शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

दिवाळी सणासाठीच्या खरेदीत शेतकरी घेतोय हात आखडताच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2022 22:45 IST

दिवाळीचे औचित्य साधून बाजारपेठही सजली असून विविध साहित्य खरेदी करण्यासाठी नागरिकही बाजारपेठेत गर्दी करीत आहेत. पण दिवाळीचे औचित्य साधून होत असलेले साहित्य खरेदी करणाऱ्यांमध्ये नोकरदार अधिक तर शेतकरी कमी असेच चित्र बघावयास मिळत आहे. एकूणच सजलेल्या बाजारपेठेत साहित्य खरेदीसाठी नोकरदारांची गर्दी होत असून शेतकरी मात्र हात आखडताच घेत असल्याचे म्हटल्यास वावगे ठरू नये.

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : कोविड संकटामुळे सलग दोन वर्षे सण आणि उत्सवांवर निर्बंध होते. तर काेविडचा जोर कमी झाल्यावर हळूहळू निर्बंधात शिथिलता देत नंतर निर्बंध पूर्णपणे हटविण्यात आलेत. परिणामी यंदा दिवाळी मोठ्या उत्साहातच साजरी होणार आहे. दिवाळीचे औचित्य साधून बाजारपेठही सजली असून विविध साहित्य खरेदी करण्यासाठी नागरिकही बाजारपेठेत गर्दी करीत आहेत. पण दिवाळीचे औचित्य साधून होत असलेले साहित्य खरेदी करणाऱ्यांमध्ये नोकरदार अधिक तर शेतकरी कमी असेच चित्र बघावयास मिळत आहे. एकूणच सजलेल्या बाजारपेठेत साहित्य खरेदीसाठी नोकरदारांची गर्दी होत असून शेतकरी मात्र हात आखडताच घेत असल्याचे म्हटल्यास वावगे ठरू नये.

अतिवृष्टीने मोडले कंबरडे- यंदाच्या वर्षी जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात जिल्ह्यात अतिवृष्टी झाली. परिणामी मोठे नुकसान झाले. तर मागील आठवड्यात ढगाळी वातावरण राहत पाऊस झाल्याने सोयाबीन पिकाची मळणी लांबली. शिवाय नैसर्गिक आपत्तीमुळे यंदा उत्पादनात कमालीची घट येत आहे. त्यामुळे शेतकरीवर्ग हात आखडताच घेताना दिसत आहे.

लक्ष्मीची मूर्ती, झेंडूचे फूल, आकर्षक तोरणही बाजारपेठेत- दिवाळीनिमित्त वर्धा बाजारपेठेत लक्ष्मीची मूर्ती व पोस्टर, आकर्षक असलेल्या पणत्या, झेंडूची फुले, विविध फटाक्यांसह इतर साहित्याने बाजारपेठ सजली आहे. विविध साहित्य खरेदी करण्यासाठी नागरिक आपल्या चिमुकल्यांसोबत सौभाग्यवतीसह गर्दी करीत आहेत. रविवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास विविध व्यावसायिक प्रतिष्ठानांत खरेदीसाठी नागरिकांची गर्दी होती.

कपडे खरेदीसाठी अनेकांची बाजारपेठेत धाव- दिवाळीचे औचित्य साधून बाजारपेठेतील कपडा लाईन भागातील विविध व्यावसायिक प्रतिष्ठाने सजली आहेत. याच दुकानांमध्ये रविवारी सकाळपासूनच महिलांसह पुरुषांची कपडे खरेदीसाठी गर्दी होती. नवीन कपडे खरेदी करणाऱ्यांमध्ये शेतकरी बांधवांची संख्या नाममात्रच असल्याचे बाजारपेठेचा दुपारी १२ वाजता फेरफटका मारला असता बघावयास मिळाले. - कदाचित आज सायंकाळपर्यंत मोठ्या संख्येने शेतकरी बांधव बाजारपेठेत दाखल होत दिवाळीचे औचित्य साधून खरेदी करतील, असा अंदाज एका कापड व्यावसायिकाने लोकमतच्या प्रतिनिधीशी संवाद साधताना वर्तविला.

शासकीय मदत ठरतेय तटपुंजी- जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी जिल्हा प्रशासनाला ३६५ कोटी रुपये प्राप्त झाले आहेत. तहसीलदारांमार्फत ७४ टक्के नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासकीय मदत वितरित करण्यात आली आहे. शिवाय ही रक्कम सुटीच्या दिवसांतही शेतकऱ्यांना काढता यावी या हेतूने जिल्हाधिकाऱ्यांनी थेट बँकांना एटीएममध्ये मुबलक पैसे ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. असे असले तरी झालेल्या नुकसानीच्या तुलनेत प्राप्त शासकीय मदत तटपुंजी असल्याचे शेतकरी सांगतात. विशेष म्हणजे या शासकीय मदतीच्या रकमेतून अनेक शेतकऱ्यांनी शेतमजुरांची मजुरी तसेच उसनवारीची परतफेड केल्याने हे शेतकरी दिवाळी सणासाठीच्या खरेदीत हात आखडताच घेत आहे.

 

टॅग्स :Diwaliदिवाळी 2022Farmerशेतकरी