शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी हमासला दिला निर्वाणीचा इशारा, म्हणाले, आता आणखी उशीर नको, अन्यथा...
2
“२०२७मध्ये गोव्यात ‘आप’ स्वबळावर सरकार स्थापन करेल”: अरविंद केजरीवाल; भाजपा-काँग्रेसवर टीका
3
युरोपपर्यंत पोहोचले बंडाचे वारे, या देशात आंदोलक रस्त्यावर, राष्ट्रपती भवनाला घेराव, पोलिसांसोबत संघर्ष
4
आणखी एका मुलीने गमावला जीव, मृतांचा आकडा १० वर; काँग्रेसची ५० लाख भरपाई देण्याची मागणी
5
रोहित शर्माच्या कप्तानीसोबत या दोन सिनियर खेळाडूंच्या वनडे कारकिर्दीलाही निवड समितीने दिला पूर्णविराम? 
6
केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांचे शिर्डी विमानतळावर आगमन
7
आयटीनंतर ॲाटो क्षेत्रातही कर्मचारी कपात, ही कंपनी ३००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार   
8
“RSS-BJPने ओबीसींचा घात केला, मोहन भागवत कधी गजानन महाराजांच्या दर्शनाला गेले का”: आंबेडकर
9
टॉपर तरुणीला गुंगीचे औषध देऊन अत्याचार; स्वतःला संपवायला निघालेल्या माय-लेकीला माजी सैनिकाने वाचवलं
10
"भारत माझी मातृभूमी, तर पाकिस्तान…’’, दानिश कनेरियाचं मोठं विधान, नागरिकत्वाबाबत म्हणाला  
11
...तर रोहित-विराटवर वनडे वर्ल्ड कप स्पर्धेआधीच निवृत्ती घेण्याची वेळ येणार?
12
भारतीय तरुणांना फसवून सायबर गुन्ह्यांसाठी जुंपणारी आंतरराष्ट्रीय टोळी उघडकीस; दोघे अटकेत, भारतीय आरोपींसह चिनी कनेक्शन आले समोर 
13
बिहारमध्ये लालू यादवांच्या निवासस्थांनी उमेदवारीवरून गोंधळ, घरात घुसले कार्यकर्ते, म्हणाले, आम्हाला...  
14
पावसाच्या 'बॅटिंग'च्या जोरावर श्रीलंकेनं उघडलं खातं; पाकला पराभूत करताच टीम इंडिया होईल टॉपर
15
अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या घालून हत्या; शिक्षणासोबत पेट्रोल पंपावर करत होता पार्ट-टाईम काम
16
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
17
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
18
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
19
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
20
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी

भुयारी मार्गासाठी शेतकरी एकवटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2019 22:39 IST

स्थानिक एकपाळा पांदण रस्त्यावर भुयारी मार्गाची मागणी लक्षात घेवून राष्ट्रीय महामार्गाचे तांत्रिक व्यवस्थापक गंडी व खासदार रामदास तडस यांनी मोक्का पाहणी केली. या भुयारी मार्गासाठी कास्तकारांनी चालविलेल्या संघर्षाची दखल घेवून गंडी यांची भेट महत्वपूर्ण समजली जात आहे.

ठळक मुद्देमहामार्ग व्यवस्थापक व खासदारांकडून मोक्का पाहणी

लोकमत न्यूज नेटवर्कदेवळी : स्थानिक एकपाळा पांदण रस्त्यावर भुयारी मार्गाची मागणी लक्षात घेवून राष्ट्रीय महामार्गाचे तांत्रिक व्यवस्थापक गंडी व खासदार रामदास तडस यांनी मोक्का पाहणी केली. या भुयारी मार्गासाठी कास्तकारांनी चालविलेल्या संघर्षाची दखल घेवून गंडी यांची भेट महत्वपूर्ण समजली जात आहे.देवळीतील एकपाळा पांदण रस्त्यावर दिलीप बिल्डकॉन भोपाळ या कंपनीच्यावतीने बोरी- तुळजापूर चार पदरी रस्त्याचे बांधकाम सुरू आहे. परंतु या पांदण रस्त्यावर भुयारी मार्गाची तरतुद न केल्याने एकपाळा शिवारातील शेकडो कास्तकारांची अडचण झाली आहे. देवळी तहसीलदारांनी जिल्हाधिकारी यांना याबाबतचा अहवाल सादर करून कास्तकारांची मागणी रास्त असल्याचे सांगितले आहे. त्यातच या पांदण रस्त्यावरील बांधकाम उंच असल्याने या भागातील कास्तकारांचे शेतात जाणे येणे बंद झाले आहे. तसेच तीन कि़मी. अंतराच्या फेरा घेवून कठीण मार्गाने शेतात जावे लागणार असल्याचे अहवालात नमूद आहे.तालुका भूमी अभिलेख कार्यालयाकडे उपलब्ध नकाशानुसार हा पांदण रस्ता सन १९०९-१० या वर्षापासून अस्तित्वात असल्याची नोंद आहे. शंभर फुट रूंदीच्या या पांदण रस्त्याला मागील ११० वर्षांचा इतिहास असून याआधी एकपाळा शिवारासोबतच वाटखेडा, टाकळी, चिखली, अंदोरीला जाण्यासाठी याच मार्गाचा उपयोग केला जात होता. आदी सर्व माहिती खासदार रामदास तडस यांनी राष्ट्रीय महामार्गाचे तांत्रिक व्यवस्थापक गंडी यांना देवून भुयारी मार्गाची मागणी लावून धरली.याप्रसंगी अजय देशमुख, अब्दुल जब्बार तंवर, मोहन ठाकरे, रवि कारोटकर, अशोक डाखोरे, सचिन वैद्य, गंगाधर कारोटकर व परिसरातील शेतकऱ्यांनी गंडी यांचे समोर बाजू मांडून लक्ष वेधले.यापूर्वी एकपाळा येथील नागरिकांनी प्रशासनाला याबाबत निवेदन दिले होते. तसेच भिडी येथेही महामार्गाच्या कामामुळे अडचण निर्माण झाली होती. त्याबाबतही खा. रामदास तडस यांनी माहिती जाणून घेतली. अडचणींची सोडवणूक करण्याचे आश्वासन दिले.

टॅग्स :highwayमहामार्गRamdas Tadasरामदास तडस