शहरं
Join us  
Trending Stories
1
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
2
Maharashtra Rain: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
3
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
4
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
5
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
6
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
7
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
8
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
9
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
10
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
11
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
12
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
13
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
14
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
15
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
16
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
17
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!
18
...तर मी ट्रेनमधून पडून मेलो असतो; एक चूक अन् आयुष्य संपलं असतं, 'मुरांबा'मधील अभिनेत्याने सांगितला धक्कादायक प्रसंग
19
महिन्याला ३० हजार कमावणारेही होऊ शकतात कोट्यधीश, 'अशी' करू शकता गुंतवणूक
20
Black Box: अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले

वर्ध्यात दारूवरून दोन कुटुंबांत राडा, दोघांवर जीवघेणा हल्ला; गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2022 18:02 IST

पळसगाव येथील घटना, तिघांविरुद्ध मारहाण केल्याबाबतचा गुन्हा दाखल

वर्धा : दारुच्या कारणातून झालेल्या वादात दोन कुटुंबात चांगलाच राडा झाला. दरम्यान, एका कुटुंबातील दोन युवकांना मारहाण करत त्यांच्या पाठीवर आणि छातीवर चाकूने वार करून  त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला. तर, दुसऱ्या कुटुंबातील एकाला चाकूने मारहाण करीत जखमी केले. 

ही घटना पळसगाव येथे घडली असून, याप्रकरणी ३ रोजी देवळी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली. पोलिसांनी दोन्ही कुटुंबातील सदस्यांविरुद्ध गुन्हा दाखल केल्याची माहिती दिली. पहिल्या तक्रारीनुसार आकाश कौरती, सालोडकर, गणेश उईके, अनिल भलावी यांनी प्रशांत बाजारे आणि वैभव बाजारे यांच्या छातीवर आणि पाठीवर चाकूने मारहाण करीत ठार मारण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी जगदीश तुळशीदास बाजारे यांनी पोलिसात तक्रार दिली.

तर, मंगेश उर्फ गणेश लक्ष्मण उईके यांच्या तक्रारीनुसार त्याने वैभव बाजारे याला तू गावातील लहान मुलांना दारु देऊ नकोस, असे म्हटले असता वैभव बाजारे, वानखेडे, प्रशांत घेही यांनी मंगेश याच्याशी वाद करुन त्याला काठीने व चाकूने मारहाण केल्याची तक्रार दाखल केली. पोलिसांनी याप्रकरणी तिघांविरुद्ध मारहाण केल्याबाबतचा गुन्हा दाखल केल्याची माहिती दिली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीwardha-acवर्धा