लोकमत न्यूज नेटवर्कसमुद्रपूर : कोरोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीने सर्वच मालाची आवक-जावक तूर्तास विस्कळीत झाली आहे. अशातच शेतीचा हंगाम तोंडावर आल्याने शेतकऱ्याची बी-बियाणे व रासायनिक खत खरेदीची धावपळ सुरू झाली आहे. अशा बिकट परिस्थितीत तालुक्यातील शेतकऱ्यांना कोणत्याही बियाणे, खतांचा तुटवडा जाऊ नये यासाठी कृषी विभागामार्फत खबरदारी घेतली जात आहे. याच पार्श्वभूमीवर तालुका कृषी विभागाने ३५० टन रासायनिक खत व एक हजार क्विंटल बियाणे थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पोहचविण्याचे नियोजन केले आहे. या उपक्रमाचा प्रारंभ उपविभागीय कृषी अधिकारी नंदकुमार घोडमारे, तालुका कृषी अधिकारी गणेश सूर्यवंशी यांच्या उपस्थितीत करण्यात आला.कोरोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीत तालुक्यातील शेतकऱ्यांना कोणत्याही रासायनिक खत, बियाण्यांची कमतरता भासणार नाही. शेतकऱ्यांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवू नये, तसेच बोगस बीटी, बियाणे खरेदी करीत फसगत करून घेऊ नका, असे आवाहन तालुक्यातील शेतकऱ्यांना केले आहे. यावेळी पं. स. सदस्य रवी दांडेकर, नितीन वंदिले, कृषी पर्यवेषक प्रशांत राऊत, सहायक औदुंबर देवकाते, राजेश चांदेवार यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.
शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचविले जाणार खत आणि बियाणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2020 05:00 IST
शेतीचा हंगाम तोंडावर आल्याने शेतकऱ्याची बी-बियाणे व रासायनिक खत खरेदीची धावपळ सुरू झाली आहे. अशा बिकट परिस्थितीत तालुक्यातील शेतकऱ्यांना कोणत्याही बियाणे, खतांचा तुटवडा जाऊ नये यासाठी कृषी विभागामार्फत खबरदारी घेतली जात आहे. याच पार्श्वभूमीवर तालुका कृषी विभागाने ३५० टन रासायनिक खत व एक हजार क्विंटल बियाणे थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पोहचविण्याचे नियोजन केले आहे.
शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचविले जाणार खत आणि बियाणे
ठळक मुद्देशेतकऱ्यांना दिलासा : तालुका कृषी विभागाने केले नियोजन