शहरं
Join us  
Trending Stories
1
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
2
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
3
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
4
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
5
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
6
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
7
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
8
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
9
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
10
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
11
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
12
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
13
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
14
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
15
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
16
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
17
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
18
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
19
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
20
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...

‘लॉकडाऊन’मुळे रुतला कुटुंबाचा आर्थिक गाडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 08, 2020 5:00 AM

मागील १०९ दिवसांपासून प्रवाशी वाहनांची चाके जागेवरच रुतून आहे. आजही ऑटोचालकांची परिस्थिती जैसे थेच आहे. हाताला काम नसल्याने त्यांच्या मिळकतीवरही फरक पडला. पण, घरखर्च मात्र, सुरू असल्याने त्यांच्यावर संकट कोसळले आहे. त्यांच्या जवळील पैसे आता संपले आहे. त्यामुळे कुटुंबाचे पालन पोषण कसे करावे, हा यक्षप्रश्न वाहनचालक-मालकांसमोर उभा ठाकला आहे.

ठळक मुद्देऑटोचालकांची व्यथा : साडेतीन महिन्यांपासून हाताला काम नसल्याने उदरनिर्वाहाचा प्रश्न बिकट

लोकमत न्यूज नेटवर्कगिरड : लॉकडाऊनमुळे जिल्ह्यातील खासगी वाहनचालक मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत. जिल्हासीमा बंद असल्यामुळे जिल्ह्याबाहेर वाहतूक नसल्याने वाहनचालक व मालकांची आर्थिक घडी विस्कटली आहे. कामाशिवाय दाम मिळत नसल्याने चालकांच्या कुटुंबियांचा आर्थिक गाडाच लॉकडाऊनमध्ये रुतल्याची स्थिती निर्माण झाली आहे. याचा खरा फटका सर्वसामान्यांना बसल्याचे दिसून येत आहे.गिरड येथून जाम, कोरा, सिर्सी, खूर्सापार, उमरेड, चिमूर, हिंगणघाट, मोहगांव, मंगरूळ आदी मार्गावर खासगी प्रवासी वाहतूक करणारे जीप, ऑटो , टेम्पो,मिनीबस आदी सुमारे ९० वाहने खासगी प्रवासी वाहतुकीसाठी सकाळी ७ वाजेपासुन सज्ज राहत होती.प्रवासी वाहतूक करणे हा उदरनिर्वाहाचा व्यवसाय म्हणून परिसरातील सुमारे दोनशे युवकांनी हा हा व्यवसाय सुरू केला. त्यासाठी अनेकांनी बँका, खासगी बँकेकडून वाहने फायनान्स करून घेतल्या. दररोज प्रवासी वाहतूक करून किमान एकाला १ हजार ते दीड हजार रूपयांचे उत्पन्न मिळत होते. त्यातून पाचशे ते सातशे रुपयांचा खर्च वजा करून उर्वरित पैसे ते घरी घेऊन जात होते. या उत्पन्नातुन वाहनचालक आपल्या कुटुंबाचा गाडा चालवित असे. परंतु, कोरोना विषाणूच्या वाढत्या संक्रमणाकडे बघता २२ मार्च पासून लॉकडाऊन घोषित करण्यात आले. त्यामुळे सर्वच वाहतूक ठप्प झाली.मागील १०९ दिवसांपासून प्रवाशी वाहनांची चाके जागेवरच रुतून आहे. आजही ऑटोचालकांची परिस्थिती जैसे थेच आहे. हाताला काम नसल्याने त्यांच्या मिळकतीवरही फरक पडला. पण, घरखर्च मात्र, सुरू असल्याने त्यांच्यावर संकट कोसळले आहे. त्यांच्या जवळील पैसे आता संपले आहे. त्यामुळे कुटुंबाचे पालन पोषण कसे करावे, हा यक्षप्रश्न वाहनचालक-मालकांसमोर उभा ठाकला आहे. त्यातच घेतलेल्या कर्जाचे हप्ते कसे फेडावे, या विवंचनेत ते आहे. शासनाने याचा विचार करून आर्थिक मदत देण्याची मागणी करण्यात येत आहे.माझ्यासह अनेक व्यावसायिकांनी ऑटो,जीप, ही वाहने फायनान्सवर कर्जे घेऊन घेतली आहेत. चार महिने उलटले असून ऑटोरिक्षा जागीच उभा आहे. उत्पन्न नसल्याने फायनान्सचे हप्ते भरणे देखील कठीण आहे. त्यामुळे व्याजाचा भुर्दंही सहन करावा लागत आहे- अतुल बाकडे,पिपरी फाटामी सुशिक्षित बेरोजगार असून १५ वर्षांपासून प्रवासी वाहतुकीचा व्यवसाय करतो आहे. पण, असा वाईट प्रसंग कधीच आला नाही. तीन महिन्यांपासून एका दमडीची पण कमाई नाही. घरखर्च मात्र सुरूच आहे . तो भागवण्याचे वांदे झालेत. शासनाने सकारात्मक भुमिकेतुन अर्थिक मदत देण्याची आवश्यकता आहे.- विजय गुंडे,जिप मालक गिरड

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याEconomyअर्थव्यवस्था