शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

खाकी वर्दीचे भय संपले? शहरात अवैधरीत्या बहरली ‘चेंगळ’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2021 05:00 IST

अवैध व्यवसायामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न मात्र ऐरणीवर आला आहे. वर्धा शहरातील इतवारा बाजार, तुकाराम वॉर्ड, परदेशीपुरा, शास्त्री चौक, टिळक भाजी मार्केट गोल बाजार, आर्वी मार्गालगत कित्येक दिवसांपासून अवैधरीत्या चेंगळ व्यवसाय चालविला जात आहे.  सायंकाळनंतर ही चेंगळ जोर धरत असून रात्री उशिरापर्यंत चालते. या व्यवसायात तरुणाई मोठ्या प्रमाणावर गुरफटली आहे. विशेष म्हणजे चेंगळ अड्ड्यावरच दारू, गांजाही सहज उपलब्ध करून दिला जात आहे.

ठळक मुद्देराजरोसपणे व्यवसाय सुरू : कायदा, सुव्यवस्थेची लक्तरे वेशीवर

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : अवैध दारू व्यवसायाने शहरात मोठे जाळे विणले असतानाच शहरातील विविध भागात चेंगळ अर्थात जुगाराचे डाव रंगत असून हा व्यवसाय गत काही दिवसांत चांगलाच बहरला आहे. जुगाऱ्यांवर कारवाई होत नसल्याने या व्यवसायाला प्रशासनाची मूकसंमती आहे की खाकीचे भय संपले? अशी चर्चा होत आहे.      या अवैध व्यवसायामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न मात्र ऐरणीवर आला आहे. वर्धा शहरातील इतवारा बाजार, तुकाराम वॉर्ड, परदेशीपुरा, शास्त्री चौक, टिळक भाजी मार्केट गोल बाजार, आर्वी मार्गालगत कित्येक दिवसांपासून अवैधरीत्या चेंगळ व्यवसाय चालविला जात आहे.  सायंकाळनंतर ही चेंगळ जोर धरत असून रात्री उशिरापर्यंत चालते. या व्यवसायात तरुणाई मोठ्या प्रमाणावर गुरफटली आहे. विशेष म्हणजे चेंगळ अड्ड्यावरच दारू, गांजाही सहज उपलब्ध करून दिला जात आहे. रात्री उशिरापर्यंत चालणाऱ्या या ‘चेंगळ’मुळे सामाजिक आरोग्य धोक्यात आले आहे. या अड्ड्यांवर मोठ्या संख्येने असामाजिक प्रवृत्तीचा वावर राहत असून येथूनच गुन्हेगारी प्रवृत्तीला खतपाणी मिळत आहे. विविध भागातील हे जुगार अड्डे सर्रास सुरू असून सर्वसामान्यांना यामुळे मोठा त्रास सहन करावा लागत आहे. कुणी तक्रार करण्यास धजावल्यास चेंगळ चालविणाऱ्यांकडून जीवे मारण्याची धमकीही दिली जात आहे. त्यामुळे तक्रारही करता येईना आणि संबंधित ठाण्याच्या हद्दीतील पोलिसांना दिसूनही कारवाई होईना, अशी स्थिती निर्माण झाली असल्याने  दाद कुणाकडे मागावी, हा प्रश्न कायम आहे. या अवैध व्यवसायांमुळे  जिल्ह्याचे सामाजिक आरोग्य धोक्यात आले असून एकाही चेंगळ व्यवसायावर कारवाई होत नसल्याने या व्यवसायाला मूकसंमती आहे काय, असा सवाल केला जात आहे. अवैध व्यवसायांमुळे गुन्हेगारीला खतपाणी मिळत आहे. पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेण्याची गरजेचे असताना या विभागाच्या जाणिवा ‘अर्थ’कारणामुळे बोथट झाल्या आहेत.

मुख्यमंत्री, गृहमंत्र्यांंना पाठविणार पोस्ट कार्ड- अवैध व्यवसायाविरुद्ध शहरातील विविध भागातील त्रस्त नागरिक एकवटले आहेत. शासन-प्रशासनाला जागे करण्यासाठी नागरिक मुख्यमंत्री, गृहमंत्र्यांना पोस्ट कार्ड मोहिमेद्वारे गांधी जिल्ह्यात बहरलेल्या अवैध दारूविक्री आणि चेंगळ व्यवसायाविषयी अवगत करणार आहेत.

कारवाई करणार कोण?- शहरातील विविध भागात परवाना असल्यागत चेंगळ व्यवसाय सुरू आहे;मात्र एकाही अवैध व्यवसायावर कारवाई झाल्याचे ऐकिवात नाही. त्यामुळे या व्यवसायावर कारवाई करण्याची जबाबदारी तरी कुणाची, असा प्रश्न जनसामान्यांत चर्चिला जात आहे. प्रशासन मात्र गंभीर नाही.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPolice Stationपोलीस ठाणे