शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा आरक्षण: सरकारचा मसुदा तयार; लवकरच निर्णय; मुख्यमंत्री अन् उपसमितीची संयुक्त बैठक
2
दहशतवादाविरोधात दुतोंडी भूमिका नको; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे SCO मध्ये पाकिस्तानला खडेबोल
3
जम्मू काश्मीर: पूंछ जिल्ह्यामध्ये दहशतवाद्यांचा घुसखोरीचा प्रयत्न भारतीय लष्कराने हाणून पाडला !
4
अफगाणिस्तानच्या पूर्व भागात रात्री ६ रिक्टर स्केल क्षमतेचा तीव्र भूकंप; ८०० लोकांचा मृत्यू
5
जीएसटी कपातीबाबत ऑटो कंपन्यांना आधीच माहिती होते? विक्री घसरली की मुद्दाम कमी केली... 
6
मोठ्ठा विकेंड? ८ सप्टेंबरला ईदची सार्वजनिक सुट्टी मिळणार? आमदार असलम शेख यांची मागणी, मुख्यमंत्र्यांना पत्र
7
अफगाणिस्तान पुन्हा भूकंपाने हादरला, २४ तासांत दुसरा मोठा धक्का; मदतकार्यात अडथळे
8
Big Breaking: ते तिघे आले नाहीत तर नाराजी तशीच राहणार; अखेर मनोज जरांगेंनी उपोषण सोडले
9
रिलायन्स-सुझलॉनसह 'हे' ५ शेअर करणार कमाल! ब्रोकरेज फर्मने दिली टार्गेट प्राइज; ३८ टक्केंपर्यंत होणार वाढ?
10
जगभरातील प्रेमी युगुलांना एकत्र आणणाऱ्या नेस्ले कंपनीच्या सीईओची नोकरी गेली; कर्मचाऱ्यासोबत प्रेमसंबंध भोवले
11
कन्नड अभिनेत्री रान्या राव हिला DRI ने ठोठावला 102 कोटी रुपयांचा दंड
12
Manoj Jarange Patil Maratha Morcha Live: सर्व मागण्या मान्य; मनोज जरांगे पाटील यांनी अखेर आपले उपोषण सोडले
13
'मराठा-कुणबी एक' जीआर काढण्यासंदर्भात काय म्हणालं सरकारचं शिष्टमंडळ? जरांगेंनी स्वतःच सांगितलं
14
तुमच्या ताकदीवर आपण जिंकलो, मनोज जरांगेंची घोषणा; वाचा, ८ मागण्या अन् ८ सरकारी आश्वासने कोणती?
15
टीम इंडियाला लवकरच मिळणार नवा Sponsor! या मंडळींसाठी BCCI नं लावली नो एन्ट्रीची पाटी
16
मुकेश अंबानींच्या कंपनीचा शेअर १०% नं वाढला, खरेदीसाठी गुंतवणूकदारांची झुंबड; आता ₹१९ वर आला
17
लग्नाच्या १७ वर्षांनंतर राहुल देशपांडेच्या संसाराचे सूर बिघडले, पत्नीपासून झाला विभक्त
18
चेन स्मोकर आहे किम जोंग उन! उत्तर कोरियाचा हुकूमशहा एका दिवसात किती सिगारेट ओढतो?
19
मराठा आरक्षणाबाबत हैदराबाद गॅझेटिअरवर पहिला GR प्रसिद्ध; वाचा जशाच्या तसा संपूर्ण शासन निर्णय
20
लाखोंचा खर्च टाळला, अवघ्या २ हजारांत केले लग्न; IAS युवराज अन् IPS मोनिका यांची प्रेम कहाणी

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2020 06:00 IST

लोकमत न्यूज नेटवर्क आष्टी (शहीद) : सरपणाकरिता जंगलात गेलेल्या शेतकऱ्यावर बिबट्याने हल्ला चढविला. यात ते जागीच ठार झाले. ही ...

ठळक मुद्देपाच लाखांची तात्काळ मदत : वनविभागाने लावली गस्त

लोकमत न्यूज नेटवर्कआष्टी (शहीद) : सरपणाकरिता जंगलात गेलेल्या शेतकऱ्यावर बिबट्याने हल्ला चढविला. यात ते जागीच ठार झाले. ही घटना शनिवारी दुपारी ३ वाजतादरम्यान मलकापूर शिवारातील किन्ही मार्गावर घडली. या घटनेने गावात दहशत निर्माण झाली असून वनविभागाने बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी गस्त लावली आहे.बकाराम धुर्वे (६५) रा. गौरखेडा वॉर्ड, असे मृत शेतकºयाचे नाव आहे. ते शनिवारला मलकापूर शिवारातील रस्त्याने किन्ही येथे जात होते. यादरम्यान वाटेत सरपण गोळा करीत असताना बिबट्याने त्यांच्यावर हल्ला चढविला. त्यामुळे बकाराम यांचा जागीच मृत्यू झाला. रात्रीच बराच वेळ झाल्यावरही बकाराम घरी न परतल्याने त्यांचा मुलगा नंदु याने मित्राच्या मदतीने शोध घेतला. मात्र त्यांचा कुठेही शोध लागला नाही. त्यामुळे त्याने आष्टी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवित वनविभागाली माहिती दिली. वनपरिक्षेत्र अधिकारी अमोल चौधरी यांनी २० वनरक्षक, ४ वनपाल यांना सोबत घेऊन जंगल गाठले. ठाणेदार जितेंद्र चांदे यांनीही पोलिसांना घेऊन वनविभागाच्या चमुसह शोध सुरू केला. मध्यरात्री ३ वाजताच्या सुमारास बकाराम यांचा मृतदेह सापडला. घटनास्थळाचा पंचनामा करुन आर्वीच्या उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी नेण्यात आले. रविवारी दुपारी १२ वाजता शेतकºयाचा मृतदेह त्यांच्या कुटुंबियांना सोपविण्यात आला. वनविभागाकडून मृताच्या कुटुंबाला तत्काळ पाच लाख रुपयाच्या मदतीचा धनादेश देण्यात आला. त्यांच्या अंत्यसंस्काराला सरपंच युसुफ शेख, जनशक्ती संघटनेचे आनंद निंबेकर, नाशीर शेख, रशीद खान, संजय जाणे, किसन कौरती, शफी अहमद, विजय गंजीवाले यांच्यासह गावकरी उपस्थित होते. वनविभागाने रविवारी सकाळपासून २० वनरक्षक, १५ मजूर, ४ वनपाल यांच्यासह मलकापूर, आष्टी, किन्ही, पंचाळा मौजात गस्त सुरू केली आहे. शेतकरी, शेतमजुरांनी सायंकाळी ५ वाजतानंतर जंगलाकडे जाऊ नये असे आवाहन वनपरिक्षेत्र अधिकारी अमोल चौधरी यांनी केले आहे. यासाठी दवंडी देण्यात आली आहे. वर्धा येथून उपवनसंरक्षक सुनील शर्मा यांच्यासह चमुनेही परिस्थितीचा आढावा घेतला आहे. शेतकरी बिबट्याच्या दहशतीमुळे चांगलेच भयभीत झाले आहे.

टॅग्स :leopardबिबट्या