शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

निम्न वर्धा प्रकल्प कार्यालयात शेतकऱ्यांचा ठिय्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2019 06:00 IST

कंत्राटदारांच्या वादात काम बंद झाल्याने निंबोलीवासीयांनी गुरुवारी निम्न वर्धा प्रकल्प कार्यालय गाठत ठिय्या आंदोलन सुरु केले. या आंदोलनादरम्यान या विभागाने पहिल्या कंत्राटदाराचे देयक न दिल्यानेच दुसºयाही कंत्राटदाराने काम थांबविले. तसेच उपअभियंत्याने पहिल्या कंत्राटदाराला पोलिसात तक्रार करण्याचा इशारा दिल्याचेही सांगण्यात आले.

ठळक मुद्देरस्त्याचे काम तत्काळ पूर्ण करण्याची मागणी : निंबोलीवासीयांचे उपअभियंत्यांना निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कआर्वी : तालुक्यातील निंबोली येथील रस्त्याचे काम रखडले आहे. या रस्त्याचे बांधकाम दोन कंत्राटदाराच्या वादात अडकल्याने त्रस्त झालेल्या नागरिकांनी अखेर निम्न वर्धा प्रकल्प कार्यालयात ठिय्या मांडून तत्काळ कामपूर्ण करण्याची मागणी लावून धरली. तसेच या मागणीचे निवेदन उपअभियंत्याना दिले.काही महिन्यांपूर्वी निम्न वर्धा प्रकल्प शंभर टक्के भरल्यामुळे निंबोली ते वाढोणा व अंतरडोह रहा स्ता पूर्ण बंद झाला होता. त्यामुळे शेतकऱ्यांना अनेक अडचणी निर्माण झाल्याने शेतकऱ्यांच्या अनेक तक्रारी निम्न वर्धा प्रकल्प कार्यालयाकडे करण्यात आल्या. या तक्रारीची दखल घेत कार्यकारी अभियंता रवी वºहाडे यांनी तात्पुरत्या स्वरुपात दुसऱ्या बाजुने रस्ता दुरुस्तीचा कंत्राट दिला होता. त्यानंतर वाढोणा रस्त्यावरील शेतकऱ्यांनी जाण्यास मनाई केल्याने रस्त्याचे काम थांबविण्यात आले. म्हणून संबंधित अधिकाऱ्यांनी जुन्याच रस्त्याचे काम करण्याचा निर्णय घेतला. त्यासंदर्भात कंत्राटही देण्यात आला. यापूर्वी काम सुरू करणे व उर्वरित देयकाबाबत चर्चा करण्यात आली होती. परंतु २ तारखेला कंत्राटदार काम सुरू करण्यास गेले असता तिथे दुसऱ्याच कंत्राटदाराने काम सुरू केले होते. त्यामुळे दोन्ही कंत्राटदामध्ये चर्चा झाल्यावर नवीन कंत्राटदारानेही रस्त्याचे काम थांबविले.कंत्राटदारांच्या वादात काम बंद झाल्याने निंबोलीवासीयांनी गुरुवारी निम्न वर्धा प्रकल्प कार्यालय गाठत ठिय्या आंदोलन सुरु केले. या आंदोलनादरम्यान या विभागाने पहिल्या कंत्राटदाराचे देयक न दिल्यानेच दुसऱ्याही कंत्राटदाराने काम थांबविले. तसेच उपअभियंत्याने पहिल्या कंत्राटदाराला पोलिसात तक्रार करण्याचा इशारा दिल्याचेही सांगण्यात आले. त्यामुळे तत्काळ काम मार्गी लावा अन्यथा ठिय्या आंदोलन सुरुच ठेवण्याचा इशारा गावकऱ्यांनी दिला. यावेळी अनिल काळे, शैलेश काळे, बबनराव देशमुख, जितेंद्र काळे, मनोज काळे, श्रीधर काळे, अमित काळे, सिरीश काळे, किशोर काळे, कार्तिक काळे यांची उपस्थिती होती.

टॅग्स :FarmerशेतकरीIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्प