शहरं
Join us  
Trending Stories
1
"आपलं टार्गेट चीन, तर भारताच्या रुपाने...!", निक्की हेली यांनी ट्रम्प प्रशासनाला फटकारलं; स्पष्टच बोलल्या
2
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधूंच्या सपशेल पराभवावर CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
3
मृत्यूच्या खाईत सौंदर्याचा सशक्त आवाज; पॅलेस्टाइनची तरुणी यंदा 'मिस युनिव्हर्स'मध्ये...
4
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
5
शाहरुखचा लेक त्याचाच डुप्लिकेट! लूक अन् आवाज सगळंच सेम, पहिल्यांदाच आला प्रेक्षकांसमोर, म्हणाला...
6
'त्याला मीच मारलं पण तो कोण होता?'; दहावीच्या विद्यार्थ्याची हत्या करणाऱ्या मुलाची धक्कादायक चॅटिंग समोर
7
आजचे राशीभविष्य, २१ ऑगस्ट २०२५: स्वाभिमान दुखावला जाऊ शकतो; स्त्री वर्गाकडून विशेष लाभ
8
विशेष लेख: चोरी ती चोरीच आणि वरून शिरजोरी? निवडणूक आयोगाने किती सांगितले अन् किती लपवले...
9
“वराह जयंती साजरी करण्याची मागणी म्हणजे तरुणांचे लक्ष दुसरीकडे वळवण्याचा अजेंडा”: सपकाळ
10
पर्युषण पर्वात कत्तलखाने १० दिवस बंद ठेवण्याच्या मागणीला कायदेशीर आधार काय? - उच्च न्यायालय
11
घरांच्या किमतींपेक्षा भाडे जास्त वेगाने वाढते आहे.... महानगरांतली वाढ तर चक्रावून टाकणारी !
12
मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार! अधिक प्रवासी झाल्यास गाडी पुढे न सोडण्याचा निर्णय
13
आजचा अग्रलेख: मनमानी आणि कंत्राटदारधार्जिणे निर्णय रोखून खाबूगिरीला चाप बसावा, म्हणून...
14
पावसाची उसंत पण धरणाातून पाण्याचा विसर्ग; नद्या आल्या रस्त्यांवर, पुराचा विळखा अजूनही घट्ट
15
पावसाची डबल सेंच्युरी; २४ तासांत २०९ मिमी नाेंद; आता ‘ऑल टाइम रेकॉर्ड’ मोडण्याच्या मार्गावर
16
'मोनोरेल'कडे आपत्कालीन बचाव यंत्रणाच नाही; क्षमता फक्त गाडी ओढून स्थानकात नेण्याची!
17
भाड्याच्या जागेतील सरकारी कार्यालये पुढील वर्षी वडाळ्यात; GST भवनात करणार सगळ्यांची व्यवस्था
18
मका वाचवण्यासाठी कुंपणातून सोडलेला करंट ठरला काळ; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
19
वादळात सहा बोटी बुडाल्या; मुंबई, गुजरातमधील सात खलाशी बेपत्ता, ११ जणांना वाचविले
20
मोनोच्या सात गाड्या दिरंगाईच्या फेऱ्यात; चाचण्या सुरू असल्याचा ‘एमएमएमओसीएल’चा दावा

पंधरा वार करून दारूविक्रेत्या ‘मनोज’ची क्रूरपणे हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2021 05:00 IST

मृत मनोज धानोरकर याने घराच्या अवघ्या काही अंतरावर किरायाने खोली घेतली होती. त्या खाेलीतून तो दारूविक्रीचा व्यवसाय करीत होता. शनिवारी रात्रीच्या सुमारास मनोजच्या पत्नीने त्याला भ्रमणध्वनी करून जेवण करण्यास येण्यासाठी सांगितले. त्यावेळी मनोजचा कुणाशीतरी वाद सुरू असल्याने त्याचा आवाज मनोजच्या पत्नीला फोनवर ऐकू आला. मनोजच्या पत्नीने तत्काळ घटनास्थळाकडे धाव घेतली असता मनोज रक्ताच्या थारोळ्यात जमिनीवर पडला असल्याचे दिसून आले.

