शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रशासकराज संपणार : १५ जानेवारीला मतदान, तर १६ जानेवारीला निकाल! महापालिकांचा महासंग्राम
2
आजचे राशीभविष्य, १६ डिसेंबर २०२५: सरकारी कामात यश, अचानक धनलाभ; सुखाचा दिवस
3
पाकिस्तानमध्ये शिजला पहलगाम हल्ल्याचा कट, सहा जणांविरोधात १,५९७ पानांचे आरोपपत्र!
4
इंडिगो गोंधळाबाबतच्या याचिकेवर सुनावणी घेण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार; दिल्ली उच्च न्यायालयात दाद मागण्याचे आदेश
5
एक कोटी मतदार बजावणार हक्क; मुंबई महापालिका निवडणूक : एक लाख दुबार मतदार तपासणीत वगळले जाण्याची शक्यता
6
ऑर्डर कॅन्सल करण्याच्या कारणावरून वाद; डिलिव्हरी बॉयचा मित्रावर चाकूहल्ला
7
संपादकीय : यत्र, तत्र, पाकिस्तान सर्वत्र! ऑस्ट्रेलियातील हल्ल्याचे पाकिस्तानी कनेक्शन
8
...जेव्हा गुंडच पोलिसांच्या कॉलरला हात घालतात; कांदिवलीत ५ अटकेत
9
सर्वोच्च न्यायालयाचा सल्ला-उत्तर कमी, गुंता अधिक! न्यायालयीन सल्ल्यामुळे राजकीय अनिश्चितता वाढली
10
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
11
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
12
भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई
13
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
14
कुख्यात गँगस्टर सुभाषसिंह ठाकूरचा ताबा मिरा भाईंदर पोलिसांकडे; मंगळवारी कोर्टात हजर करणार
15
कोंबड्यांचा व्यवसायाआड चालणारा अमली पदार्थांचा कारखाना पोलिसांकडून उद्ध्वस्त, ११ अटकेत
16
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
17
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
18
बालविवाह थांबवला..! नवरदेव लग्न मंडपात जाणार होता, पण त्यापूर्वीच दामिनी पथकाची धडक अन्...
19
डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
20
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

शेतमालाच्या पडत्या भावाने शेतकरी चिंताग्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2017 23:47 IST

विदर्भातील शेतकरी उत्पादन घेत असलेल्या शेतमालांच्या किंमती प्रचंड प्रमाणात मागील तीन वर्षात घसरल्यामुळे विदर्भात शेतकरी आत्महत्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे.

