शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

शासकीय नियमाला डावलूण मुरुमाच्या उत्खननाला उधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2024 16:50 IST

सावली वाघ येथील प्रकार : उद्धवसेनेचे उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्क हिंगणघाट : तालुक्यातील मौजा सावली (वाघ) येथील शासकीय जागेवर शासकीय नियमांना डावलून अवैधरीत्या दगड, मुरुमाचे गेल्या काही महिन्यांपासून उत्खनन सुरू आहे. उत्खनन आरक्षित जागा सोडून केले जात असल्याने याचा शेतकऱ्यांना त्रास होतो आहे. या प्रकारावर आळा घालावा, अशी मागणी उद्धवसेनेच्या वतीने तालुकाप्रमुख सतीश धोबे यांच्या उपस्थितीत उपविभागीय अधिकारी यांना निवेदनातून केली आहे.

तालुक्यातील सावली (वाघ) येथे खनिकर्म विभागाच्या वतीने शासकीय जागेवर गौण खनिज मुरूम व दगड उत्खनन करण्यासाठी काही व्यक्तींनी जवळपास २१ हेक्टर जागेची परवानगी घेतल्याचे सांगण्यात आले आहे. या परवानगीची मर्यादा संपली असल्याचेही सांगण्यात आले. असे असताना शासकीय जागेवर पोकलेन, जेसीबी व विस्फोटक वापरून मोठ्या प्रमाणात उत्खनन सुरू आहे. यामुळे या परिसरात ३० ते ३५ फूट खोल गड्डे तयार झाले आहेत. उत्खननासाठी दिलेल्या आरक्षित जागा सोडून शेतकऱ्यांच्या शेतात जाण्याच्या रस्त्यापर्यंत हे उत्खनन सुरू ठेवले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना शेतात जाण्या येण्यास त्रास होत सहन करावा लागत आहे. विस्फोटक पदार्थामुळे शेतात काम करत असताना शेतकऱ्यांना याचा धोका निर्माण झाला आहे. 

सुरू असलेल्या प्रकाराची चौकशी करून या ठिकाणी वापरण्यात येणाऱ्या विस्फोटक पदार्थांऐवजी मजूर लावून उत्खनन करावे, अशी मागणी करण्यात आली आहे. सध्या रब्बी हंगाम सुरू झाला आहे. शेतकऱ्यांना शेतात काम आहे. त्यांना शेतात जाण्याचा रस्ता पूर्णपणे खराब झाला आहे. त्यामुळे या विषयाची तातडीने दखल घेऊन स्थळ पाहणी करून कारवाई करावी, अशी मागणी उपविभागीय अधिकारी यांना देण्यात आलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे. यावेळी उपतालुकाप्रमुख प्रकाश अनासाणे, माजी नगरसेवक मनीष देवडे, शंकर मोहम्मारे, शकील अहमद, फिरोज खान, आशिष वाघ, दीपक पावडे, रामाची किनाके, गजानन फरकाडे, राकेश राजूरकर, शकील एकोणकर, दिलीप कुकडे, गजाननराव धोटे, करण जेनेवार, अजय महाकाळकर, अनिल राजूरकर, नीलेश मानकर, योगेश ठग, प्रतीक पावडे, दीपक एकोणकर, संजय एकोणकर, विजय ठग, हनुमान गौळकर, रंजन डोमकावळे, दशरथ तिखट व भास्कर मानकर आदी शिवसैनिक व शेतकरी उपस्थित होते. 

शेतात जाणाऱ्या रस्त्याची लागली वाट शेतशिवारात जाणाऱ्या रस्त्यापर्यंत हे उत्खनन आले आहे. येथे दगड फोडण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या स्फोटकांमुळे रस्त्याची वाट लागली असून, होणाऱ्या आवाजाचा शेतकऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. याकडे संबंधित विभागाने लक्ष द्यावे, अशी मागणी शेतकऱ्यांच्या वतीने करण्यात आली आहे.

टॅग्स :wardha-acवर्धाMining Scamखाण घोटाळा