शहरं
Join us  
Trending Stories
1
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
2
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
3
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
4
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
5
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
6
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
7
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
8
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
9
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
10
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
11
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
12
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
13
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
14
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
15
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
16
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन
17
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
18
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?
19
Maharashtra Rain: जून महिन्यात धो-धो; जुलैत पावसाला ब्रेक! 
20
प्रत्यक्षात घडली Jolly LLB 2 सारखी घटना, ३० वर्षे साधूच्या वेशात लपून होता बांगलादेशमधील गुन्हेगार, अखेर…

एकाच दिवशी पाच कोविड बाधित आढळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2020 05:00 IST

कोकणात निसर्ग चक्रीवादळामुळे नुकसानग्रस्त भागातील वीज वितरण विभागाची दुरुस्तीची कामे करण्यासाठी वर्धा जिल्ह्यातून २० कर्मचारी गेले होते. परतल्यानंतर त्यातील तीन कर्मचारी शनिवारी कोरोना बाधित निघाल्यावर उर्वरित कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यापैकी १२ व्यक्तींचे अहवाल रविवारी सकाळी आरोग्य विभागाला प्राप्त झाले असून पाच व्यक्तींना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे पुढे आले आहे.

ठळक मुद्देसर्व रुग्ण महावितरणचे कर्मचारी : कोकणात गेले होते दुरूस्तीच्या कामाला, जिल्ह्याची रुग्णसंख्या २७

