शहरं
Join us  
Trending Stories
1
अण्णा, आतातरी उठा! मतांची चोरी होत असताना तुमच्यासारखा ज्येष्ठ गांधीवादी समाजसेवक शांत कसा?
2
एअर इंडियाच्या विमानाने लँडिंग करायचा प्रयत्न केला अन् प्रवाशांमध्ये पसरलं भीतीचं वातावरण! नेमकं काय झालं?
3
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस
4
सलमान, कपिल शर्मानंतर आता 'बिग बॉस' फेम एल्विश यादवच्या घराबाहेर गोळीबार, घबराटीचं वातावरण
5
सहचारिणी झाली वैरिण! झोपेच्या ५ गोळ्या दिल्या, उशीनं पतीचं तोंड दाबलं; जीव गेल्याचं कळताच रस्त्यावर फेकून दिलं!
6
एकीचं वय ४ अन् दुसरी अवघ्या आठ महिन्यांची, तरीही आईला कीव आली नाही! जन्मदात्रीनेच पोटच्या लेकींना का संपवलं?
7
डोनाल्ड ट्रम्प - व्लादिमीर पुतिन यांच्यातील महाबैठकीत युक्रेन शस्त्रसंधीबाबत करार नाही!
8
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना उत्तम, नोकरीत पदोन्नती योग; व्यापारात भरभराट, अनुकूल काळ!
9
ऐतिहासिक दिवस; कोल्हापूर सर्किट बेंचचे आज उद्घाटन; सरन्यायाधीश भूषण गवई उद्घाटक
10
बीएसएनएलच्या कामास चेंबरमध्ये गेलेले तिघे ठार; स्वातंत्र्यदिनी पिंपरी-चिंचवडमधील घटना
11
गाळप क्षमतेबाबत धोरणाची गरज, कारखानदारीस सुरुंग: माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार
12
सीमाप्रश्नावर चर्चेसाठी चिनी परराष्ट्रमंत्री भारत दौऱ्यावर; सुरक्षा सल्लागार अजित डोवालांशी चर्चा करणार
13
उपराष्ट्रपतिपदासाठी भाजपची जोरदार तयारी, संघनिष्ठ व्यक्तीवर भर; ९ सप्टेंबरला होणार मतदान
14
परवडणाऱ्या घरांची संख्या वाढवण्यासाठी बिल्डरांना सवलती, तरीही किमती चढ्याच: मुख्यमंत्री
15
उंच इमारतीच्या बांधकामाबाबतचे सुरक्षा नियम राज्यासाठीही बंधनकारक; हायकोर्टाचे निर्देश
16
भारतावर दुय्यम शुल्क लावणार नाही; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे संकेत
17
राहुल गांधी यांची आजपासून 'व्होट अधिकार यात्रा'; गैरप्रकारांविरोधात जनता जागृत झाल्याचा दावा
18
जिद्द असावी तर अशी! मुंबई, ठाण्यात थरांचा विश्वविक्रम; कुरघोडीच्या राजकारणात गोविंदांचा विजय
19
अंतराळवीर शुभांशू शुक्ला ऐतिहासिक यात्रा पूर्ण करून आज भारतात; PM मोदी यांना भेटणार
20
'फाळणीला जिना, काँग्रेस, माउंटबॅटन हे जबाबदार'; 'एनसीईआरटी'च्या मॉड्युलमधून मोठा दावा

सुविधांचे विविधा केंद्र दलालांच्या विळख्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2015 02:10 IST

विविध कागदपत्रांकरिता शालेय विद्यार्थ्यांना व सर्वसामान्य नागरिकांना होणारा त्रास टाळण्याकरिता येथील प्रशासकीय ...

