शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

अखेर देवळीच्या वाळूचोर नगरसेवकाला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2021 05:00 IST

ट्रॅक्टर मालक माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक गौतम पोपटकर यांच्यावर कारवाई करून अटक करावी, तसेच मृताच्या परिवाराला आर्थिक मदत द्यावी, या मागणीकरिता लहू शक्ती संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसह मृताच्या परिवाराने पोलीस स्टेशनसमोर ठिय्या आंदोलन केले, अखेर पोलिसांनीही याप्रकरणी वाळूचोर नगरसेवक गौतम पोपटकर याला अटक केली.

लोकमत न्यूज नेटवर्कदेवळी : वाळू चोरीकरिता जाणारा ट्रॅक्टर उलटून दोन मजुरांना जीव गमवावा लागला, तर पाच मजूर गंभीर जखमी झाले. याप्रकरणी ट्रॅक्टर मालक माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक गौतम पोपटकर यांच्यावर कारवाई करून अटक करावी, तसेच मृताच्या परिवाराला आर्थिक मदत द्यावी, या मागणीकरिता लहू शक्ती संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसह मृताच्या परिवाराने पोलीस स्टेशनसमोर ठिय्या आंदोलन केले, अखेर पोलिसांनीही याप्रकरणी वाळूचोर नगरसेवक गौतम पोपटकर याला अटक केली.येथील माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक गौतम पोपटकर याने गेल्या दीड वर्षापासून सोनेगाव (बाई) शिवारातील नदी-नाल्यातून अवैधरीत्या वाळूचोरी सुुरू केली होती. याच दरम्यान सोमवारी सकाळी अडेगाव येथे वाळू आणण्याकरिता जाणाऱ्या एम.एच. ३२ ए.एच. ८७०९ क्रमांकाच्या ट्रॅक्टरला अपघात झाला. यामध्ये अनिल सुरेश लाकडे (३३) व ऋतिक दिनेश वानखेडे (२४) हे दोन मजूर ठार झाले, तर पाच मजूर गंभीररीत्या जखमी झाले. याप्रकरणी देवळी पोलिसांनी ट्रॅक्टर चालक शंकर भानारकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. ट्रॅक्टर मालक गौतम पोपटकर याचा वाळूचोरीचा व्यवसाय असून घटनेच्या दिवशी त्याच्या सांगण्यावरूनच आमच्या घरातील व्यक्ती ट्रॅक्टरवर कामाला गेली होती, असे मृताच्या कुटुंबीयांनी पोलिसांना सांगितले. यासोबतच ट्रॅक्टरचा विमा नसल्याने आणि अपघातग्रस्त ट्रॉलीचे कागदपत्र संशयित असल्याने याप्रकरणी ट्रॅक्टर मालकावर कारवाई करण्याची मागणी पहिल्या दिवशीपासूनच सुरू होती; परंतु पोलिसांनी याकडे दुर्लक्ष केल्याने मृतांच्या परिवारासह लहू शक्ती संघटनेच्या पदाधिकारी शनिवारी देवळी पोलीस स्टेशनवर मोर्चा नेऊन ठिय्या आंदोलन केले. यावेळी पोलिसांच्या कारवाई विरुद्ध संताप व्यक्त करून पोपटकर यांच्या अटकेची मागणी करण्यात आली. अखेर नागरिकांचा रोष बघून पोलिसांनी नगरसेवक पोपटकर यांना अटक केली. मालक व चालक यांच्याविरुद्ध भादंवि २७९, ३३७, ३०४-अ तसेच सहकलम १८४, १४६/१९६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आल्या. वाहनाचा विमा तसेच कागदपत्राची शहानिशा करून या गुन्ह्यात वाढ होण्याची शक्यताही पोलिसांनी वर्तविली आहे.

मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी

-    देवळी येथील माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक गौतम पोपटकर याच्या सांगण्यावरून घटनेच्या दिवशी सकाळी दोन्ही मृत व्यक्ती वाळू आणण्यासाठी झोपेतून उठून गेल्याचे कुटुंबियांनी खासदारांच्या भेटी दरम्यान सांगितले आहे. या सोबतच पोपटकर याचा अवैधरित्या वाळू चोरीचा व्यवसाय चांगलाच फोफावला. त्यामुळे या घटनेत दोघांच्या मरणास तोही तितकाच जबाबदार असल्याने पोपटकर याच्या विरुद्ध मनुष्यवधाच्या कलमान्वये गुन्हा दाखल करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. 

 

टॅग्स :sandवाळूSmugglingतस्करी