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगणघाट/पुलगाव/विजयगोपाल : चक्रीवादळामुळे कोकणात खंडित झालेला वीज पुरवठा सुरळीत करण्याचे काम करून परत आलेले वीज वितरण विभागाचे आणखी पाच कर्मचारी रविवारी कोरोना बाधित असल्याचे निदान झाले आहेत. यात तीन कर्मचारी हिंगणघाट तर दोन कर्मचारी देवळी तालुक्यातील आहेत.कोकणात निसर्ग चक्रीवादळामुळे नुकसानग्रस्त भागातील वीज वितरण विभागाची दुरुस्तीची कामे करण्यासाठी वर्धा जिल्ह्यातून २० कर्मचारी गेले होते. परतल्यानंतर त्यातील तीन कर्मचारी शनिवारी कोरोना बाधित निघाल्यावर उर्वरित कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यापैकी १२ व्यक्तींचे अहवाल रविवारी सकाळी आरोग्य विभागाला प्राप्त झाले असून पाच व्यक्तींना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे पुढे आले आहे. तर दोन व्यक्तींचे अहवाल कोविड निगेटिव्ह आले. पाच व्यक्तींचे अहवाल इनकनक्लुसिव्ह आहेत. नव्याने आढळलेल्या पाच कोरोना बाधितांना सावंगी (मेघे) येथील आचार्य विनोबा भावे कोविड रुग्णालय आणि सेवाग्राम येथील कस्तुरबा रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.हिंगणघाटचे सेवाग्राम तर देवळीचे सावंगीच्या रुग्णालयातरविवारी महावितरणच्या १२ व्यक्तींचे अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी पाच व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह तर दोन व्यक्ती कोरोना निगेटिव्ह तसेच पाच व्यक्तींचे अहवाल इनकनक्लुसिव्ह आहेत. यामध्ये तीन कर्मचारी हिंगणघाट मधील असून एक पुलगाव आणि एक विजयगोपाल येथील आहे. हिंगणघाट मधील बाधित कर्मचाऱ्यांना सेवाग्राम येथील कस्तुरबा रुग्णालयात तर देवळी मधील रुग्णांना सावंगी (मेघे) येथील आचार्य विनोबा भावे रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.नवे रुग्ण २९ ते ५५ वयोगटातीलरविवारी नव्याने आढळलेले कोरोना बाधित व्यक्ती हे २९ ते ५५ वयोगटातील आहेत. हिंगणघाट येथील रुग्ण ५५, २९, ३० तर देवळी येथील रुग्ण ५० व ४० वयोगटातील असल्याचे सांगण्यात आले.१४ अ‍ॅक्टीव्ह रुग्णरविवारी एकाच दिवशी पाच कोरोना रुग्ण आढळल्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. शिवाय पाच नव्या रुग्णानंतर जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या २७ झाली असून त्यातील १२ कोरोनामुक्त तर १४ अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तर एकाचा पूर्वीच मृत्यू झाला असून संस्थात्मक विलगिकरणात सध्या १४१ व्यक्ती आहेत.तिघे पॉझिटिव्ह आल्यानंतर प्रशासन झाले खडबडून जागेकोकणातून परलेल्या महावितरणच्या काही कर्मचाऱ्यांना सुरूवातीला गृहविलगीकरणात ठेवण्यात आले होते. पण २० पैकी तिघांचा अहवाल शनिवारी कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर प्रशासन खडबडून जागे झाले. त्यानंतर कोकणातून परतलेल्यांना शोधून काढून त्यांचे स्वॅब घेण्यात आले. रविवारी प्राप्त झालेल्या अहवालात पाच जण कोरोना बाधित असल्याचे पुढे आले.राज्यशासनाने वर्धा जिल्ह्यातील महावितरणचे वीस कर्मचारी कोकणात सेवेकरिता बोलाविले. ते तेथून वर्ध्यात परत आल्यानंतर कोरोनाबाधित आढळून आले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील जे तालुके ग्रीन झोनमध्ये होते, त्या तालुक्यातही रुग्ण संख्या वाढत आहे. सोबतच सेवाग्रामचे वैद्यकीय अधिकारीही मुंबईमध्ये सेवा देण्यासाठी बोलाविण्यात आले आहे. दोनशे किलो मीटरच्या परिसरातील अधिकारी सेवेकरिता बोलाविणे योग्य आहे. परंतू वर्ध्यातील अधिकारी इतक्या लांब बोलावणे आणि ग्रीन झोनमध्ये धोका निर्माण करण्याची शासनाची ही भूमिका निषेधार्य आहे.- समीर कुणावार, आमदार, हिंगणघाट.हिंगणघाट :-महावितरणचे तीन कर्मचारी सुरूवातीला कोरोना पॉझिटिव्ह आल्यावर कोकणातून हिंगणघाटात परतलेल्या इतर कर्मचाºयांचा शोध घेण्यात आला. दोन कर्मचारी सहज मिळाले; पण एक व्यक्ती अल्लीपूर नजीकच्या शिरुड येथे अमलीपदार्थाचे सेवन करताना आढळून आला. हाच व्यक्ती आता कोरोना बाधित असल्याचे पुढे आल्याचे खात्रिदायक सूत्रांनी सांगितले.हिंगणघाट येथे एकाच दिवशी तीन कोरोना रुग्ण सापडल्याने तुकडोजी वॉर्ड भागातील आदर्शनगर, म्हाडा कॉलनी येथील गार्डन परिसर सील करण्यात आला आहे.शिवाय हायरिस्क मधील १९ व्यक्तींना शोधून त्यांचे स्वॅब कोविड चाचणीसाठी पाठविण्यात आले आहे.पुलगाव :-पुलगाव येथे कोरोनाचा रुग्ण आढळल्याने हरिरामनगरचा काही भाग सील करण्यात आला आहे.या रुग्णाच्या हायरिस्कमध्ये चार तर लो-रिस्कमध्ये सात व्यक्ती आल्याने त्यांना क्वारंटाईन करण्यात आले आहे.रुग्णाच्या निकट संपर्कात आलेल्या चार व्यक्तींचे स्वॅब घेऊन ते सेवाग्राम येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.विजयगोपाल :-विजयगोपाल येथे कोरोना बाधित सापडल्याने गावातील विठ्ठलनगर परिसर सील करण्यात आला आहे.कोरोनाची लागण झालेल्या व्यक्तीच्या निकट संपर्कात आलेल्या पाच तर लोरिस्क मधील २३ व्यक्तींना क्वारंटाईन करण्यात आले आहे.रुग्णाच्या निकट संपर्कात आलेल्या पाच व्यक्तीच्या घशातील द्रवाचे नमुने घेऊन ते कोविड चाचणीसाठी पाठविण्यात आले आहे.

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या