शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

आधी म्हणे पुस्तके परत घ्या, आता म्हणतात विद्यार्थ्यांकडेच असू द्या!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2021 05:00 IST

शासनाच्या निर्देशाप्रमाणे यावर्षी त्या सर्व विद्यार्थ्यांसह पालकांना सूचना देऊन जुनी पाठ्यपुस्तके परत मागविली जात आहे. शिक्षण विभागाकडून आतापर्यंत या पाठ्यपुस्तकाचा नियमित आढावा घेतला जात असल्याने निम्यापेक्षा अधिक पालकांनी शाळेत येऊन पुस्तके परत केली आहे. इतकेच नाही तर नवीन शैक्षणिक सत्राला ऑनलाईन सुरुवात झाल्याने काही शाळांनी पहिल्या दिवशीपासून परत आलेली पुस्तके नवीन विद्यार्थ्यांना वितरितही केली आहे.

ठळक मुद्देशिक्षणाचा सावळागोंधळ : एक ना धड, भाराभर चिंध्या; अशीच अवस्था

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : कोरोनाकाळात शाळा बंद असतानाही शासनाकडून प्राप्त झालेल्या निर्देशानुसार विद्यार्थ्यांकडून जुनी पाठ्यपुस्तके परत घेण्याचे काम सुरु आहे. शिक्षकांकडून दररोज पालकांना सूचना करुन पुस्तके परत मागितली जात आहे. आता शिक्षणमंत्र्यांनी ‘विद्यार्थ्यांकडे असलेली जुनी पुस्तके शाळेत जमा न करता सेतू अभ्यासक्रमाकरिता वापरावीत’, अशी घोषणा केली. त्यामुळे या सावळ्या गोंधळाने शिक्षकांचीही मोठी दमछाक होत असून सध्या शिक्षणाबाबत एक ना धड, भाराभर चिंध्या, अशीच अवस्था असल्याचे दिसून येत आहे.सर्व शिक्षा अभियान अंतर्गत पहिली ती आठवीच्या विद्यार्थ्यांना दरवर्षी शासनाकडून मोफत पाठ्यपुस्तके दिली जातात. दरवर्षी अभ्यासक्रम बदलत नसल्याने त्याच पुस्तकांचा पुनर्वापर करता येतो. म्हणून गेल्यावर्षी दिलेली पाठ्यपुस्तके यावर्षी परत घेऊन ती नव्याने प्रवेशित विद्यार्थ्यांना दिली जातात. गेल्या वर्षीपासून शाळा बंद असल्या तरीही विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकाचे वितरण करण्यात आले. शासनाच्या निर्देशाप्रमाणे यावर्षी त्या सर्व विद्यार्थ्यांसह पालकांना सूचना देऊन जुनी पाठ्यपुस्तके परत मागविली जात आहे. शिक्षण विभागाकडून आतापर्यंत या पाठ्यपुस्तकाचा नियमित आढावा घेतला जात असल्याने निम्यापेक्षा अधिक पालकांनी शाळेत येऊन पुस्तके परत केली आहे. इतकेच नाही तर नवीन शैक्षणिक सत्राला ऑनलाईन सुरुवात झाल्याने काही शाळांनी पहिल्या दिवशीपासून परत आलेली पुस्तके नवीन विद्यार्थ्यांना वितरितही केली आहे. मात्र, आता अचानक शिक्षणमंत्र्यांनी घोषणा करुन जुनी पाठ्यपुस्तके परत न घेता ती विद्यार्थ्यांकडेच राहू द्यावी, जेणेकरुन त्याचा वापर ते सेतू अभ्यासक्रमाकरिता करतील, असे निर्देश दिले. यामुळे शाळांचा गोंधळ उडाला आहे. आता शाळांना परत घेतलेली पुस्तके त्याच विद्यार्थ्यांना पुन्हा द्यावी लागणार आहे. आधी पुस्तके परत घेण्यासाठी तर आता तीच पुस्तके त्याच विद्यार्थ्यांना देण्यासाठी शिक्षकांना खटाटोप करावा लागणार आहे. अशा निर्णयातून शिक्षकांना वेठीस धरण्याचा प्रकार सुरु असल्याची भावना व्यक्त होत आहे.

यापूर्वी शासनाकडून प्राप्त निर्देशानुसार आतापर्यंत विद्यार्थ्यांकडून पाठ्यपुस्तके जमा करणे सुरु आहे. त्याचा दररोज आढावा घेतला जात असल्याने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अनेक शाळांमध्ये ५० टक्के पेक्षा अधिक पाठ्यपुस्तके जमा झाली आहे. आता विद्यार्थ्यांकडून पाठ्यपुस्तके जमा न करण्याची घोषणा शिक्षणमंत्र्यांनी केली. त्यामुळे सर्व स्तरावर गोंधळ उडाला असून कुणाचा पायपोस कुठे आहे तेच कळत नाही. आता पुन्हा जमा केलेली पाठ्यपुस्तके त्याच विद्यार्थ्यांना वितरित करण्यासाठी तीच यंत्रणा शिक्षकांना कामाला लावणार. शासन-प्रशासन स्तरावर पूर्ण विचारांती निर्णय होत नसल्याने शिक्षकांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे.विजय कोंबे, राज्य सरचिटणीस,   महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती 

आपत्ती काळात परिस्थितीनुसार निर्णय घ्यावे लागतात. फार पूर्वी पाठ्यपुस्तक परत घेण्याच्या सूचना सर्व शाळांना दिल्या होत्या. पण, आता कोविडमुळे शाळा बंद असल्याने दोन दिवसांपूर्वी सेतू अभ्यासक्रमाबाबत निर्णय घेण्यात आला. त्यामुळे विद्यार्थ्यांकडील पुस्तके परत न घेता सेतू अभ्याक्रमाकरिता वापरावी, असे निर्देश दिल्याने लगेचच पुस्तके परत करण्याच्या सूचना देण्यात आल्या. त्यानुसार आता शिक्षक विद्यार्थ्यांना पुस्तके परत करतील.संजय मेहरे, प्रभारी शिक्षणाधिकारी,  प्राथमिक, वर्धा 

टॅग्स :Educationशिक्षणSchoolशाळा