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जुन्या वैमनस्यातून दारूविक्रेत्याची धारदार शस्त्राने सपासप वार करीत क्रुररित्या हत्या केल्याची खळबळजनक घटना शनिवारी मध्यरात्री ११.३० वाजताच्या सुमारास शहरातील गोंडप्लॉट परिसरात घडली. या घटनेने परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. याप्रकरणी शहर पोलिसांनी एकास अटक केली असून इतर चार आरोपींचा शोध पोलीस घेत असल्याची माहिती शहर पोलिसांनी दिली. मनोज मुकुंद धानोरकर (३२) रा. केळकरवाडी असे मृत दारूविक्रेत्याचे नाव आहे.मृत मनोज धानोरकर याने घराच्या अवघ्या काही अंतरावर किरायाने खोली घेतली होती. त्या खाेलीतून तो दारूविक्रीचा व्यवसाय करीत होता. शनिवारी रात्रीच्या सुमारास मनोजच्या पत्नीने त्याला भ्रमणध्वनी करून जेवण करण्यास येण्यासाठी सांगितले. त्यावेळी मनोजचा कुणाशीतरी वाद सुरू असल्याने त्याचा आवाज मनोजच्या पत्नीला फोनवर ऐकू आला. मनोजच्या पत्नीने तत्काळ घटनास्थळाकडे धाव घेतली असता मनोज रक्ताच्या थारोळ्यात जमिनीवर पडला असल्याचे दिसून आले.  याबाबतची माहिती शहर पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून मनोजला जिल्हा सामान्य रुग्णालयात नेले. तेथून त्याला  सेवाग्राम येथील रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी तपासणीअंती त्याला मृत घोषीत केले.  याप्रकरणी मनोजची पत्नी कोमल धानोरकर रा. केळकरवाडी हिने शहर पोलिसात तक्रार दिली आहे. पोलिसांनी याप्रकरणी आकाश जयस्वाल याला अटक करून उर्वरित पाच आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी पीयूष जगताप, ठाणेदार सत्यवीर बंडीवार यांनी भेट दिली. तसेच पोलीस उपनिरीक्षक मोहन धोंगडे, नरेंद्र कांबळे, संजय पंचभाई यांच्यासह शोध पथकाने तपासकार्य सुरू केले. घटनास्थळी श्वानपथक, ठसे तज्ज्ञांनाही पाचारण करण्यात आले होते. सायंकाळी चेतन रमेश जुमडे व प्रितीजन अशोक मडावी रा. गोंडप्लॉट यांनाही अटक केली आहे.

मृतकावर विविध गंभीर गुन्हे दाखल -    मृत मनोज धानोरकर हा गुंडगिरी प्रवृत्तीचा होता. त्याच्यावर शहर ठाण्यात जीवे मारण्याचा हल्ला, जबर मारहाण आदीसह विविध गंभीर गुन्हे दाखल असल्याची माहिती शहर पोलिसांनी दिली. तो किरायाने घेतलेल्या खोलीतून दारूविक्री करायचा. त्याच खोलीत शनिवारी मध्यरात्री त्याचा सहा जणांनी ‘गेम’ केला. आरोपी आकाश जयस्वाल हा देखील दारूविक्रेता असल्याचे सूत्रांनी सांगितले.

१५ वार अन् कोथळाच काढला बाहेर -    मृतक मनोज हा मध्यरात्रीच्या सुमारास दारूअड्ड्यावर असतानाच आरोपी आकाश जयस्वाल आणि त्याच्या मित्रांनी मनोजवर हल्ला चढविला. मनोजला लाथाबुक्क्यांनी मारहाण करीत त्याच्या हनुवटी, मान, पाठ, आदी ठिकाणी सुमारे १५ ते २० वेळा सपासप वार करून मनोजचा कोथळाच बाहेर काढला. हा थरार नागरिकांनी डोळ्याने अनुभवला असून या घटनेने शहरात चांगलीच खळबळ माजली. 

मृतक अन् आरोपी दोघेही दारूविक्रेते -    मृत मनोज धानोरकर आणि आरोपी आकाश जयस्वाल यांच्यात जुना वाद होता. ऑक्टोबर २०२० मध्ये मृतक मनोज याने आकाश जयस्वाल याच्यावर जीवघेणा हल्ला केला होता. याचा वचपा काढण्यासाठी आकाश जयस्वाल याने मनोजची हत्या केल्याचे पोलिसांच्या आतापर्यंतच्या तपासात पुढे आले आहे.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीDeathमृत्यू