शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
2
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
3
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
4
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
5
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
6
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
7
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
8
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
9
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
10
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
11
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
12
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
13
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
14
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
15
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
16
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
17
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
18
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
19
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
20
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत

गौण खनिज उत्खननास उधाण

By admin | Updated: September 14, 2015 02:04 IST

महसूल प्राप्त करता यावा म्हणून खानपट्ट्यांचे वितरण केले जाते. यातून शासनाला महसूल मिळतो; पण सध्या जिल्ह्यात अवैध गौण खनिज उत्खननास उधान आल्याचे दिसून येत आहे.

वर्धा : महसूल प्राप्त करता यावा म्हणून खानपट्ट्यांचे वितरण केले जाते. यातून शासनाला महसूल मिळतो; पण सध्या जिल्ह्यात अवैध गौण खनिज उत्खननास उधान आल्याचे दिसून येत आहे. टेकड्या पोखरून मुरूमाची अवैधरित्या विल्हेवाट लावली जात आहे. याकडे लक्ष देत कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.प्रशासनाने जिल्ह्यात ७९ खदानीचे वितरण करण्यात आले आहे. हे खानपट्टे संबंधितांना लीजवर देण्यात येतात. प्रत्येक तीन वर्षांनी खदानीचे नुतनीकरण करावे लागते. या खदानीतून ठरवून दिल्यानुसार उत्खनन करावे लागते; पण जिल्ह्यात हे खानपट्टे सोडून टेकड्याही पोखरल्या जात आहेत. कुठलीही परवानगी नाही, रॉयल्टी नाही; पण मुरूम व अन्य गौण खनिजांची मोठ्या प्रमाणात लूट केली जात आहे. खदानींमध्येही अवैधरित्या उत्खनन करण्यात येत आहे. यात शासनाचा महसूल बुडत आहे. महसूल विभागाने गौण खनिजाच्या अवैध उत्खननाकडे लक्ष देत कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.(कार्यालय प्रतिनिधी)रात्री-बेरात्री होतेय उत्खननकारंजा (घा.) - तालुक्यात अवैद्यरित्या मुरूम व मातीचे उत्खनन मोठ्या प्रमाणात केले जात आहे. या गौण खनिजाच्या वाहतुकीसाठी रॉयल्टीही काढली जात नसल्याचे दिसते. रात्री-बेरात्री जेसीबीद्वारे मुरुमाचे उत्खनन केले जाते. याकडे महसूल विभागाचे दुर्लक्ष होत असल्याने अवैध व्यावसायिकांचे फावत असल्याचे दिसते. तालुक्यातील बराच भाग जंगलव्याप्त आहे. यामुळे रस्त्याची कामे असो वा इमारतीची, कंत्राटदारांकडून यासाठी मुरूमाची उचल मोठ्या प्रमाणात केली जाते. दिवसाढवळ्या ट्रॅक्टर व जड वाहनांद्वारे मुरुमाची वाहतूक केली जाते. क्षमतेपेक्षा अधिक वजन वाहून नेल्याने रस्त्यांचीही दुरवस्था होत असल्याचे दिसून येते. घरांच्या बांधकामासाठी दगड मिश्रीत मुरूमाची मागणी अलीकडे वाढली आहे. यामुळे सर्रास मुरूमाची वाहतूक केली जात असल्याचे दिसते. यासाठी नाममात्र रॉयल्टी काढली जाते. एकाच रॉयल्टी पासवर दिवसभर मुरूम, दगड, माती आदी गौण खनिजाची वाहतूक केली जाते. जंगलाचा भाग व रहदारी कमी असल्याने स्थळांवर तर कंत्राटदारांची मौजच असल्याचे दिसते. या भागात दिवसाही रस्त्याच्या कडेला ट्रॅक्टर लावून मुरूम खोदून नेला जातो. विटा तयार करण्याकरिता चोरीच्या मातीचा वापर होत असल्याचे दिसते. यामुळे माती उत्खननाही उधान आले आहे. नाममात्र रॉयल्टी काढून ही वाहतूक होते. परवाना १ लाख विटा बनविण्याचा असतो; पण प्रत्यक्षात पाच लाख वा त्यापेक्षाही अधिक विटा तयार केल्या जातात. हिशेब मात्र एक लाख विटांचाच दिला जातो.ग्राहकांना बांधकाम साहित्य महागाईच्या नावावर चढ्या दराने विटांची विक्री केली जाते. यावर अंकुश लावणे गरजेचे असताना महसूल प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करताना दिसते. याकडे लक्ष देत कारवाई करणे गरजेचे झाले आहे.(शहर प्रतिनिधी)