शहरं
Join us  
Trending Stories
1
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
2
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
3
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
4
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
5
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
6
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
7
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
8
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
9
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
10
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
11
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
12
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग
13
Nagpur Rains : अंदाज खरा ठरला ! मुसळधार पावसाने नागपूरकरांना झाेडपले; अजून किती दिवस असाच बरसणार?
14
Shalarth ID Scam : 'ते' ६३२ शिक्षक, मुख्याध्यापक तुरुंगात जाणार? शिक्षण क्षेत्रातील सर्वात माेठा घोटाळ्याची झाडाझडती सुरु
15
Video - "तीळ कुठे आहे हे Gemini ला कसं कळलं?"; तरुणीने सांगितला धक्कादायक अनुभव
16
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
17
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
18
पडळकरांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा जीवाचे बरे-वाईट करू; कुणी दिला इशारा, नेमके प्रकरण काय?
19
IND vs PAK हस्तांदोलन वादावर ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टींग स्पष्ट बोलला, पाकिस्तानला झापलं...
20
मेघालयमध्ये मोठी राजकीय उलथापालथ, ८ मंत्र्यांनी दिला राजीनामा, नेमकं कारण काय?

औद्योगिक वसाहतीतील संवेदनशील भागात भीषण आग; ४ तासांनंतर आगीवर नियंत्रण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2022 13:51 IST

बुधवारी सकाळी साडेनऊ वाजताच्या सुमारास औद्योगिक वसाहतीतील संवेदनशील भागात ही आग लागल्याने एकच हाहाकार माजला.

ठळक मुद्दे२५ एकरातील गवत स्वाहा

देवळी (वर्धा) : स्थानिक औद्योगिक वसाहत परिसरातील कारखान्यांना पाणीपूरवठा करणाऱ्या वॉटर प्लांटच्या सभोवताल तसेच या परिसरातील २५ एकराच्या आरक्षित जागेतील गवताला भीषण आग लागून वणवा पेटला. बुधवारी सकाळी साडेनऊ वाजताच्या सुमारास औद्योगिक वसाहतीतील संवेदनशील भागात ही आग लागल्याने एकच हाहाकार माजला.

पॉवरग्रीडच्या भागाकडून ही आग लागून पाहता-पाहता संजय इंडस्ट्रीज जिनिंग पर्यंत पोहचली. हवेचा जोर असल्याने ही आग काही वेळातच सगळीकडे पोहचली. काही मजुरांच्या माहितीवरून शिवसेनेचे अनंत देशमुख, माजी नप उपाध्यक्ष प्रा नरेंद्र मदनकर व नायब तहसीलदार राजेंद्र देशमुख यांनी सूत्रे हलविली. देवळी व वर्धा नगर परिषदेच्या अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले. पॉवर ग्रीड, जिनिंग फॅक्टरी व ऑक्सिजन प्लांटच्या संवेदनशील भागात ही आग लागल्याने तहसीलदार राजेश सरवदे यांनी घटनास्थळ गाठून निर्देश दिले.

वॉटर प्लांटच्या २५ एकराचे परिसरात जंगल वाढले आहे. औद्योगिक वसाहत प्रशासनाच्या दुर्लक्षित धोरणामुळे हा भाग बाभूळ, बोर तसेच इतर वनस्पती व गवताने व्यापला आहे. अग्निशामक दलाच्या दोन्ही गाड्यांनी अथक परिश्रम करून ही आग आवाक्यात आणली. ही घटना रात्रीची असती तर नक्कीच अनर्थ घडला असता अशी भावना लोकांनी व्यक्त करून एमआयडीसी प्रशासनाने याकडे लक्ष द्यावे. तसेच भागात आवश्यक सुविधां पुरविण्यात याव्या अशी मागणी केली.

औद्योगिक वसाहत परिसरात वाढलेले गवत तसेच झाडे तोडण्याचे व इतर मेंटनन्सचे काम आमचे नाही. वसाहतीचा पाणीपुरवठा पॉवर ग्रीडमधील सम मधून केला जात आहे. त्यामुळे आगीच्या घटनास्थळी असलेली वॉटर टॅंक निकामी पडली आहे.- मोहन व्यास, डेप्युटी इंजिनिअर,औद्योगिक वसाहत, वर्धा

टॅग्स :fireआगAccidentअपघात