वर्धा : विविध कागदपत्रांकरिता शालेय विद्यार्थ्यांना व सर्वसामान्य नागरिकांना होणारा त्रास टाळण्याकरिता येथील प्रशासकीय भवनाच्या परिसरात नागरिकांच्या सुविधांकरिता विविधा केंद्र सुरू करण्यात आले. या केंद्रातील सुविधांचा लाभ घेणे आता नागरिकांकरिता डोकेदुखी ठरत असल्याचे बघायला मिळाले. केंद्रावर थेट गेल्यावर नागरिकांना लाभ मिळणे कठीण झाले आहे. तर दलालांमार्फत गेल्यास कुठलाही त्रास न होता काम होत असल्याचे वास्तव समोर आले. या केंद्राला दलालांच्या विळख्याने पुरते ग्रासल्याचे विदारक चित्र आहे.विविधा केंद्राच्या इमारतीच्या आत तर दलालांची पंगत बघायला मिळाली. इमारतीच्या दारातून आत शिरताच डाव्या बाजूला दलाल चक्क टेबल घेवून बसून होते. त्यांच्याकडून काय पाहिजेपासून विचारणा सुरू होती. त्यांना तुम्ही तुमचे काम सांगा ते किंमत सांगतील. यात तुमचा सौदा झाल्यास तुम्हाला कामाकरिता खस्ता खाव्या लागणार नाही. मात्र या दलालांव्यरिक्त तुम्ही गेले तर तुम्हाला केंद्रात चकरा मारण्याशिवाय पर्याय शिल्लक राहणारा नाही, अशी येथील अवस्था आहे. केवळ इमारतीतच नाही तर इमारतीच्या परिसरात या दलालांकडून विद्यार्थी हेरण्याचे काम सुरू होते. त्यांना आवश्यक असलेल्या कागदपत्रांकडून शंभर रुपयांपासून हजार रुपयांपर्यंत रक्कम घेण्याचे प्रकार सुरू आहेत. इमारतीच्या बाहेर तर काही दलालांली टेबल लावून दुकान थाटले आहे. तर काहींनी येथे उभ्या असलेल्या गाड्यांवर बसून आपली दुकाने थाटली आहेत. वडिलांकडून मोजके पैसे घेत असलेल्या या विद्यार्थ्यांकडून या दलालांमार्फत रक्कम लुटण्याचे काम बिनधास्त सुरू आहे. दहावी व बारावीच्या परीक्षेचे निकाल जाहीर झाल्याने विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाकरिता विविध प्रमाणपत्राची गरज असते. या प्रमाणपत्राशिवाय प्रवेश मिळणे कठीण जाते. आवश्यक प्रमाणपत्र मिळविण्याकरिता असलेला कालावधी अत्यल्प असल्याने येथे एकाच वेळी विद्यार्थ्यांची झुंबड उडत आहे. त्याचा लाभ घेण्याकरिता अधिकाऱ्यांच्या संपर्कात असलेले दलाल येथे सक्रीय झाले आहेत. विविधा केंद्राच्या बाहेर व आत या दलालांची चांगली पंगत बसून असल्याने चित्र येथे पहावयास मिळाले. याची माहिती जिल्हा प्रशासनाला याची कल्पना आहे. यात दलालांकडून होत असलेल्या कामांत कुठलीही त्रुटी न काढता प्रमाणपत्रावर स्वाक्षरी करणारे अधिकारी जिल्हा प्रशासनाचेच असल्याने त्यांच्याकडून यावर कारवाई होत नसल्याचे दिसते आहे. मध्यंतरी यावर आळा बसविण्याकरिता जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले. मात्र अद्यापही त्या कॅमेऱ्याने हे टिपू नये, याचेच आश्चर्य आहे. या कॅमेऱ्यासमक्ष बसून हे दलाल काम करीत आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांच्या कॅमेऱ्यातील फुटेज पाहिल्यास याची कल्पना येईल. कदाचित त्यांच्याकडून ते पाहिल्याही जात असेल, असे असताना त्यांच्याकडून या दलालांवर कारवाई का होत नाही, हे न उलगडणारे कोडे आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी कारवाई करण्याच्या सूचना पोलिसांना दिल्याचे सांगण्यात आले. तरीही कारवाईचा पत्ता नाही. यामुळे दलालांकडून विद्यार्थ्यांची होत असलेली ही आर्थिक लुट सत्र संपेपर्यंत अशीच सुरू राहणार, हे नक्की. याकडे जिल्हा प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी नागरिकांतून आहे.