शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

वर्धा जिल्ह्यातील ११० वर्षांच्या बहिणाबाईंनी मागितले शेतकरी आरक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2018 14:10 IST

हिंगणघाट तालुक्यातील रोहणखेडाच्या ग्रामसभेत ११० वर्षीय बहिणाबाई कांबळे या महिलेने ग्रामसभेत शेतकरी आरक्षणाच्या ठरावाला समर्थन दर्शविले असून हा निर्णय शासनाने त्वरित लागू करावा अशी मागणी केली आहे.

ठळक मुद्दे७०० ठराव शासनाला रवाना शेतीचा खर्च ठरविणार कसा? शेतकऱ्यांचा सवाल

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : हिंगणघाट तालुक्यातील रोहणखेडाच्या ग्रामसभेत ११० वर्षीय बहिणाबाई कांबळे या महिलेने ग्रामसभेत शेतकरी आरक्षणाच्या ठरावाला आपले समर्थन दर्शविले असून हा निर्णय शासनाने त्वरित लागू करावा अशी मागणी केली आहे. आतापर्यंत राज्यात ७०० वर ग्रामपंचायती, कृषि उत्पन्न बाजार समिती यांनी ठराव पारित करून ते शासनाकडे रवाना केले आहे.रोहनखेडा ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत शेतकरी आरक्षणाचा प्रस्ताव ठेवण्यात आला. प्रस्तावावर मार्गदर्शन करण्यासाठी शेतकरी आरक्षणचे प्रणेते शैलेश अग्रवाल यांना आमंत्रित करण्यात आले होते. शेतकऱ्यांना दीडपट हमीभाव जाहीर झाला असून आता उत्पन्न दुप्पट करण्याचे सांगण्यात येत आहे. हमीभावात देशातील शेतकऱ्यांचा शेतीमाल विकत घेण्याची क्षमता शासनाची नाही, अशी कोणती यंत्रणाही नाही. व्यापाऱ्यांवर गुन्हे दाखल करणे हमीभावात खरेदीसाठी पर्याय नाही, हमीभावात खरेदी करणे शासनाची जबाबदारी असल्यामुळे त्यासाठी शासकीय यंत्रणाच गरजेची आहे, ती शासनाकडे उपलब्ध नाही. असे सांगितले. भारतात एकाधिक शेतीसूत्र पद्धती अमलात आल्यामुळे, जमिनीचा मगदूर वेगवेगळा असल्यामुळे, सगळीकडे एकसारखे पर्जन्यमान नसल्यामुळे, बी-बियाणे, खते, औषधी यांच्या किमतीतील व वापरातील तफावतीमुळे शेतकऱ्यांचे उत्पादनशुल्क एकसारखे असूच शकत नाही. त्याचप्रमाणे शेतकऱ्यांचा एकरी उताराही समान नसतो त्यामुळे कुठल्या प्रकारे त्यांचे उत्पादन शुल्क हिशोबीत करणार हा प्रश्न शैलेश अग्रवाल यांनी या सभेत उपस्थित केला.परिसरातील सर्वात ज्येष्ठ नागरिक ११० वर्षीय बहिणाबाई कांबळे यांनी शेतकऱ्यांना या उपायाचा खूप मोठा आधार होणार असल्यामुळे शासनाने शेतकऱ्यांना आरक्षण द्यावे यासाठीच ग्रामसभेला आली, असे संगितले. रोहणखेडाच्या सदस्यांनी हा प्रस्ताव मांडला व सर्व ग्रामस्थांच्या एकमताने सरपंच हरिभाऊ गौगेकर यांनी ठरावास मंजूरी दिली. यावेळी हिरामन वागदे, दिनकर कांबळे, विजय गोडे, सचिन नागोसे, विकास वानखेडे, रामदास खाटे, मधुकर भोंगाडे, महादेव हजारे यांनी शेतकरी आरक्षणाच्या उपयोगितेवर विचार व्यक्त केले व गावोगावी याविषयी प्रचार करणार असल्याचे संगितले.

टॅग्स :Farmerशेतकरी