शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

दोन वर्षांपासून रेंगाळलेय जिल्हा सामान्य रुग्णालयाचे फायर ऑडिट, तातडीने पत्रव्यवहार करण्याच्या सूचना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2021 15:30 IST

wardha : जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या इमारतीचे फायर ऑडिट करून घेण्यासाठी न.प.च्या अग्निशमन विभागाशी पत्रव्यवहार करण्यात आला.

वर्धा : येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात एखाद्यावेळी आगीसारखी अनुचित घटना घडल्यावर परिस्थितीवर वेळीच नियंत्रण मिळविता यावे या हेतूने फायर ऑडीट होणे गरजेचे आहे. त्यासाठी वर्धा न.प.च्या अग्निशमन विभागाकडे पत्रव्यव्हार करण्यात आले. त्यांनी त्यांचा लेखी अभिप्रायही जिल्हा सामान्य रुग्णालय प्रशासनाला सादर केला आहे. पण त्यानंतर कुठलीही कार्यवाही न झाल्याने मागील दोन वर्षांपासून जिल्हा सामान्य रुग्णालयाचे फायर ऑडिट रेंगळले असल्याचे वास्तव आहे. पण शनिवारी भंडारा येथील घटनेनंतर जिल्हा शल्य चिकित्सकांनी सदर रेंगाळलेला विषय तातडीने निकाली काढण्यासाठी संबंधितांशी वेळीच पत्रव्यवहार करण्याच्या सूचना कर्मचाऱ्यांना दिल्या आहेत.

२०१८ मध्ये दिला न.प.ने अभिप्रायजिल्हा सामान्य रुग्णालयाच्या इमारतीचे फायर ऑडिट करून घेण्यासाठी न.प.च्या अग्निशमन विभागाशी पत्रव्यवहार करण्यात आला. याच पत्रव्यवहाराची दखल घेत न.प.च्या अग्निशमन विभागाच्या अधिकाऱ्यांनी जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या इमारतीची प्रत्यक्ष पाहणी करून सन २०१८ मध्ये आपला लेखी अभिप्राय जिल्हा सामान्य रुग्णालय प्रशासनाला दिला. पण त्यानंतर पाहिजे तसे प्रयत्न न झाल्याने हा विषय मार्गी निघालेला नाही.

अग्निरोधक सिलिंडर बेपत्ताजिल्हा सामान्य रुग्णालयातील विविध विभागात खबरदारीचा उपाय म्हणून किमान अग्निरोधक सिलिंडर असणे क्रमप्राप्त आहे. पण आवश्यक ठिकाणी अग्निरोधक सिलिंडरच नसल्याचे बघावयास मिळते. त्यामुळे जिल्हा सामान्य रुग्णालयातील अग्निरोधक सिलिंडर बेपत्ता तर झाले नाही ना असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

केवळ एकाच खासगी रुग्णालयात हॅडरन सिस्टीमवर्धा शहरात शंभराहून अधिक खासगी रुग्णालय आहेत. पण केवळ एकाच खासगी रुग्णालयात आग लागल्यावर परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रभावीपणे उपयुक्त ठरणारी हॅडरन सिस्टीम आहे. तर एका चित्रपटगृहातही सदर व्यवस्था आहे. विशेष म्हणजे सेवाग्राम आणि सावंगी येथील रुग्णालयाचे फायर ऑडीट झाले असल्याचे सांगण्यात आले. 

जिल्हा सामान्य रुग्णालयाला २०१८ मध्ये आम्ही फायर ऑडीट संदर्भातील लेखी अभिप्राय सादर केला आहे. पण त्यानंतर त्यांनी कुठलीही कार्यवाही केलेली नाही. त्यामुळे जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या इमारतीचे फायर ऑडीट झालेले नाही. भंडारा येथील घटनेची दखल घेत न.प.चा अग्निशमन विभाग हा जिल्हा सामान्य रुग्णालय प्रशासनाला फायर ऑडीट का केले जात नाही याबाबत विचारणा करणार आहे. त्यासाठी सोमवारनंतर लेखी पत्र देण्यात येणार आहे.- रविंद्र जगताप, विभाग प्रमुख, अग्निशमन विभाग, न.प. वर्धा.

भंडारा येथील घटनेनंतर वर्धा जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या इमारतीचे फायर ऑडीट झाले काय याची मी स्वत: शहानिशा केली. फायर ऑडीट झाले नसले तरी रुग्णालयात आवश्यक ठिकाणी अग्निरोधक सिलिंडर आहेत. जिल्हा सामान्य रुग्णालयाचे फायर ऑडीट करण्यासाठी संबंधित विभागाशी तातडीने लेखी पत्रव्यवहार करण्यात यावे अशा सूचना आपण आज संबंधितांना दिल्या आहेत. लवकरच हा विषय मार्गी लागेल अशी अपेक्षा आहे.- डॉ. सचिन तडस, जिल्हा शल्य चिकित्सक, वर्धा. 

टॅग्स :fireआगBhandara Fireभंडारा आग