ठळक मुद्देतीन वर्षात कमालीची घसरण : हमीभावापेक्षा कमी दराने खरेदी

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : विदर्भातील शेतकरी उत्पादन घेत असलेल्या शेतमालांच्या किंमती प्रचंड प्रमाणात मागील तीन वर्षात घसरल्यामुळे विदर्भात शेतकरी आत्महत्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. केंद्र व राज्य सरकारने जाहीर केलेल्या हमीभावापेक्षाही कमी दराने शेतकऱ्यांना शेतमाल विकण्याची वेळ आली आहे. शेतमालाच्या या घसरत्या किंमतीमुळे शेतकरी व त्यांचे कुटुंबीय चिंताग्रस्त झाले आहे.विदर्भात कापूस, ऊस, सोयाबीन, ज्वारी, बाजरी, तूर, उडीद, मुंग, सूर्यफुल, हरभरा व तीळ हे पीक घेतले जातात. कापूस हे खरीप हंगामातील नगदी पीक आहे. त्यामुळे विदर्भातील शेतकरी मोठ्या प्रमाणावर कापसाची लागवड करीत असतात. २०११ मध्ये कापसाला ३४०० रुपये प्रती क्विंटल भाव होता. त्यानंतर २०१२ मध्ये ३८०० रुपये क्विंटल दराने कापसाची खरेदी झाली. २०१३ मध्ये ४२०० तर २०१४ मध्ये ४६०० रुपये प्रतिक्विंटल भाव कापसाला मिळाला. २०१५ मध्ये ४१०० तर २०१६ मध्ये ३८०० ते ४००० रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला. २०१७ मध्ये कापसाचा ४४०० रुपयांवर आहे. कापसाच्या भावात सतत दरवर्षी कमी दर मिळत आहे. कापसाच्या शेतीला लागणारा खर्च वसूल होणे कठीण झाले आहे.यंदा बोंडअळी शेतकºयांचे पीक पूर्णत: नष्ट झाले. त्यामुळे लागलेला ही खर्च मिळालेला नाही. सरकीच्या भावात मंदी असल्याने कापसाचा भाव ४४०० रुपयाच्यावर जाण्याची शक्यता यंदा दिसत नाही. त्यामुळे शेतकरी अडचणीत आला आहे. गुजरात सरकारने कापसाला ५०० रुपये प्रति क्विंटल बोनस जाहीर करावा, अशी मागणी राज्यातील शेतकºयांनी केली आहे.सोयाबीनच्या भावाबाबतही अशीच परिस्थिती आहे. २०११ मध्ये सोयाबीनचा भाव ३२०० रुपये प्रति क्विंटल, २०१२ मध्ये ३४००, २०१३ मध्ये ३८०० तर २०१४ मध्ये ४००० रुपये प्रति क्विंटल भाव होता. तर यंदा २०१७ मध्ये हा भाव २९०० रुपयांवर पोहचले आहे. मधले दोन वर्ष अनुक्रमे शेतकºयांना २७०० व २४०० भाव मिळाला. सोयाबीन पिकाला येणारा खर्च पाहू जाता सोयाबीनचा भाव ही शेतकºयांना परवडणारा नाही. गेल्यावर्षी शासनाने तूर खरेदी मोठ्या प्रमाणावर गोंधळ घातला. शेतकºयांना प्रचंड मानसिक त्रास सहन करावा लागला. तुरीचे २०११ मध्ये ३२०० रुपये होते. २०१२ मध्ये ३१००, २०१३ मघ्ये ३३००, २०१४ मध्ये ३२०० तर २०१५ मध्ये २७००, २०१६ मध्ये २५०० तर गत वर्षीही २२०० ते २५०० रुपयांच्या दरम्यान तुरीला भाव मिळाला. हीच परिस्थिती अन्य पिकांच्याही बाबत आहे. ऊसाच्याही भावामध्ये शेतकरी विदर्भात नागविल्या जात आहे. एकूणच शासनाचे धोरण स्वत:च शेतमाल खरेदीचे नाही. खासगी बाजारातील व्यापाऱ्यांनी शेतकºयांचा शेतमाल खरेदी करावा, अशी व्यवस्था सरकारी यंत्रणेकडून गेल्या तीन वर्षापासून करण्यात येत आहे.अधिवेशनाकडे शेतकऱ्यांचे लक्षकापूस पणन महासंघाने कापूस उत्पादक शेतकऱ्यांना प्रति क्विंटल १००० रूपये बोनस द्यावा, अशी मागणी राज्य सरकारकडे केली आहे. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसपक्षाने विदर्भातील शेतकऱ्यांची दयनिय अवस्था लक्षात घेवून १ डिसेंबरपासून विधानसभेवर हल्लाबोल करण्यासाठी यवतमाळ येथून पदयात्रा सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर विदर्भातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून कापूस भाववाढीबाबत काही निर्णय होण्याची आशा आहे. त्यामुळे आगामी नागपूर अधिवेशनाकडे शेतकºयांचे लक्ष आहे.वर्धा जिल्ह्यात काही बाजार समित्यांतर्गत कापसाला ४८०० ते ४९०० रूपये भाव दिला जात आहे. येथे व्यापाºयांमध्ये कापूस खरेदीची चुरस असल्याने ही परिस्थिती उद्भ्वली आहे. मात्र इतरत्र अशी परिस्थिती नाही. शेतकऱ्याच्या कापूस व सोयाबीनला अत्यल्प भाव दिला जात आहे. बाजारात शेतमाल नेल्यानंतर त्याला उतरविण्यापासूनचा सारा खर्च शेतकºयाला करावा लागत आहे. त्या तुलनेत यंदा भाव फार कमी आहे.

टॅग्स :cottonकापूस