कुणाचाही वचक नाही नगर सेवकांच्या या राजकीय भानगडीत नगर परिषदेत कुणाचाही वचक राहिलेला नाही. शहरवासियांना पावसाच्या दिवसात अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत असल्याची नागरिकांची ओरड आहे. आॅक्टोबर, नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या नगराध्यक्ष व नगर सेवकांच्या निवडणुकीसाठी अनेकजण गुडघ्याला बाशिंग बांधून तयार झालेत. त्यांना शहरातील समस्यांचे नव्हे तर नगर परिषदेच्या आगामी निवडणुकीचे वेध लागले आहे. अशातच गत कित्येक महिन्यापासून नगराध्यक्षाची खूर्ची रिक्त आहे. नगराध्यक्ष, उपाध्यक्ष, गटनेता प्रत्येक समितीची सभापती या प्रत्येकाचे स्वतंत्र कक्ष आहेत. या राजकीय वादळात सर्वांचेच कक्ष कुलूपबंद आहेत. यामुळे आपल्या कामासाठी येणाऱ्या नागरिकांना आल्या पावलीच परतावे लागत असल्याची स्थिती आहे.