शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

पिपरीत वडिलांकडून मुलाची तर सेवाग्रामात एकाची हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2022 05:00 IST

या दोन्ही प्रकरणी आरोपींविरुद्ध मनुष्यवधाच्या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशाल नारायण चचाणे (३२)  रा. पिपरी (मेघे) असे पिपरी (मेघे) येथील घटनेतील तर अरुण थुल (६२) असे सेवाग्राम येथील घटनेतील मृताचे नाव आहे. पिपरी (मेघे) येथील घटनेतील आरोपीला रामनगर पोलिसांनी अटक केली असून, सेवाग्राम येथील घटनेतील आरोपीच्या शोधार्थ पोलिसांच्या तीन चमू रवाना करण्यात आल्या आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : पैशाच्या कारणावरून वाद करून बापानेच थेट मुलाला ठार केल्याची घटना वर्धा शहरानजीकच्या पिपरी (मेघे) येथील बेघर वस्तीत घडली. तर क्षुल्लक कारणावरून वाद करीत वयोवृद्ध व्यक्तीची निर्दयतेने हत्या करण्यात आल्याची घटना सेवाग्राम भागातील हावरे ले-आउट परिसरात घडली. या दोन्ही प्रकरणी आरोपींविरुद्ध मनुष्यवधाच्या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशाल नारायण चचाणे (३२)  रा. पिपरी (मेघे) असे पिपरी (मेघे) येथील घटनेतील तर अरुण थुल (६२) असे सेवाग्राम येथील घटनेतील मृताचे नाव आहे. पिपरी (मेघे) येथील घटनेतील आरोपीला रामनगर पोलिसांनी अटक केली असून, सेवाग्राम येथील घटनेतील आरोपीच्या शोधार्थ पोलिसांच्या तीन चमू रवाना करण्यात आल्या आहेत. वर्धा शहराच्या शेजारीच असलेल्या पिपरी( मेघे) येथील बेघर वस्तीत आणि सेवाग्राम येथील हावरे ले-आउट भागात हत्येची घटना घडल्याची माहिती मिळताच अपर पोलीस अधीक्षक यशवंत सोळंके, उपविभागीय पोलीस अधिकारी पीयूष जगताप यांनी दोन्ही घटनास्थळी भेट देत बारकाईने पाहणी केली.

गोव्यात अरुणचा आहे बियर बार- मृत अरुण थुल हा गोवा येथे काही वर्षांपूर्वी स्थायी झाला असून त्याचा तेथे बियर बार असल्याचे पोलिसांच्या आतापर्यंतच्या चौकशीत पुढे आले आहे. तो सेवाग्राम येथील घरी एकटा असताना आरोपीने त्याच्या घरात प्रवेश करून त्याच्या डोक्यावर जबर प्रहार करून त्यास जीवानीशी ठार केले. पोलिसांच्या सखोल तपासात नेमके काय पुढे येते याकडे साऱ्यांचेच लक्ष लागले आहे. मृत अरुणच्या पार्थिवाची उत्तरिय तपासणी कस्तुरबा रुग्णालयात डॉ. प्रवीण झोपाटे आणि डॉ. हर्षलता चव्हाण यांनी केली.

अरुण थुल झाला होता गोव्यात स्थायी- अरुण थुल हा गोवा येथे काही वर्षांपूर्वी स्थायी झाला असला तरी त्यांचे सेवाग्राम येथील हावरे ले-आउट येथे घर आहे. तो काही दिवसांपूर्वी कुटुंबीयांसह गोवा येथून सेवाग्राम येथे आला होता. नंतर त्याचे कुटुंबीय गोव्याला परतले; पण तो सेवाग्राम येथेच थांबला होता. अशातच अज्ञात व्यक्तीने अरुणच्या घरात प्रवेश करून त्याच्या डोक्यावर जबर प्रहार करून त्यास ठार केले. ही बाब लक्षात येताच अरुणच्या भावाने सेवाग्राम पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच सेवाग्रामचे ठाणेदार नीलेश ब्राह्मणे यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळ गाठले. घटनास्थळी ठसे तज्ज्ञ व श्वान पथकाला पाचारण करण्यात आले होते. घरगुती कारणावरून झालेला वाद विकोपाला जात अरुणची हत्या करण्यात आली असावी, असा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून वर्तविला जात आहे. या प्रकरणी सेवाग्राम पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जड वस्तूने केला विशालच्या डोक्यावर प्रहार

पैशाच्या कारणावरून वाद करून नारायण चचाणे याने मुलगा विशाल चचाणे यास बेदम मारहाण करून त्याची हत्या केली. आरोपीने निर्दयतेचा कळस गाठून विशालच्या डोक्यावर जड वस्तूने गंभीर प्रहार केले. यात त्याचा जागीच मृत्यू झाला. विशेष म्हणजे घटनेच्या वेळी विशालची आई घरी नव्हती. विशालची आई बेबी या घरी परतल्यावर त्यांना मुलगा अरुण रक्ताच्या थारोळ्यात मृत अवस्थेत दिसला. त्यानंतर त्यांनी स्वत:ला कसेबसे सावरत घटनेची माहिती परिसरातील नागरिकांसह रामनगर पोलिसांना दिली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेत पंचनामा करून मृतदेह उत्तरिय तपासणीसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविला. या प्रकरणी बेबी चचाणे यांच्या तक्रारीवरून आरोपी नारायण चचाणे याच्याविरुद्ध मनुष्यवधाच्या कलमान्वये गुन्हा दाखल करून त्यास अटक केली आहे. पुढील तपास रामनगर पोलीस करीत आहेत.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस