शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
3
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
4
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
5
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
6
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
7
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
8
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
9
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
10
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
11
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
12
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
13
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
14
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
15
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
16
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
17
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
18
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
19
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
20
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
Daily Top 2Weekly Top 5

सिंदी (मेघे) परिसरातील बुद्ध टेकडीला आग; झाडे जळून खाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2022 05:00 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीदिनी बुद्ध टेकडी मित्रपरिवाराचे काही सदस्य बाबासाहेब आंबेडकरांची जन्मभूमी महू या गावी गेले होते तर काही सदस्य जयंतीच्या कार्यक्रमात व्यस्त होते. अचानक सायंकाळी ५च्या सुमारास  पुन्हा अज्ञाताने  टेकडी परिसराला आग लावली. या आगीने रौद्ररुप धारण केले तरीही बाजूलाच असलेल्या सेवाश्रममधील अनाथ  विद्यार्थ्यांनी जिवाची पर्वा न करता ही आग विझवली. आगीत अनेक झाडं जळून खाक झाली आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : येथील सिंदी (मेघे) परिसरात असलेल्या बुद्ध टेकडी परिसरात अज्ञाताने आग लावल्याने या आगीत टेकडी परिसरातील अनेक झाडे जळून खाक झाली. बुद्ध टेकडी मित्रपरिवाराच्या काही सदस्यांना लाग लागल्याचे दिसताच त्यांनी टेकडी परिसरात पोहोचून आगीवर पाण्याचा मारा करून नियंत्रण मिळवले. आठवडाभरातील ही दुसरी घटना असून, आग लावणारा तो अज्ञात कोण? हे शोधण्याची गरज असून, या घटनेचा निषेध करण्यात आला. आठवडाभरापूर्वी अज्ञाताने टेकडी परिसरात आग लावली होती. सायंकाळच्या सुमारास बुद्ध टेकडी मित्रपरिवाराचे सदस्य प्रकाश कांबळे, सुनील ढाले, प्रणोज बनकर, राजू थूल, राजेश कोल्हे हे झाडांना पाणी देण्यासाठी पोहोचले  आणि त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवले. मात्र, पुन्हा तीच घटना घडली. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीदिनी बुद्ध टेकडी मित्रपरिवाराचे काही सदस्य बाबासाहेब आंबेडकरांची जन्मभूमी महू या गावी गेले होते तर काही सदस्य जयंतीच्या कार्यक्रमात व्यस्त होते. अचानक सायंकाळी ५च्या सुमारास  पुन्हा अज्ञाताने  टेकडी परिसराला आग लावली. या आगीने रौद्ररुप धारण केले तरीही बाजूलाच असलेल्या सेवाश्रममधील अनाथ  विद्यार्थ्यांनी जिवाची पर्वा न करता ही आग विझवली. आगीत अनेक झाडं जळून खाक झाली आहेत.  आग लावणाऱ्या अशा समाजकंटकाविरुद्ध कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

काही मुलांचे हातपाय भाजलेटेकडी परिसरात आग लागल्याचे दिसताच सेवाश्रम येथील अनाथ मुलांनी तसेच संचालक शिवाजी चौधरी आणि माधवी चौधरी यांनी जिवाची पर्वा न करता झाडांच्या फांद्यानी तसेच पाण्याचा मारा करून आगीवर नियंत्रण मिळवले.  हे करताना काही मुलांचे हात-पाय भाजून जखमा झाल्या. सेवाश्रमच्या मुलांचे आग विझविल्याबद्दल कौतुक करण्यात आले.

 

टॅग्स :fireआग