शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

भरधाव ट्रॅव्हल्सने चिमुकलीला चिरडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2017 14:19 IST

वर्धा जिल्ह्यातील देवळी तालुक्यात असलेल्या शिरपूर येथे एका भरधाव ट्रॅव्हल्सने एका शाळकरी मुलीला धडक दिल्याने तिचा घटनास्थळीच मृत्यू झाला. शनिवारी सकाळी साडेसातच्या सुमारास ही घटना घडली.

ठळक मुद्देसंतप्त नागरिकांचा साडेतीन तास चक्काजामखा. रामदास तडस यांची मध्यस्थीगतिरोधकाला सुरुवात केल्यानंतरच मृतदेह उचलला

देवळी: वर्धा जिल्ह्यातील देवळी तालुक्यात असलेल्या शिरपूर येथे एका भरधाव ट्रॅव्हल्सने एका शाळकरी मुलीला धडक दिल्याने तिचा घटनास्थळीच मृत्यू झाला. शनिवारी सकाळी साडेसातच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेने संतप्त झालेल्या नागरिकांनी ट्रॅव्हल्स कंपनीच्या बसची तोडफोड केली व साडेतीन तास रास्ता रोको आंदोलन केले. याप्रकरणी खा. रामदास तडस यांनी मध्यस्थी करून नागरिकांची समजूत काढली.शनिवारी सकाळी जवळच्याच मंदिरात काकड आरतीसाठी गेलेली ऋणाली गजानन राजूरकर ही ११ वर्षे वयाची मुलगी मंदिरातून घराकडे परत येत असताना, रस्ता क्रॉस करतेवेळी भरधाव वेगाने आलेल्या ट्रॅव्हल्स बसने तिला धडक दिली. ही धडक एवढी जबरदस्त होती की ऋणाली जागीच ठार झाली. यावेळी पुलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मनोहर खडसे हे आपल्या वाहनाने जात होते. त्यांनी सदर बसचा पाठलाग करून तिला अडवले. तोपर्यंत घटनास्थळी सगळा गाव जमा झाला होता. संतप्त नागरिकांनी बसच्या काचा फोडून नासधूस केली.या घटना वारंवार होत असल्याने रस्त्याच्या दोन्ही बाजूला गतिरोधक लावल्याशिवाय या मुलीचा मृतदेह उचलणार नाही असा पवित्रा तिच्या कुटुंबियांनी व नागरिकांनी घेतल्याने तब्बल साडेतीन तास या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. यावेळी स्त्रीपुरुष रस्त्यात विद्युत खांब आडवा टाकून बसून राहिले होते. सुमारे ११ च्या सुमारास गतिरोधकाचे काम सुरू झाल्यानंतर नागरिकांनी या मुलीचा मृतदेह हलवला. रास्ता रोकोमुळे वर्धा व यवतमाळ मार्गावर दोन कि.मी. अंतरापर्यंतची वाहतूक ठप्प झाली होती. यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. नागरिकांनी पोलिसांना धक्काबुक्की केल्याचेही वृत्त आहे.याच मार्गावर आतापर्यंत पाच जणांचा बळी गेला आहे. येथे गतिरोधक लावावा अशी मागणी वारंवार होऊनही त्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचा संताप नागरिकात व्यक्त होत होता. ऋणाली पाचव्या वर्गात शिकत होती.

टॅग्स :Accidentअपघात