शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

अपघाती मृत्यूनंतर पाच लाख मिळतात; असंघटित कामगारांना ठाऊकच नाही!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2021 05:00 IST

पत्नीच्या प्रसूतीकरिता, मुलांच्या शिक्षणाकरिता, वैद्यकीय व अभियांत्रिकी महाविद्यालयात  प्रवेशाकरिता, पुस्तके व शैक्षणिक साहित्य खरेदीसाठी, कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया, अपंगत्व आल्यास, नैसर्गिक मृत्यू किंवा अपघाती मृत्यू झाल्यास, गंभीर आजाराच्या उपचारासाठी, नोंदणीकृत कामगाराच्या पहिल्या विवाहाच्या खर्चाकरिता, कामगाराच्या अंत्यविधीकरिता, दैनंदिन गरजेच्या वस्तू खरेदीसाठी, व्यसनमुक्ती केंद्रांतर्गत उपचाराकरिता महामंडळाकडून अर्थसाहाय्य केले जाते.

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : इमारत व इतर बांधकाम कामगारांना विकासाच्या प्रवाहात आणण्याकरिता शासनाने महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाची स्थापना केला. या मंडळाच्या माध्यमातून लाभाच्या विविध योजना राबविल्या जातात; पण जिल्हा कामगार अधिकारी कार्यालयाकडून जनजागृती होत नसल्याने अनेक असंघटित कामगारांना अपघाती मृत्यूनंतर पाच लाख रुपये मिळतात, याचीही माहिती नाही. विशेषत: खरे कामगार अद्यापही नोंदणीपासून दूरच आहेत.जिल्ह्यामध्ये गेल्या काही वर्षांपासून कामगार नोंदणीचे चांगलेच पीक आले आहे. शासनाकडून विविध योजनांचा लाभ मिळत असल्याने नोंदणी करणाऱ्यांचे प्रमाणही वाढले आहे. कामगारांना व त्यांच्या परिवाराकरिता विविध योजना आहेत. पत्नीच्या प्रसूतीकरिता, मुलांच्या शिक्षणाकरिता, वैद्यकीय व अभियांत्रिकी महाविद्यालयात  प्रवेशाकरिता, पुस्तके व शैक्षणिक साहित्य खरेदीसाठी, कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया, अपंगत्व आल्यास, नैसर्गिक मृत्यू किंवा अपघाती मृत्यू झाल्यास, गंभीर आजाराच्या उपचारासाठी, नोंदणीकृत कामगाराच्या पहिल्या विवाहाच्या खर्चाकरिता, कामगाराच्या अंत्यविधीकरिता, दैनंदिन गरजेच्या वस्तू खरेदीसाठी, व्यसनमुक्ती केंद्रांतर्गत उपचाराकरिता महामंडळाकडून अर्थसाहाय्य केले जाते. जिल्ह्यातही या विविध योजनेंच्या लाभाकरिता कामगारांनी अर्ज केला आहे; पण बऱ्याच लाभार्थ्यांना लाभ मिळण्याकरिता अडचणी जात असल्याची ओरड आहे. यासोबतच काहींना योजनाच माहिती नसल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे जिल्हा कामगार कार्यालयाकडून व्यापक जनजागृती करण्याची गरज आहे.

५२ हजार ६३२ अर्ज-  नोंदणीकरिता बांधकाम कामगारांचे ५२ हजार ६३२ अर्ज प्राप्त झाले असून त्यापैकी ३४ हजार ३१४ अर्ज मंजूर करण्यात आले असून त्यापैकी १३ हजार ८७३ अर्ज नाकारण्यात आले. तसेच सद्य:स्थितीत ४ हजार २८७ अर्ज प्रलंबित आहे. -  यासोबतच नूतनीकरणाकरिता ३५ हजार ६३७ अर्ज प्राप्त झाले असून २६ हजार १३२ अर्ज मंजूर करण्यात आले आहेत. यातील ५ हजार २७ हजार अर्ज नाकारण्यात आले आहेत, तर ४४ अर्जांवर स्पष्टीकरण मागविण्यात आल्याचे सांगण्यात आले. 

नैसर्गिक मृत्यूनंतर काय?-   नोंदणीकृत कामगाराचा कामावर असताना अपघाती मृत्यू झाल्यास त्याच्या वारसांना कामगार कल्याणकारी मंडळाकडून ५ लाख रुपयांचे अर्थसाहाय्य दिले जाते. तर नोंदणीकृत कामगारांचा नैसर्गिक मृत्यू झाल्यास त्याच्या विधवा पत्नी अथवा स्त्री कामगाराच्या विधुर पतीस प्रतिवर्षी २४ हजार रुपयांचे अर्थसाहाय्य दिले जाते. 

-   यासोबतच कामगाराच्या मृत्यूनंतर अंत्यविधीकरिता १० हजार रुपयांची मदत मिळते. नोंदणीकृत कामगारास ७५ टक्के किंवा कायमचे अपंगत्व आल्यास २ लाख रुपये विमा संरक्षण असल्यास विमा रकमेची प्रतिपूर्ती अथवा २ लाख आर्थिक साहाय्य यापैकी कोणताही एकच लाभ अनुज्ञेय असणार आहे. 

तीन वर्षांत मोजकेच प्रस्तावजिल्ह्यामध्ये इमारत व इतर बांधकाम कामगारांसह त्यांच्या पाल्यांकरिता विविध योजना राबविल्या जातात. यामध्ये प्रत्यक्ष लाभासह आता साहित्य वाटपही केले जाते. गेल्या तीन वर्षांमध्ये काम करीत असताना मृत्युमुखी पडल्याचे प्रकरण नगण्यच असून एक ते दोन प्रस्ताव सादर झाल्याची माहिती आहे. त्यांचे प्रस्ताव कार्यालयाकडून मंजूर करून त्यांना लाभ दिल्याचे सांगण्यात आले आहे. 

अर्ज करूनही योजनेचा लाभ मिळेनामाझे पती नागोराव घुगे हे नोंदणीकृत कामगार असून त्यांचा नैसर्गिक मृत्यू झाला. त्यानंतर नियमानुसार अंत्यविधी आणि वार्षिक अर्थसाहाय्य मिळण्याकरिता ऑनलाइन अर्ज केला; पण आता सहा महिन्यांचा कालावधी लोटला तरीही लाभ मिळाला नाही. वेळेवर लाभ मिळत नसेल तर या योजना कोणत्या कामाच्या?-सविता घुगे, महिला कामगार.

येजाज शेख हमीद हे नोंदणीकृत बांधकाम कामगार असून त्यांचा वर्षभरापूर्वी मृत्यू झाला. त्यांच्या वारसांना मृत्यूपश्चात लाभ मिळावा याकरिता कामगार अधिकारी कार्यालयाकडे अर्ज सादर केला; पण अद्याप कोणताही लाभ मिळाला नसल्याने कार्यालयाच्या येरझरा सुरू आहेत. -हमिदा शेख येजाज, महिला कामगार.

विविध योजनांच्या लाभाकरिता कामगारांचे २२ हजार १६५ अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यापैकी ३ हजार २२६ अर्ज मंजूर करण्यात आले, तर ८ हजार ९२० अर्ज नाकारण्यात आले. १ हजार २९४ अर्जावर स्पष्टीकरण मागण्यात आले आहे. सध्या पोर्टलवर ८ हजार ७२५ अर्ज प्रलंबित असून तेही लवकरच निकाली काढले जातील.- कौस्तूभ भगत,  जिल्हा कामगार अधिकारी, वर्धा. 

 

टॅग्स :government schemeसरकारी योजना