शहरं
Join us  
Trending Stories
1
'ऑपरेशन सिंदूर'च्या रात्री १०.३० वाजता अखेरचं बोलणं, पहाटे ३ वाजता पुन्हा कॉल, पण...
2
पाकिस्तानच्या सुरक्षा सल्लागारांनी अजित डोवाल यांना फोन केला? तुर्की मीडियाचा दावा
3
अंगावरचे कपडे फाडले, बेदम मारहाण; 'यु ट्युबर'वर रेल्वेतील पॅन्ट्री कर्मचाऱ्यांचा हल्ला, कारण...
4
“पाकिस्तानला कमी लेखता कामा नये, २४ तासांत कारवाई करायला हवी होती”: संजय राऊत
5
'ऑपरेशन सिंदूर'नंतर पुढे काय? आजच्या सर्वपक्षीय बैठकीत ठरणार मोठी रणनीती!
6
टेलिकॉम क्षेत्रात पुन्हा जिओची बाजी! 'या' बाबतीत ठरले अव्वल; व्हीआय-BSNL जवळपासही नाही
7
बिळातून बाहेर पडले, पाकिस्तानी सैन्य अधिकारी उघडपणे दहशतवाद्यांसोबत दिसले; हा घ्या पुरावा
8
Lahore Blast: पाकिस्तानमध्ये अचानक सायरन वाजला! विमानतळाजवळ तीन मोठे स्फोट, लाहोरमध्ये घबराट
9
Astro Tips: रोज घराबाहेर पडताना लावलेली 'ही' छोटीशी सवय देईल दीर्घकाळ सकारात्मक परिणाम!
10
ATM मध्ये व्यवहारापूर्वी दोनदा 'Cancel' बटण दाबलं तर पिन चोरी थांबवू शकता का? पाहा दाव्यामागील सत्य
11
Operation Sindoor : जम्मूमध्ये अलर्ट, जोधपूरमध्ये शाळा बंद! सीमेवर लष्कर सतर्क; हवाई संरक्षण युनिट्स सक्रिय केल्या
12
बँकांमध्ये तुमचे पैसे किती सुरक्षित? जर बँक बुडाली तर तुम्हाला पैसे परत मिळतात का?
13
कुख्यात आतंकवादी हाफिज सईदचं तळच उडवलं! मिसाईल स्ट्राईकने मुरिदकेत हाहाकार; पाहा व्हिडीओ
14
‘ऑपरेशन सिंदूर’वर राज ठाकरेंनी केलेल्या विधानावर CM फडणवीसांचे स्पष्ट भाष्य; म्हणाले...
15
द्वेषाचं बीज उखडून फेकणाऱ्या कर्नल सोफिया कुरेशी यांचा पगार किती? कुठून घेतलं शिक्षण? काय मिळतात सुविधा?
16
Helicopter Crash: गंगोत्रीकडे जाणारे हेलिकॉप्टर उत्तरकाशीच्या डोंगरात कोसळले, पाच भाविक ठार
17
Cheapest Home Loan: 'या' बँका देताहेत स्वस्त होम लोन; ७.९९% पासून सुरुवात, अर्ज करण्यापूर्वी चेक करा
18
"शेवटचे दोन महिने सोपे नव्हते", दीपिका पादुकोणने केला प्रेग्नंसीत आलेल्या अडचणींचा खुलासा
19
“भारत-पाकने संयम राखावा”; ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर रशियाशी युद्ध करत असलेल्या युक्रेनचे आवाहन
20
"हम अल्लाह की कसम खाते है...."; 'ऑपरेशन सिंदूर'नंतर अल कायदाची भारताला धमकी

वृक्षारोपणावर भर, संवर्धन ‘बॅकफुट’वर

By admin | Updated: August 29, 2016 00:40 IST

निसर्गाचा समतोल ढासळत आहे. वाढते औद्योगिकीकरण आणि वृक्षतोड यामुळे प्रदूषण वाढत आहे.

अहवाल कागदोपत्रीच : रोहयोंतर्गत ९.४२ लाख रोपांची लागवड गौरव देशमुख वर्धानिसर्गाचा समतोल ढासळत आहे. वाढते औद्योगिकीकरण आणि वृक्षतोड यामुळे प्रदूषण वाढत आहे. ही बाब लक्षात घेऊनच शासनाद्वारे शतकोटी वृक्ष लागवड उपक्रम हाती घेण्यात आला. शिवाय गावोगावी रस्त्याच्या दुतर्फा झाडे लावण्यासाठी आवाहन केले जाते; पण झाडे लावल्यानंतर त्यांच्या संवर्धनाकडे फारसे लक्ष दिले जात नाही, हे वास्तव आहे. उन्हाळा आला की, कोवळी झाडे करपत असल्याने वृक्ष लागवडीवरील खर्च व्यर्थ ठरत आहे. २०१२-१३ ते २०१५-१६ या तीन वर्षांतील आकडेवारी पाहता महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत ग्रामपंचायत, कृषी विभागामार्फत १०० टक्के वृक्ष लागवड करण्यात आली; पण संवर्धनाकडे दुर्लक्ष करण्यात आले. पावसाळ्यात वृक्ष लागवडीला उधान येते; पण उन्हाळा सुरू होताच वृक्षांचा विसर पडतो. त्या रोपट्यांचे संवर्धन करण्याची गरज कुणालाही वाटत नाही. प्रशासनाच्या बाबतीतही हिच बाब समोर येत आहे. वर्धा जिल्ह्यात २०१२ ते १५ दरम्यान ७ लाख २९ हजार ८९१ वृक्षांची लागवड करण्यात आली. यात २०१२-१३ मध्ये ७७ हजार २०४, २०१३-१४ मध्ये १ लाख ७३ हजार २२८ तर २०१४-१५ मध्ये २ लाख ९९ हजार ७ वृक्षांची लागवड करण्यात आली. मार्च २०१५ पर्यंत १ लाख ८० हजार ४५२ वृक्षांची लागवड झाली; पण यात किती झाडे जगली, किती करपली याबाबत नक्की माहिती उपलब्ध नाही. कागदोपत्री मात्र सर्व रोपटी जगल्याचीच नोेंद असल्याचे दिसू येत आहे. यावर्षी १ जुलै रोजी दोन कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमांतर्गत यंत्रणानिहाय वृक्ष लागवड करण्यात आली. यात गटविकास अधिकारी पं.स. (सर्व) १ लाख ६५ हजार १६६, कार्यकारी अभियंता लघु सिंचन (वर्धा, हिंगणघाट, आर्वी) ४ हजार ५००, कार्यकारी अभियंता बांधकाम विभाग जि.प. वर्धा २ हजार ३०, शिक्षण विभाग माध्य. १० हजार ३९६, शिक्षण विभाग प्राथमिक २५ हजार ७८, पशुसंवर्धन विभाग १ हजार ७९८, जिल्हा आरोग्य अधिकारी २ हजार ८०० तर ग्रामीण पाणी पुरवठा विभागाद्वारे २०० वृक्षांची लागवड करण्यात आली. या जि.प. यंत्रणेनिहाय २ लाख १२ हजार २३८ वृक्षांची लागवड करण्यात आली; पण यापैकी १० टक्के रोपटी तरी जगतील काय, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. त्या वृक्षांच्या संवर्धनाकडे कितपत लक्ष दिले जाते, हा प्रश्नच असून याचा विचार होणे गरजेचे आहे.