शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

ई-पीक पाहणीच्या अटीत शिथिलता तरी शेतकरी अनुदानापासून वंचित

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2024 17:33 IST

शासन आदेशानंतरही स्थिती कायमच : प्रशासन लागले कामाला, शेकतरी प्रतीक्षेत

पुरुषोत्तम नागपुरे लोकमत न्यूज नेटवर्क आर्वी : महायुती सरकारकडून शेतकऱ्यांना कापूस, सोयाबीन अनुदान जाहीर केले. यात ई-पीक पाहणीची अट टाकण्यात आली होती. या अटीमुळे हजारो शेतकरी वंचित राहणार असल्याचे लक्षात येताच शासनाने या अटीत शिथिलता दिली. शासन आदेशही काढला, मात्र, असे असतना तालुक्यात शेकडो शेतकरी शासकीय अनुदानापासून वंचित आहेत.

शेतकऱ्यांना हेक्टरी पाच हजार रुपये अनुदान स्पष्ट केले. त्याच्या याद्या ग्रामपंचायतीला प्रकाशित करण्यात आल्या. त्यानंतर ही जबाबदारी कृषी विभागाला देण्यात आली. त्यात कृषी सहायकाला गावपातळीवर जाऊन शेतकऱ्यांचे फॉर्म भरून घेण्यास सांगण्यात आले; परंतु २०२३ या वर्षात ज्या शेतकऱ्यांनी ई- पीक पाहणी केली, त्यांचेच नाव यादीत आले. तर बऱ्याच शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणी केल्यानंतरही त्याचे नाव यादीत सापडत नसल्याने दिसून आले. 

तालुक्यातच नाही तर वर्धा जिल्ह्यातील प्रत्येक गावात १० ते १५ शेतकरी सापडतील. त्यांनी ही | बाब कृषी विभागाच्या कृषी अधिकाऱ्याच्या लक्षात आणून दिली; परंतु तरीही त्यांची नावे अनुदानाच्या यादीत समावेश करण्यात आली नाही. त्यामुळे असे बहुतांश शेतकरी या लाभापासून वंचित आहेत. यावर जिल्हाधिकारी, कृषी विभाग, सरकारने लक्ष देणे गरजेचे आहे. २०२३ या वर्षात शेतकऱ्यांच्या मालाला भाव नसल्याने शेतकरी आधीच शेतकरीराजा आर्थिक संकटात भरडला गेला. त्यात सरकारने एक सख्खा आणि एक सावत्र असा भेदभाव केल्याने शेतकरीवर्गात प्रचंड नाराजीचा सूर दिसून येत आहे. यासाठी शासनाने व प्रशासनाने कृषी विभागातील अधिकाऱ्यांना जे शेतकरीवर्ग अनुदानापासून वंचित आहेत त्यांची नावे समाविष्ट करायला लावावीत, अशी मागणी शेतकरी संजय ठाकरे, विठ्ठल राठोड, संजय राठोड, शैलेश जामखुटे यांनी केली आहे. 

"ज्या शेतकऱ्यांची ई-पीक पाहणी झालेली आहे. त्यांची नावे अनुदानाच्या वादीत आली आहेत; परंतु ज्या शेतकऱ्यांच्या शेतातील पिकाची ई-पीक पाहणी झालेली नाही अशा शेतकऱ्यांची यादी कृषी विभागाकडे पाठविण्यात येणार आहे. त्यानंतर अनुदानापासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांनासुद्धा अनुदान मिळेल." - हरीश काळे, तहसीलदार आर्वी.

शेतकरी काय म्हणतात... "माझ्या शेतातील सोयाबीन कापसासह अन्य पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यानंतर पीक पाहण्याची अटसुद्धा नंतरच्या टप्प्यात पूर्ण करण्यात आली. असे असूनही पासबुक खात्यावर अनुदानाची रक्कम जमा झाली नाही."- अनिल जाधव, रा. हराशी

"सोयाबीन, कापूस व संत्रा पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. प्रथम पीक पाहणीनंतर नाव अनुदानाच्या लिस्टमध्ये नसल्याचे समजल्यानंतर पिकाची ई-पीक पाहणी करण्यात आली होती. मुख्यमंत्र्यांनीसुद्धा ही पीक पाहण्याची अट शिथिल केल्याची घोषणा केली. असे असताना अनुदानापासून वंचित आहे."- संजयराव ठाकरे, हिवरा

टॅग्स :farmingशेतीAgriculture Sectorशेती क्षेत्रwardha-pcवर्धा